अक्कलकोटचे प्रथमनरेश फत्तेसिंग भोसले स्मृतीदीना निमित्त अभिवादन 🚩
फत्तेसिंह(फत्ते सिंग) भोसले उर्फ फत्तेसिंह बाबा भोसले (१७०७-१७६०)
फत्तेसिंग भोसले हे सयाजी लोखंडे पाटील यांचे पुत्र ,शाहू महाराज फत्तेसिंग भोसले यांच्यावर पुत्रवत प्रेम करत असत .ते त्याचे माणसपुत्र होते.
यांचे पालन शाहू महाराज यांची सह पत्नी विरुबाई यांनी केले.विरुबाई मरण पावल्यावर उत्तरक्रिया विधी फत्तेसिंग यांनीच केली.विरुबाई यांच्या खर्चासाठी दिलेला अक्कलकोट परगणा नंतर फत्तेसिंग बाबा यांस मिळाला.
दाभाडे शाहू महाराज यांना सोडून गेल्यावर त्यांचे वतन(जुन्नर पासून सासवड पर्यंत ७२० गावांची सरपाटीलकी ) महाराजांनी फत्तेसिंग बाबा यांना दिले.महाराजांनी फत्तेसिंग बाबांच्या बंधूस परद गाव इनाम दिले होते.
४ जानेवारी १७२१ रोजी झालेल्या निजाम भेटीसाठी महाराजांनी रावबाजी पेशव्यासोबत फत्तेसिंग बाबा यांना पाठवले होते .1725 च्या सुमारास मराठा फौजेच्या चीत्रदुर्गावरील स्वारीच्या वेळी भागानगरचा सुभा बाबा यांना देण्याच्या हेतूने महाराजांनी स्वारीचे अधिपत्य त्यांना दिले होते,त्याच स्वारीत महाराजांनी फत्तेसिंग बाबा यांना छत्रपती शरफोजीराजे यांच्या भेटीसाठी तंजावरास पाठवले होते.(राजवाडे खंड २).
१७२६ च्या सुमारास कलबुर्ग प्रांतात यांची चौथाई वसूल करण्यासाठी नेमणूक झाली होती.
कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजी महाराज यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीसाठी आणण्यासाठी फत्तेसिंग बाबा भोसले १७३० मध्ये इतर सरदार सोबत घेवून पन्हाळा किल्ल्यावर गेले होते.१७३३ मध्ये जंजिरा स्वारीच्या वेळी रायगड हस्तगत केल्यावर शाहू महाराज पत्रात लिहतात'रा.शिवाजी महाराज व रा. आबासाहेब संभाजी महाराज व काकासाहेब राजाराम महाराज,मातुश्री ताराबाई यांस कोणास न जाहले ते कार्य चि.फत्तेसिंग बाबा व रा.प्रधान यांनी केले हि कीर्ती जगत्रयी व निजाम उन्मुल्क व दिल्ली पावेतो जाहली.हा लौकिक जेणे करून कायम राहे ते करणे'
फत्तेसिंग बाबा आणि रावबाजी पेशवे यांचे सलोख्याचे संबंध होते .'उत्तरेकडील माणसाबा कार्नेतो पंतप्रधान यांनी व आम्ही एक विचारे करावा'असे बाबा यांना वाटे .
महाराजांच्या आज्ञेने फत्तेसिंग बाबा १७३७ मध्ये कर्नाटक स्वारी वर गेले तेथे त्यांच्या नेतृत्वात मराठ्यांना प्रचंड विजय मिळाला.
नाना पुरंदरे बालाजी बाजीराव पेशवा व भाऊसाहेब पेशव्यास लिहितो'........ ऐसियास फत्तेसिंग बाबांचा कारभार आहे तो स्वामी जाणतात.त्यांचे सर्व साहित्य मनसुब्याचे आपण केले पाहिजे'.
बाबूजी नायकाचे वर्चस्व कर्नाटक मध्ये न होवू देण्याच्या पेशव्याच्या योजनेला फत्तेसिंग बाबा यांचा विरोध होता (मराठी रियासत पेशवा बालाजीराव)
फत्तेसिंग बाबा भोसले यांच्याकडे बारामतीची जहागिरी दिली गेली होती. मोगली कैदेतून सुटका करून घेतल्यावर दक्षिणेत येताना सदाशिव जोशी नाईक या कशी येथील सावकाराचे शाहू महाराजांना साहाय्य झाले. त्यामुळे पुढे त्यांचे पुत्र बाबूजी नाईक यांना इ.स.१७४३ साली बारामती ही जहागिरी दिली. ती पुढीलप्रमाणे -"फत्तेसिंह भोसले व शम्भूसिंह जाधव यांच्या ताब्यात असलेल्या सांगवी, गुणवडी, माळेगाव, कटफळ, गोजुबावी व कन्हेरी या सहा गावांशिवाय, सर्व बारामती महाल म्हणजे महालाच्या पेठ दुतार्फाबाबती, चौथ सहोत्रा, जकात, कुलबाब व कुलकाणु बाबुराव सदाशिव यांस देण्यात आला आहे. या महालाचा त्यांनी पूर्ण अंमल चालवावा, कसबा बारामती येथे त्यांनी आपला वाडा बांधावा व महाल ताब्यात घेऊन त्याप्रमाणे सरकारात कळवावे."
फत्तेसिंग बाबा यांना शाहाजी राजे नावाचे एक पुत्र होते .फत्तेसिंग बाबा यांच्या मृत्यू नंतर अक्काल्कोटची जहागिरी शाहाजी राजे यांनीच सांभाळली
आयुष्यभर तन मन आणि धनाने सातारच्या गादीशी इमान राखलेल्या फत्तेसिंहराजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी बिरुबाई यांच्या आशीर्वादानेच अक्कलकोट संस्थानाची निर्मिती केली. महाराणी बिरुबाईंच्या अंतसमयी त्यांच्यावर फत्तेसिंह राजे भोसले यांनीच मुलगा म्हणून अंत्यसंस्कार केले होते. तर १७४९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या महानिर्वाणानंतर मराठेशाहीचे चालून आलेले छत्रपती पद नाकारत फत्तेसिंह यांनी अखेरपर्यंत स्वराज्याची चाकरी केली. आयुष्याच्या उत्तरकाळात अक्कलकोट येथे आयुष्य व्यतीत करणाऱ्या फत्तेसिंह महाराजांचे १७६० मध्ये महानिर्वाण झाले. त्यानंतरही त्यांच्या पुढच्या पिढीने सातारच्या गादीशी असलेले आपले इमान कायम ठेवले. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण मराठेशाहीचे पारिपत्य केल्यानंतरही कोल्हापूरची गादी आणि सातारच्या गादीबरोबरच अक्कलकोट संस्थानाला कायम ठेवले. कदाचित यामुळेच स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र निर्मितीच्यावेळी बेळगाव कर्नाटकात समाविष्ट झाला असला तरी सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातच कायम ठेवावा लागला असावा. फत्तेसिंहराजे भोसले यांच्या मराठेशाहीशी असलेल्या इमानाचाच हा परिपाक असावा.
Rajache Kurle yethil Mane gharanyacha itihas sangu sahakal ka?
ReplyDeleteराज्याचे कुर्ला येथील माने हे येथील राजेभासले याचे सरदार
Delete