धार्मिक क्षेत्रात राष्ट्रकूट राजे सहिष्णू आणि उदार होते. बौद्ध, जैन, मुस्लिम, शैव, वैष्णव या सर्वांना त्यांनी समभावाने वागविले व सहकार्य दिले.

अमात्याने काही द्रम्मांच्या देणग्या दिल्या होत्या. गुजरातेतील 

गंगा, दशावतार गुहा, वेरूळ.
गंगा, दशावतार गुहा, वेरूळ.
सामंत राष्ट्रकूट शाखेच्या दंतिवर्म्याने कांपिल्य तीर्थातील विहाराला ग्राम दान केले होते. पहिला अमोघवर्ष व त्याचा पुत्र दुसरा कृष्ण यांनी जैन देवालयांना देणग्या दिल्या होत्या. जैनमुनी जिनसेन आणि गुणभद्र हे अनुक्रमे त्यांचे गुरू होते. हिंदू धर्म तर अत्यंत ऊर्जितावस्थेस पोचला होता. पहिल्या कृष्णाच्या काळात वेरूळ येथे जगातले एक आश्चर्य म्हणून गणलेले कैलास लेणे कोरले होते. राष्ट्रकूटांच्या ताम्रपटाच्या आरंभी विष्णू व शिव या दोन्ही देवांना नमन केले आहे. राष्ट्रकूटांच्या काळी श्रौत यज्ञ प्रचारातून गेले होते पण त्या राजांनी अनेक महादाने करून ब्राह्मणांना पंचमहायज्ञांच्या अनुष्ठानाकरिता शेकडो गावे आणि हजारो सुवर्ण आणि द्रम्म नाणी दिली होती. चौथ्या गोविंदाला त्याच्या अनन्यसाधारण दातृत्वामुळे सुवर्णवर्ष नामक बिरुद मिळाले होते. धार्मिक क्षेत्रात राष्ट्रकूट राजे सहिष्णू आणि उदार होते. बौद्ध, जैन, मुस्लिम, शैव, वैष्णव या सर्वांना त्यांनी समभावाने वागविले व सहकार्य दिले. मुसलमानी धर्माच्याही बाबतीत त्यांनी उदार धोरण ठेवले होते. त्यांना मशिदी बांधण्यास परवानगी दिली होती व कित्येक प्रदेशांवर मुसलमानी प्रांताधिपती नेमले होते. मुसलमानी लेखकांनी राष्ट्रकूटांच्या या उदार धोरणाची प्रशंसा गेली आहे.


संदर्भ : 1. Altekar, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.

2. Ganguli, O. C. Goswami, A. The Art of the Rashtrakutas, Bombay, 1958.

3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1970.

5. Yazdani, Gulam, Ed. The Early History of the Deccan, Two Vols., London, 1960.

        ६. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.

देशपांडे, सु. र. 

.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...