कराड विषयी शिलाहार

इतिहासातील कऱ्हाड..            
                    
                 ...यादवांच्या पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट इत्यादी सम्राटांचे मांडलिकत्व अखेर पर्यंत पत्करून, आपल्या मर्यादित राज्यात तीन चारशे वर्षे चिवटपणे तग धरून राहिलेल्या शिलाहार घराण्याचे, महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतरात यादवांच्या खालोखाल महत्त्व आहे. अनेक शाखा असलेल्या या राजवंशाच्या प्रमुख शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे तिसरे घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. याइतिहासातील कऱ्हाड..            
                    
                 ...यादवांच्या पूर्वी चालुक्य, राष्ट्रकूट इत्यादी सम्राटांचे मांडलिकत्व अखेर पर्यंत पत्करून, आपल्या मर्यादित राज्यात तीन चारशे वर्षे चिवटपणे तग धरून राहिलेल्या शिलाहार घराण्याचे, महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतरात यादवांच्या खालोखाल महत्त्व आहे. अनेक शाखा असलेल्या या राजवंशाच्या प्रमुख शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे तिसरे घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. या राजघराण्याचा आद्यपुरुष
जिमूतवाहन, राजचिन्ह गरुड, आणि मूळ गाव तेर,जिल्हा उस्मानाबाद असल्याने ते स्वतः ला
'तगरपुरवराधीश्वर' असे म्हणवून घेत. या घराण्याची राजधानी सुरुवातीला करहाट (कऱ्हाड ) येथे असल्याचे व पुढे ती कोल्हापूर येथे हलवली जाऊन सुद्धा, या घराण्याचे राजे आपला उल्लेख 'करहाटाधिपती'  असाच करत असल्याचे उल्लेख अभिलेख वाङ्मयामधून आढळतात . ह्यांच्या राजवटीत कराड हे 'करहाटक-४००० असे संबोधले जाई. शिलाहार नृपती अपराजितदेव याच्या मुरुड जंजिऱ्यास सापडलेल्या २० ऑगस्ट ९९३ च्या ताम्रपटात कऱ्हाडचा उल्लेख सापडतो.  २०/२/१० ४९ च्या ठाणे ताम्रपटात शिलाहार राजा मुम्मुणिराज याने चंद्रग्रहण प्रसंगी आपली पट्टराणी पद्म हिच्या कल्याणासाठी करहाट (कऱ्हाड )येथून आलेल्या ऋग्वेदी ब्राह्मणांना दान दिल्याची नोंद आहे. यावरून तेथे त्या काळी वशिष्ट, काश्यप, जामदग्न्य, वत्स, गोत्रीय ब्राह्मणांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट होते. मिरज २४ डिसेंबर १०५८च्या ताम्रपटात मारसिंहाचा पिता गोंक हा करहाट, कुण्डी विषयावर राज्य करीत होता, त्यास 'करहाटकुण्डीअधिपती'असे संबोधल्याचा उल्लेख सापडतो. द्वितीय भोजच्या २५ डिसेंबर ११९० च्या कोल्हापूर शिलालेखात त्याने करहाटक (कऱ्हाड ) येथील आदित्यभट, लक्ष्मीधरभट, व प्रभाकर घैसास या ब्राह्मणांना आपल्या राज्याच्या वाढीसाठी एडेनाड,विषयातील  कोपरवाड गावातील एक घर, शेत, व खडकवलना  अमृतेश्वर मूर्ती, उमामहेश्वर देवांच्या पंचोपचार  पूजेसाठी दान दिल्याची नोंद आहे. 
                   स्वतः च्या बळावर राजा बनलेल्या सिंदवंशीय राजाचा पराभव करणाऱ्या द्वितीय जतिगाची (१०००-१०२०) कऱ्हाड ही राजधानी होती. त्याचा नातू मारसिंह याच्या मिरजेच्या ताम्रपटात 'पन्नाळदुर्गाद्रिसिंह' (पन्नाळ पर्वतावरील
सिंह) असे संबोधल्या गेल्या जतिगाने आपले राज्य आणि दराराही वाढवला होता. परंतू पाच वर्षात (१०२४ च्या सुमारास) चालुक्याने कोल्हापूर नि दक्षिण कोकण पादाक्रांत केले, परिणामी पुढील शिलाहार राजाना चालुक्यांचे मंडलिक म्हणून आपले अस्तित्व राखावे लागले. 
                  चालुक्यांच्या राजवटीत 'करहाटा'स (कऱ्हाडास) प्रशासकीय विभागाचे महत्त्व होते ; परंतु या विषयातील गावांची संख्या मात्र कमी अधिक होत गेल्याचे आढळून येते. चालुक्यवंशीय सोमवंशी राजा जनमेजयाने दक्षिणेकडे विजय संपादन केल्यानंतर आपल्या करहाट कंबलेश्वरदेव येथील तळावरून 'करहाट - ४५००' विभागातील बलियवाड व चिकलवाड या गावाची मूळ जमीन करमुक्त करून राम गावुंडा यास दिल्याची नोंद जनमेजयाच्या सन ११५४ च्या दशकातील चिकुर्डे ताम्रपटात आढळते. ताम्रपटात पुढे करहाटाच्या(कऱ्हाडच्या) ईशान्येस अधितग्राम, देवुळग्राम, आणि चिकलवाड, नैऋत्येस स्ताणपग्राम आणि पूर्वेस आमलकग्राम ही दान दिलेली ग्रामे असल्याचे म्हटले आहे. यावरून चालुक्य काळात करहाट (कऱ्हाड)-४५०० हे विषय विभागाचे प्रमुख केंद्र होते. 
             ९७६ च्या होनवड शिलालेखानुसार 
कन्नडिगे हे गाव कलमबढी-३००० मध्ये तर कलमबढी हे करहाट (कऱ्हाड)--४००० मध्ये अंतर्भूत असल्याचे दिसून येते. 
              चालुक्य त्रिभुवनमल्लपेर्माडिदेव तथा विक्रमादित्य (सहावा) याचा मांडलिक यादव नृपती ऐरमदेव  याच्या ३ मे १०९८ च्या आश्वी जिल्हा अहमदनगर येथे सापडलेल्या ताम्रपटानुसार करहाटकाहून (कऱ्हाडहून) आलेल्या कूकलपंडित या कश्यप गोत्री शाकल शाखेच्या ब्राह्मणास व इतर ब्राह्मणांना संगमनेर - ८४,श्रीनगर - २५०० मधील सेऊण देशातील खेडे दान दिल्याचा उल्लेख सापडतो. 
               सन १२६१ च्या रत्नागिरी जिल्ह्यातील तेरवण येथे सापडलेल्या चालुक्यांच्या काळातील ताम्रपटातही करहाटक (कऱ्हाड) चा उल्लेख आढळून येतो . यादव काळात करहाट -२०००हे प्रशासकीय विभागाचे केंद्र होते. यावरून या काळात या विषयांकित क्षेत्राची मर्यादा आधीपेक्षा कमी झाल्याचे दिसून येते. कोकटनूर दानपत्र संवत ११७५ वरुन कलमबहे-३००हे करहाट-200 मध्ये समाविष्ट असल्याचे दिसून येते. इतिहासाचे  अभ्यासक व संशोधक
डॉ ह. धी.सांकलिया  यांच्या मते करहाट-२००० हे देश विभागाचे मुख्यालय होते नि यात सातारा जिल्ह्यातील कराड , विटा, तासगाव व खरसुंडी, हे तालुके, सांगली जिल्ह्य़ातील मिरज, सांगली तालुके तसेच बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्याच्या काही भागांचा समावेश असावा. पुढे मुसलमानी राजवटीत ही त्यांचे महत्त्व टिकून असल्याचे ध्यानात येते. 
                 पुढे देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण (१२१०-१२४७)या पराक्रमी राजाने कुंतल देशावर राज्य करणाऱ्या भोज शिलाहार द्वितीय याचा १२१८ मध्ये पाडाव केला नि त्याची राजवट संपुष्टात आणली. त्याच बरोबर कोल्हापूर शिलाहारांचे पारिपत्य करून त्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला व कारभार पाहण्यासाठी अधिकारांच्या नियुक्तया करून राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती ठेवली. याच्या अक्कलकोट,  खिद्रापूर येथील उपलब्ध दान शिलालेखांपैकी, एकात त्याने कोल्हापूर येथील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरासमोर तोरण उभारल्याचे आढळून येते. १२३६ च्या कोल्हापूर लेखावरून त्याने सरकारी उत्पन्नातून देवालयाची व धूपदीप-नैवेद्याची व्यवस्था केल्याचे कळते. त्यावेळी करहाटक -२००० प्रदेश सेनापती सहदेवाच्या ताब्यात होता, करहाटपूरपती शिलाहारांच्या काळात करहाटक (कऱ्हाड) प्रदेश अधिक महत्त्वाचा होता. त्यावेळी तो करहाटक -४००० होता तर यादव काळात तो करहाटक- २०००,एवढाच उरला ; म्हणजे  त्याचे पूर्वीचे महत्त्व कमी झाल्याचे दिसते. 
                    परिसरावर राज्य करणाऱ्या बहुतेक सर्व राजे-रजवाडयांनी देवालये, त्यांची उभारणी, देखभाल, डागडुजी, धूपदीप, नैवेद्यादींकरिता दैनंदिन तरतुदी मोठ्या आस्थेनं केल्याच्या नोंदी मिळतात. धर्म, धर्मकार्यासाठी त्यांनी सरकारी तिजोरीतून केलेल्या तरतुदी, सढळ हाताने दिलेली दाने, देणग्या, विद्यावंतांची, पंडितांची राखलेली बूज, केलेली कदर, धर्म धर्मप्रसार, विद्या, विद्यार्जनासाठी केलेल्या सोयी-तरतुदी, त्यांची वाहिलेली काळजी, तलावबांधणीसारखी केलेली लोकोपयोगी कार्ये, ही रयतेच्या धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक ऐहिक उन्नयनासाठी, त्यांच्या असणाऱ्या ध्यासाची तळमळ आस्थेची निदर्शक आहेत. या अशा लोककल्याणकारी योजनांमधून सध्या होणारे भ्रष्टाचार पाहिले की शरमेनं पाहणाऱ्या-ऐकणाऱ्यांची मान खाली जाते; पण ते करणारे मात्र उजळ माथ्याने राजरोस फिरता-वावरताना त्यांना मात्र त्याचे काहीच वाटू नये ही आजची खरी शोकांतिका आहे. पूर्वजांचे कोणते आदर्श आपण आज आचरत आहोत याचं पुनर्विलोकन करणं ही कधी नव्हे इतकी काळाची गरज आज बनली आहे. इतिहासाचे हे मूक साक्षीदार, या ऐतिहासिक वास्तू, देवालये, वाडे, गढया, गड- किल्ले आज शेवटल्या घटका मोजत आहेत. त्यांची अगदी रया गेली आहे. इतिहासाच्या या मूक साक्षीदारांना प्राणपणाने जपणं, पुढच्या पिढ्यांसाठी त्यांचं जतन, संवर्धन करणं हे आपलं आद्य कर्तव्य असायला हवं. असं जर नाही झालं तर इतिहास तर आपल्याला माफ करणार नाहीच. पण आपली, आपल्या समाजाची स्थिती बिनशिडाच्या गलबतासारखी होईल. काळाची ही गरज ओळखणं ही कधी नव्हे इतकी काळाची गरज आज बनली आहे. कारण ज्याना आपला इतिहास माहीत नसतो त्याना भविष्य असत नाही. 

                        -विजय शं.माळी [Vijay S. Mali] 

"कऱ्हाड : प्रीतिसंगमावरचं आदितीर्थ" या माझ्या ग्रंथाली, मुंबई प्रकाशित पुस्तकातील 'ऐतिहासिक कऱ्हाड' प्रकरणातील संपादित अंश.. राजघराण्याचा आद्यपुरुष

                          संदर्भ:-
      -विजय शं.माळी [Vijay S. Mali] 

"कऱ्हाड : प्रीतिसंगमावरचं आदितीर्थ" या माझ्या ग्रंथाली, मुंबई प्रकाशित पुस्तकातील 'ऐतिहासिक कऱ्हाड' प्रकरणातील संपादित अंश..

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...