मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते राजवंशाचा कुलाचार

👉  मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते       राजवंशाचा कुलाचार

-----------------

--------------नितीन घाडगे 

@............     चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते          राजवंशाचा कुलाचार   कुळातील तसेच पडनावाने राहणाऱ्या इतर सर्व वंशजांसाठी त्यांचा कुलाचार अथवा वंशजांसाठीची मंगल कार्यात उपयुक्त असलेली आवश्यक माहिती खाली दिली आहे.....

👉 टीप :

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला चव्हाण, मोहिते राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

👉 कुळ - चाहमान तथा चव्हाण उर्फ मोहिते          राजवंशाचा कुलाचार

👉

👉 मराठ्यांच्या ९६ कुळी घराण्याच्या यादीतील मोहिते घराणे .

👉मूळ कुळ - चाहमान तथा चव्हाण

👉वंश -सूर्य वंश                                                  👉वेद =  ऋग्वेद

👉गादी = सांबरींगड रणथंब

👉निशाण = श्वेत

👉देवक - अष्टव, कळंब.
👉सिंहासन- पांढरे
👉 निशाण- पांढरे
👉मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण (चौहान) राजांचे वंशज.
👉 विशेष सूचना :.तर काही भागात पाचपालवी सुद्धा देवक म्हणून सांगितली जाते पुरोहित याच्या कडून. कारण देवक माहित नसेल तर बऱ्याच लोकांना कॉमन असे अनेक कुळात पुरोहित देवक सागतात.

👉 बाजी किताब

निजामशाहीत जी अनेक मराठा घराणी सेवारत होती , त्यातील मोहिते घराण्यातील रतोजी मोहिते या असामीचे नाव इतिहास नोंदवितो. निजामशाही चाकरीत रतोजीने जी मर्दुमकी गाजविली तीबद्दल त्यांना बाजी हा किताब मिळाला ..
हा किताब आजही तळबीड येथील मोहिते घराणे नावापुढे गौरवाने लावते.

👉 मोहिते नाव कस मिळाले :-मोहिते हे दिल्लीच्या प्राचीन चव्हाण (चौहान) राजांचे वंशज. हिंदुस्थानांत मुसलमान लोकांच्या स्वाऱ्या होऊन दिल्लीचे हिंदू सार्वभौमत्व नष्ट झाल्यानंतर या घराण्याचे वंशज राजपुताण्यांत हाडोती प्रांतात राहिले ;  म्हणून त्यांस हाडे हे नांव पडले. पुढे हे हाडे चव्हाण दिल्लीच्या मुसलमान बादशहांच्या कारकिर्दीत उदयास येऊन त्यांनी आपल्या रानशौर्याने बादशहास संतुष्ट केले त्यामुळे त्यांस बादशहाकडून मोठमोठया किताबती व राजचिन्हे मिळाली.
त्याच वेळी त्यांना ' मोहिते ' हा किताब मिळाला.

*जग्गनाथ हडा चौहान व भिमसिंह हडा चौहान यांनी राजा रुद्रप्रताप यांचा पराभव केला व किल्ले जिंकले यावर खुश होऊन बादशाह यांनी जग्गनाथ हडा चौहान  याला खटाव प्रांत व भिमसिंह हडा चौहान याला सांगोला प्रांत ईनाम दिला आणि मोहिते अमीरराव हि पदवी बहाल केली.*


*संदर्भ 

मोहिते रायगावकर दफतर*

यापूर्वीचा संदर्भात चव्हाण महाराष्ट्रमध्ये 

 दहाव्या शतकातील राजशेखर कवी सांगतो की ती महाराष्ट्रीय कुलवधू ही चाहूआन म्हणजेच आजच्या चव्हाण कुळातील होती.असे पण उल्लेख आहेत.


👉मोहिते

शहाजीराजांची द्वितीय धर्मपत्नी राणी तुकाबाईसाहेब ह्या भिकुजी चव्हाण यांच्या सुकन्या.ह्या चव्हाण घराण्यास निजामशाहित अमीरराव हा किताब होता.भिकुजी चव्हाण व त्यांचे तीन पुत्र पुढे महाराष्ट्रात मोहिते उपनाम पावले.

👉 मोहिते पदवीच आडनाव :-
' मोहिते ' हा किताब मिळाला.आणि तो पुढे आडनाव म्हूणन रुजू झाला.

👉मोहिते नावाचा अर्थ :-मोहिते हा शब्द अरबी भाषेतील असून त्याची उत्पत्ती मोहीम या शब्दापासून झाली आहे. ह्याचा अर्थ ' रण जिंकणारा ' किंवा ' विजयी ' असा आहे.
👉मराठा साम्राज्याचे सेनापती :- सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कारकीर्दीत मुळे मोहिते घराण्याचा इतिहास सुवर्णाक्षरांनी  लिहून ठेवावा असा आहे.

👉हाडा चव्हाण वंशाची कुळ भावकी किंवा उपकुळे - मोहिते, वाकडे, पारदी, रणदिवे , कडू, डेरे, गव्हाणे , ढवळे, ताखेडे, हंबरराय, काशिद, भोर, नाईक, मालसिंगे, दुसिंगे, ढेरे, मते, ठोंबरे, चोथे, भापकर, नवले, चोहटमेल, अडसुले.

👉 कुळदेवी/कुलस्वामिनी-पार्वती देवीचे आवतार  
👉 कुलदेव -कुळदैवत :-महादेव व महादेवाचे     अवतार .काही भागात अजून वेगवेगळ्या दैवताची उपासना असावी.

©®लेखक :-नितीन घाडगे 

संपर्क :-8888494588

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...