14 जानेवारी 1761 पानिपत....पानिपत वीर व पानिपतावर हुतात्मा झालेले मराठा सरदार.🚩

🚩पानिपत वीर व पानिपतावर हुतात्मा झालेले मराठा सरदार...🚩

पेशवे, सदाशिवराव भाऊसाहेब,
विश्वासराव पेशवे,
पहिले बाजीराव पेशवे यांचे पूत्र समशेर बहाद्दर,
दत्ताजी शिंदे,
जनकोजी शिंदे,
यशवंतराव पवार,
 इब्राहिम खा गारदी,
हसन खा,
फरदुल्ला खा,
 रहिमत खा,
 दमाजी
बाबूराव गायकवाड,
धनाजी पवार,
 नरसिंगराव इंगळे,
धनाजी वागमोडे,
निठ्ठल सिवदेव,
राणोजी पवार,
 महिपतराव चिटणवीस .
 त्रिंबकराव सदाशिव,
 गोविंदपंत बुंदेले,
अंताजी मानकेश्वर,
बळवंतराव मेहंदळे,
 सोनजी भापकर,
संताजी आटोले,
 गोविंदराव निंबालकर,
दत्ताजी वाघ,
 संक्राजी घाटगे,
 बुधकर,
मानसिंगराव खुले,
मानाजी बंडगर,
बलवंतराव गणपत,
 गोंदजी कणसे,
गंगाधर नारायण,
दामोदर पवार,
 तावजी ताठे,
संताजी नलगे,
 धर्माजी पवार,
रामराव माने,
भालाजी भोईटे,
भयाजी निगडे,
भिमाजी निगडे,
कोमजी निगडे,
धोंडजी निगडे,
नारो हरी,
सटवाजी पिसाळ,
रायाजी मेमाने,
लिंगोडी धनवट,
तुकोजी खरात,
कृष्णाजी मोरे,
ज्ञानसिंग,
नारायण गरूड,
कान्होजी बिरजे,
देविदास रजपूत,
हाणमाजी मोरे,
बाबाजी मोहिते,
 बापूजी काटकर,
चिमणाजी बनके,
 संताजी ढवळे,
सिवाजी आबीटकर,
लखमोजी गाटे,
जन्याजी मोरे,
अप्पाजी बलदेव,
मल्हारजी वाघ,
गोपालजी माने,
सोमाजी सेलके,
निंबाजी पडवळ,
 अमरोजी चव्हाण,
 कृष्णाची काटे,
मानाजी घोरपडे,
 अनसोजी भोरकर,
 नागोजी दळवी,
अनाजी घाटगे,
पदोजी पाटनकर,
 दत्ताजी पवार,
आनंदराव चिमणाजी,
 लखमोडी गाजरे,
 मल्हारजी माने,
रहिमान गोरी,
राणोजी काटकर,
भीमाजी पांढरे,
अमृतराव निकम,
गोविंद नारायण,
अनोजी पवार,
कमलोजी साटे,
आपोजी दुगडे,
आबाजी साबाजी,
शहाजी मोहिते,
 बहिरजी बागवे,
 निमाजी अनंत,
लिंगो विश्वनाथ,
रघोजी शिर्के,
नारायणरावजी बनकर,
 अप्पाजी नलगे,
गिरमाजी माने,
आनंदराव परभू,
बाबूराव परभू,
सोमाजी गरूड,
कुसाजी ताटे,
बलवंतसिंग,
भरमोजी अहेर,
येसाजी खंडेराव परभू,
आनसोजी तांबे,
सुभाजी मोरे,
सिवजी पाटे,
कमलोजी निजसुरे,
 नारो विठ्ठल,
कोमजी निगडे,
घुमाजी मांडवे,
हणमाजी मचाले,
 कोंबजी मजाले,
 देसोजी घाटे,
गिरसोजी देवणे,
 हारजी जांबले,
 कृष्णाजी भापकर,
 संताजी पासलकर,
अप्पाजी भालेकर,
गणोजी निकम,
बाबुराव बिरजे,
विसंभर हरी,
 आनोजी मोटे,
रघोजी भोसले,
 शामराव शिर्के,
 गणोजी भागे,
पिराजी मोहिते,
वेंकटराव पडवळ,
 संताजी आटवल,
 दत्ताजी भोसले,
गणोजी खिरात,
जाणोजी पाटणकर,
 मानाजी पायगुडे,
माणकोजी पायगुडे,
 बहिरजी चव्हाण,
 तानकोजी बनगर,
कानहोजी रणदिवे,
 गोपालजी सांबरे,
निमाजी केशव,
 चंद्रराव तांबे,
 भाष्कर गोविंद, 
सयाजी पाटे, 
अप्पाजी, 
केरोजी चव्हाण,
 राणोजी आगलावे,
 भारमाजी गाडे, 
तयाजी सलगर,
येसाजी ढमढेरे,
अनाजी ढमढेरे,
 दयालसिंह,
मणीराम सिंग,
 कृष्णाराम बहिरव,
बिंबाजी पवार,
 मानाजी तुंग,
सटवाजी तुंग,
 नरसोजी चोपडे,
दिनानाथ बंड,
सावजी दामगुडे,
 संकराजी शिंदे,
अवजी विठ्ठल,
नावजी भोरकर,
 सिवाजी सकपाळ,
दमाजी आंगरे,
 गणजी भालेकर,
 हरी विसाजी,
 केरोजी निकडे,
तानको गणेश,
 लखमोजी सावंत,
 बहिरराव सेडगे,
 परसोजी गाटे,
 खंडेराव,
बयाजी सिर्के,
 माधोराम,
दौलतराम तांबे,
हासन इनायत,
 धावजी माने,
 गिरधर गणेश,
अप्पाजी पवार,
गमाजी मोहिते,
गंगाजी दाभाडे,
सिवराम माधव,
अप्पाजी बंड,
हैबतराव माने,
शामराव यादव,
अनाजी पोटले,
भानजी मोहिते,
सिवाजी भापकर,
आकोजी मोहिते,
 देवराव हुले,
हरी गोविंद,
विठोजी तिवरे,
 सदाशिव यशवंत,
नरसोजी पवार,
आवजी पाटोले,
धर्माजी पवार,
दामाजी नरहरी,
पिलाजी जटार,
गणोजी मोजर,
गणोजी थोरात,
सयाजी थोरात,
आधोजी मोरे,
 बाबुराव सेडगे,
मयाजी जांबले,
मनोहरसिंग,
सर्जाराव जाधव,
नायकजी माधव,
केशव नारायण,
 रामराव विठ्ठल परभू,
रामराव शामजी रणदिवे,
बलराम राजपूत.
अबाजी मोहिते,
 जान महमद,
लिंगोजी धरमाजी,
भवानी धनवट,
भगीरथराम,
चिंतामण राव,
मोटाजी साटम,
 सिवाजी सिरसाट,
भरमाजी वग,
अंताजी नरसिंघ,
येमाजी गोफणे,
भीवराम हरी,
अहिलोजी मोरे,
 दामोदर सिंग,
कर्णाजी पवार,
नेमाजी माने,
निबाजी वग,
 येशवंतराव पवार,
आपाजी पाटणकर,
 संताजी काटे,
राघोजी घाटणे,
 येमाजी भापकर,
 नायकजी घोरपडे,
नरसोजी सिंदे,
सयाजी सालोखे,
नारो नरहर,
विसाजी राम,
लक्षमण केशव,
 नंदराम रजपूत.

मानसिंग राव कदमबांडे
नर्सिंग राव कदमबांडे
भगवंत राव कदम
 पर्वत राव कदम तशेच फलटण गिरवी येथिल कदम जहागीरदार या गावातील घरती एक दान असे हुतात्मा झाले.
खंडेराव नाईक निंबाळकर (भाळवणी- पंढरपूर शाखा)  बळवंतराव मेहंदळे
सिदोजी घार्गे
बाबाजी मोहिते 
शहाजी मोहिते
गमाजी मोहिते
भानजी मोहिते
संताजी वाघ 
लखमोजी गाजरे
विविध पुस्तकातील लिस्ट जोडत आहे. ती खलील प्रमाणे.

👉पानिपतावर अनेक बखरी, कादंबऱ्या, पुस्तके लिहिली आहेत. आता जशीजशी ऐतिहासिक साधने, कागदपत्रे, तत्कालीन दस्तावेज हाती लागत आहेत तसा इतिहास समोर येत आहे.


👉पानिपतावरील ताजी बखर २०१४ मध्ये प्रकाशित झाली असून तिचे वैशिष्टय म्हणजे त्यात कल्पनाविलास आढळत नाही.

👉पानिपतावर ज्या काही लढाया झाल्या त्यात कामी आलेल्या सव्वादोनशेच्या आसपास मराठा सरदारांची आडनावासहित नावांचा उल्लेख आहे.



👉ही आडनावे वाचल्यानंतर आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम पाहून प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येतो. कोल्हापूर संस्थानचे अमात्य कृष्णराव पंडित यांच्यासाठी दरबारी कारकून रघुनाथ यादव चित्रगुप्त याने बखर पानिपत ची या नावाने दस्तावेज लिहिला.

 इतर बखरी गोपिकाबाई पेशवा यांच्यासाठी लिहिल्या होत्या. अर्थात त्यात विश्वासराव, भाऊसाहेब पेशवे, देवधर्म, तिर्थयात्रा याचेच रसभरीत वर्णन केल्याचे आढळते.
41वे पेज 

30व 29पेज...

चित्रगुप्ते यांनी १७६१ मध्येच लिहिलेल्य़ा बखरीत तत्कालीन राजकारण, परिस्थिती आणि प्रत्यक्ष युध्द यांचे वर्णन केले आहे. मो़डी लिपीत असलेला हा दस्तावेज इंग्रजांनी इंग्लंडला नेला.

 कागदपत्रे शोधण्यासाठी इतिहासकार उदय एस. कुलकर्णी २०१३ मध्ये इंग्लंडला गेले. रॅायल एशियाटीक सोसायटी अॅोफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंड च्या माध्यमातून कुलकर्णी यांची कागदपत्रे मिळविली. या मोडी लिपीतील कागदपत्रांचा अनुवाद करीत उदय कुलकर्णी यांनी पानिपतावर लढलेल्या मराठा सरदारांची नावे जगासमोर आणली.

👉विशेष म्हणजे या बखरीत अहमदशहा अब्दालीच्या सैन्यातील ठार झालेल्या २१० उजबेक, अफगाणी पठाण, रोहिले या मुस्लिम तर अब्दालीच्या बाजूने लढणारे राजपूत, भील, राठवड , पंजाबी या हिंदू सरदारांची नावे सुध्दा आहेत.

उत्तरेतील मुस्लिम तर सोडा हिंदू राजे, सरदारांनीही मराठ्यांना मदत न केल्याने मराठे हे युध्द हरले.
पानिपतचा युद्ध प्रसंग मराठ्यांच्या इतिहासात एक अविस्मरणीय अशा घटना आहे . मोगल साम्राज्य संपुष्टात येत होते . खुद्द मोगलांचे सरदार , निजाम , अयोध्देचे नवाब , रोहिले इ . स्वतंत्र झाले होते.राज्य टिकवण्याचा जोम किंवा वकूब मोगलांच्यात राहिला नव्हता,त्यातून नादिरशहाच्या स्वार्यापासून वायव्येकडून अफगाणांचे हल्ले हिंदुस्थानावर होऊ लागले,अहमदशहा अब्दालीच्या या हल्ल्यापुढे पंजाबचा सुभा टिकू शकला नाही,आणि अफगाण राज्यातील सरहद्द दिल्ली पर्यंत येऊन भिडली,

अशा वेळी मोगल साम्राज्याच्या मदतीला कोणीच धावून आले नाही,आले ते एक मराठेच मोगल साम्राज्यात आपला प्रभाव बसवून सम्राटांना आपल्या ताब्यात ठेऊन सगळ्या हिंदुस्थानात आपला अधिकार जमवावा ही महत्वकांक्षा मराठ्यांनी बाळगली होती,या सुमारास दक्षिण आणि वायव्येकडून चाल करून येणारे अफगाण हे दोन प्रबल शत्रू भारतीयांना बनले होते या दोघांना तोंड देण्याचे महाकार्य अठराव्या शतकात मराठ्यांनीच केले आणि म्हणूनच अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक समजले जाते. 
अफगाणांना पाचारण करुन मुसलमानी सत्तेची पुन्हा स्वप्ने पाहणारे नजीबखान रोहिला व शुजाउद्दौला यांना अफगाण परवडले पण मराठे नकोत या अराष्ट्रीय भावनेने पछाडलेले होते,ह्या उलट अफगाणांच्या या संकटाला तोंड देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रा पासून शेकडो मैल दुर मराठे धावून गेले,आणि पानिपताच्या रणांगणात त्यांनी या परकीय अफगाणांची गाठ घेतली . शुजाउद्दौला आणि नजीबखान हे तर बोलून चालून मराठ्यांना पाण्यात पाहणारे होते. 

पण उत्तर हिंदुस्थानातील इतर जमातीपैकी रजपुत आणि जाट हे युद्ध प्रसंगात तटस्थ राहिले . मराठ्यांना त्यांचे सहकार्य लाभले नाही . अशा परिस्थितीत मराठ्यांना अफगाणांशी सामना द्यावा लागला . वायव्येकडून पेटत असलेल्या या अफगाण ज्वाळेवर मराठ्यांनी झेप घेतली . व हजारो लाखो प्राणांचे बळी देऊन ती ज्वाळा त्यांनी शांत केली . पतंग जळून मरावेत पण त्या मुळे दिवाही विझावा तसाच प्रकार पानिपत येथे झाला कारण पानिपता वर झालेल्या घडामोडीत अफगाणांनी मराठ्यांचा एवढा धसका घेतला की परत त्यांनी हिंदुस्थाना कडे बघण्याचे धाडस केले नाही,

नंतर महादजी शिंद्यांच्यामुळे पंजाबमध्ये शिखांचा उदय झाल्यामुळे अफगाणांची दक्षिणेकडील वाट रोखली गेली.व अफगाणांचे भारतावर साम्राज्य करण्याचे स्वप्न साकार होऊ शकले नाही.फिनिक्ष पक्षाप्रमाणे पुन्हा मराठ्यांनी महादजी शिंद्यांचा नेतृत्वाखाली मुसंडी मारत अवघा मुलुख काबीज केला,ज्यांच्यामुळे मराठ्यांच पानिपत झाल त्यांचा महादजी शिंदेनी योग्य तो समाचार घेत,राजधानी वरून गाढवाचा नांगर हाकला,नजीब खानाची कबर फोडून त्यास हवेत भिरकावून दिला,त्याच्या नातूला म्हणजेच झाबेता खानला,पायाचा नखा पासून ते डोक्याचा कसा पर्यंत सोलून काढला व नंतर दिल्ली दरवाजाला लटकवून गिधाडांना खाऊ घातला,

वा पुन्हा एकदा दिल्ली मराठ्यांनी आपल्या मांडी खाली दाबली आणि पानिपतचा हिशोब चुकता केला,पुढे चाळीस वर्षांनी इंग्रज हिंदुस्थानावर आपले स्वामीत्व गाजवू पाहत असता दिल्ली पासुन तुंगभद्रे पर्यंत व गुजरात पासुन ओरिसा पर्यंत त्यांना निकराचा सामना कोणी दिला असेल तर तो फक्त मराठ्यांनीच होय . इ . स. 1803 मध्ये इंग्रज मराठ्यांचे युद्ध जुंपण्याच्या वेळी भारताचा निम्म्या पेक्षा जास्त भाग मराठ्यांच्या ताब्यात किंवा त्यांच्या प्रभावाखाली होता.ही एकच गोष्ट भारताच्या इतिहासात मराठ्यांचे महत्व सिद्ध करुन देण्यास पुरेशी आहे.
#पानिपत
#सरदार 


 🚩अखंड हिंदुस्तान वर झालेला वार मराठ्यांनी छतीवर घेतला. 🚩

लेखन &माहिती संकलन :-नितीन घाडगे 
सदर्भ :-अनिल यादव (सकाळ)याचा लेख
       पानिपतावरील ताजी बखर
       चित्रगुप्ते यांनी १७६१ मध्येच लिहिलेल्य़ा बखर
       इतिहासकार उदय एस. कुलकर्णी २०१३ मध्ये इंग्लंडला गेले. रॅायल एशियाटीक सोसायटी अॅोफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड आयर्लंड च्या माध्यमातून कुलकर्णी यांची कागदपत्रे मिळविली. या मोडी लिपीतील कागदपत्रांचा अनुवाद करीत उदय कुलकर्णी यांनी पानिपतावर लढलेल्या मराठा सरदारांची नावे जगासमोर आणली.
       
     
         

Comments

  1. Replies
    1. पोस्ट उल्लेख केला आहे.ती पाहावी

      Delete
  2. खुपच महत्त्वाची माहिती आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...