शिलाहार घराणे तिसरे

शिलाहारांचे तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव ह्या जिल्ह्यांचा काही भाग ह्या प्रदेशांवर राज्य करीत होते. त्यांची राजधानी वळिवाड येथे होती. हे कोल्हापूच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी. वर असलेले वळवडे असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे आता राधानगरीत रूपांतर झाले आहे. काही जुन्या लेखांत कोल्हापूर आणि प्रणालक (पन्हाळा किल्ला) यांचाही राजधानी म्हणून उल्लेख येतो, तर काहींच्या मते कोल्हापूरच्या पूर्वेकडील वळिवडे हे विद्यमान खेडे त्यांच्या राजशिबिराचे स्थान असण्याची शक्यता आहे.

ही तिन्ही घराणी आपणास विद्याधर जीमूतवाहनाचे वंशज म्हणवीत. या जीमूतवाहनाने एका नागाला वाचविण्याकरिता स्वतःचा देह एका शिलेवर बसून गरुडाला अर्पण केला होता म्हणून या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे नाव पडले, ही आख्यायिका शिलाहारांच्या लेखात सापडते.👆

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४