✍️✍️✍️*सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली,* *पण अजूनही इंग्रजांना चुकवणा-या खालील चार जणांच्या उड्या लोकांना माहीत नाहीत, हे दुर्दैव नाही का?*
✍️✍️✍️ *सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली* *पण अजूनही इंग्रजांना चुकवणा-या खालील चार जणांच्या उड्या लोकांना माहीत नाहीत, हे दुर्दैव नाही का?* 1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी. 2) वसंतदादा पाटील यांनी पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत (यात वसंतदादांचे दोन साथीदार शहिद झाले होते) दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत चाळीस फुटांवरून मारलेली उडी. यावेळी कुंडलचे क्रांतिकारक मामासाहेब पवार यांचाही सहभाग होता. 3) सातारा सेल्युलर जेल फोडून नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या तीस फुटी भिंतीवरून मारलेली उडी. 4) आणखी एक उडी आहे ज्याची फारशी चर्चा नाही. शिवाजीराव पाटलांनी धुळ्याच्या जेलमधील भिंती वरुन मारलेली उडी. भिंत तीस एक फूट तरी नक्कीच होती. ते चिमठाणा येथील साडे पाच लाखाच्या दरोड्यांतले आरोपी होते त्यासाठी क्रांतीवीर नाना पाटलांनी काही माणसे पाठवली होती. पैसे पत्री सरकारलाच जाणार होते. शिवाजीराव आणि विद्याताईंची द्वितीय कन्या म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील. पण दुर्दैवाने हे फक्त खांदेशातच माहीत आहे.