दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतका उदयास पावले
दुसरे राष्ट्रकूट घराणे विदर्भात सहाव्या शतकात कलचुरींचे मांडलिक म्हणून उदयास आले. त्याचे काही ताम्रपट रामटेकजवळ नंदिवर्धन, अकोला व मुलताई येथे सापडले आहेत. कलचुरींच्या उच्छेदानंतर त्यांनी बादामीच्या चालुक्यांचे स्वामित्व स्वीकारले आणि पुढे ते राष्ट्रकूटांचे मांडलिक झाले. त्यांची राजधानी प्रथम नंदिवर्धन, नंतर भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर (पद्मनगर) आणि शेवटी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होती. हे घराणे दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकले.
Comments
Post a Comment