औध संस्थानं
डेक्कन स्टेट्स एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सी (मराठा) याअंतर्गत येणारी संस्थानं:
राज्याचे नाव: औंध,
१६९९-१९48
पार्श्वभूमी:
👉औंध ही जाहागीर छत्रपती संभाजींनी परशुराम त्र्यंबक पंतप्रतिनिधी यांना बहाल केली.
परशुराम त्र्यंबक यांनी छत्रपती संभाजी आणि नंतर छत्रपती राजारामांच्या कारकिर्दीत लष्कर प्रमुख, प्रशासक आणि साम्राज्याचे प्रतिनिधी म्हणून काम केले.
👉१७०० ते १७०५ च्या कालावधीत पन्हाळा किल्ला, अजिंक्यतारा (सातारा) आणि भूपालगड किल्ला मोगलांच्या तावडीतून सोडवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
👉औध संस्थान स्वतंत्र राज्य कधी बनले?
पेशव्यांचा अंमल संपल्यानंतर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १८२० मध्ये सातारच्या छत्रपतींच्या अधीन असलेल्या सर्व जाहागीरदारांसह स्वतंत्र करार केला. जेव्हा इंग्रजांनी सातारा राज्य खालसा केले तेव्हा औंध हे एक
स्वतंत्र राज्य बनले.
👉 हे राज्य भारतात कधी सामील झाले?
हे राज्य ८ मार्च १९४८ रोजी भारतीय संघात सामील झाले.
भारतात खालसा होण्यापूर्वी शेवट चे अधिपती: मेहेरबान श्रीमंत भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी
श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी
Comments
Post a Comment