राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण (सु. कार. ९३९–६७) हा
तिसरा कृष्ण (सु. कार. ९३९–६७) हा महाप्रतापी होता. त्याने आपला मेहुणा बूतुग याला गंगवाडीच्या गादीवर बसविले, उत्तरेत स्वाऱ्या करून कालंजर व चित्रकूट येते राष्ट्रकूटांची ठाणी बसविली आणि नंतर दक्षिणेत परत येऊन कांची आणि तंजावर ही स्थळे काबीज केली. पुढे सहा वर्षांनंतर तक्कोलम् येथे झालेल्या घनघोर लढाईत चोल युवराज राजादित्य याला गंग सामंत बूतुगाने ठार केले. नंतर कृष्णाने रामेश्वरपर्यंत चाल करून तेथे आपला जयस्तंभ उभारला. पुढे चोलांनी आपला काही प्रदेश जिंकून परत घेतला पण त्यांचा तोंडइमंडल (अर्काट, चिंगलपुट आणि वेल्लोर जिल्ह्यांचा) प्रदेश राष्ट्रकूटांच्या हाती राहिला.
कृष्णाने पुन्हा ९६३ मध्ये उत्तरेत स्वारी केली. त्याने माळवा काबीज करून बुंदेलखंडवर आक्रमण केले. या स्वारीत कोरलेला त्याचा शिलालेख मेहर रेल्वे स्टेशनजवळ जूरा येथे सापडला आहे. त्यात चोलवंशाचे उन्मूलन केल्याचा उल्लेख आहे.
कृष्णानंतर त्याचा धाकटा भाऊ खोट्टिग (सु. कार. ९६७–७२) गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत माळव्याच्या परमार सीयकाने मान्यखेटवर इ. स. ९७२ मध्ये स्वारी करून ते नगर लुटले.
शतकातील राष्ट्रकूट राजा होता. याच्या शासनकाळात राष्ट्रकूट साम्राज्य कन्याकुमारी ते कनौज आणि वाराणसी ते भरूचपर्यंत पसरले.
हा ध्रुव धारावर्षाचा तिसरा मुलगा होता. ध्रुवाच्या पश्चान गोविंदने आपला मोठा भाऊ कंबसार आणि इतर सरदारांशी युद्ध करुन सत्ता मिळवली.हा ७९३ ते ८१४ दरम्यान सत्तेवर होता.
संदर्भ : 1. Altekar, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.
2. Ganguli, O. C. Goswami, A. The Art of the Rashtrakutas, Bombay, 1958.
3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1970.
5. Yazdani, Gulam, Ed. The Early History of the Deccan, Two Vols., London, 1960.
६. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.
देशपांडे, सु. र.
Comments
Post a Comment