औंधचा राजा भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी इतिहास
🚩अधिकारकाळ
इ.स.१९०९ ते इ.स.१९४८
🚩राज्याभिषेक
इ.स.१९०९
🚩राज्यव्याप्ती
🚩पश्चिम महाराष्ट्र
🚩राजधानी
🚩औंध
🚩पूर्ण नाव
भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी
🚩जन्म
२४ ऑक्टोंबर इ.स.१८६८
🚩मृत्यू
१३ एप्रिल इ.स.१९५१
🚩पूर्वाधिकारी
गोपालकृष्णराव परशुरामराव तथा नानासाहेब
वडील
श्रीनिवासराव परशुरामराव तथा आण्णासाहेब पंतप्रतिनिधी
भवानराव पंतप्रतिनिधी हे धार्मिक होते, पण दैववादी नव्हते. मानवी सामर्थ्यावर व कर्तृत्वाचर त्यांचा विश्वास होता. उद्योगाचे महत्त्व त्यांना पुरेपूर पटलेले होते. बहात्तर खेडी आणि अठ्ठेचाळीस वाड्या एवढाच विस्तार असलेले आपले संस्थान उद्योग-व्यवसायांनी फुलावे, फळावे असे स्वप्न त्यांनी पाहिले. संस्थानांतील शाळांमधून तंत्रशिक्षण देण्यावर त्यांचा कटाक्ष होता.
औंध ता खटाव जि सातारा येथील मुझीयमचे_संस्थापक_व सूर्यनमस्कार चे प्रचारक, तसेच विविध कला क्रीडा चे प्रणेते होते.
कार्यकाळ
भवानराव_श्रीनिवासराव_पंतप्रतिनिधी_यांची आज जयंती (ऑक्टोबर २४, १८६८ - एप्रिल १३, १९५१)
🚩औंध संस्थानाचे राजे होते.
ते महाराष्ट्रातील औंध संस्थानाचे ४नोव्हेंबर ,१९०९ -ते १५ ऑगस्ट ,१९४७ या काळादरम्यान राजे होते.
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू ज्या जागेवर उभी आहे ती जागा औध च्या राज्याने परिषदेला दिलेली आहे.
🚩अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
इंदूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
🚩भवानराव चित्रकलेचे आश्रयदाते व स्वतः चांगले चित्रकार होते.
🚩त्यांनी कलेला उत्तेजन दिले .तसेच अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मदत केली
🚩अर्थमूलौ धर्मकामौ' हें बाळासाहेबांचे सूत्र होते. धर्म आणि काम हे अर्थावर अवलंबून असते.
म्हणूनच आपल्या प्रजेची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे बाळासाहेबांचे विशेष लक्ष होते. सूतसारापद्धति हि शेतकऱ्यांसाठी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास सहाय्य होणारी होती.
🚩 न्याय व्यवस्थेमध्ये सल्लागार पंचाची जोड हि फक्त औंध संस्थानातच होती.
🚩राज्यकारभारविषयक प्रगति आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्याविषयींचे प्रयत्न ह्यांच्याबरोबर ललित कलांचा झालेला परिपोष म्हणजेच औंध संस्थान.
🚩#संस्थान कला-मंदिर बनले होते.#
बाळासाहेब हे पहिल्या पंक्तीचे कीर्तनकार होते. त्यांच्या अंगी विविध कला अधिष्ठित झाल्या होत्या - नावाजलेले चित्रकार, शिल्पकलेचे ज्ञानहि संपादन केले होते, नाटकाची हौस होती, फोटोग्राफी उत्तम होती, कीर्तनाकरितां काव्यरचना, अश्या अनेक कला चे अधिष्ठान म्हणजे बाळासाहेब अश्या राजामुळे औंध संस्थान कला-मंदिर बनले होते.
🚩औंध येथील मुझीयम हे त्यांचे कलासक्त मनाचा खजिनाच आहे
भवानरावांना साहित्य, संगीत, शिल्प, चित्र यांची विशेष आवड होती. चित्रकारांचे ते आश्रयदाते होते. दरवर्षी राजेसाहेब औंधमध्ये कला प्रदर्शन भरवीत. त्यांनी राजे-रजवाड्यांकडून जुनी चित्रे विकत घेतली. परदेशी जाऊन पाश्चात्त्य चित्रकारांची काही चित्रे भारतात आणली. काही दुर्मीळ चित्रांच्या नकला करवून आणल्या. आणि या चित्रा-शिल्पांसाठी औंधमध्ये ए्क वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय उभारले.
🚩त्यांच्या अंगी विविध कला अधिष्ठित झाल्या होत्या
🚩सुर्य नमस्काराचे प्रचार कार्यही केले .
सुर्य नमस्काराचे ते पुरस्कर्ते होते त्यासाठी त्यांनी प्रचार कार्यही केले . आचार्य अत्रे यांनी त्यांचे या बाबतीतील व्याख्यान ऐकले व साष्टांग नमस्कार हे नाटक लिहिले...
🚩औंध संस्थानात लोकशाही कशी आली.
गांधीजींनी, प्रत्येक गावात पाच पंचांचं मंडळ स्थापन करावं. गावातले शिक्षण, सुरक्षा, रस्ते, बाजार, यात्रा, शेती याचे सर्वाधिकार त्यांना द्यावेत आणि संस्थानच्या महसुलातला अर्धा वाटा गावांसाठी द्यावा असं सुचवलं. गावातले तंटेबखेडे गावातच मिटवावेत. काही गावांची मिळून एक 'तालुका पंचायत' तयार करावी.
तालुक्याची सर्व प्रगती या पंचायतीतून झाली पाहिजे. प्रत्येक तालुका पंचायत समितीने आपल्यातून तीन सदस्य औंधच्या मध्यवर्ती काउन्सिलवर पाठवावेत.
या काउन्सिलवर बाहेरच्या तज्ज्ञ मंडळींना नेमण्याचा अधिकार राजाला असेल आणि वर्षातून किमान दोनवेळा काउन्सिलचं सत्र होईल असं त्यांनी सुचवलं.
यानुसार राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांच्यासाठी मॉरिस फ्रिडमन यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्यानुसार जो लोकशाहीचा प्रयोग औंध संस्थानात राबवला गेला त्यालाच 'औंध एक्सपेरिमेंट' असं म्हटलं गेलं. याच नावाने हा प्रयोग देशभरात प्रसिद्ध झाला.
मसुद्यात काही सुधारणा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी सुचवल्या आणि तो औंधच्या जुन्या कौन्सिलकडे मंजुरीसाठी पाठवला गेला. कालांतराने या घटनेच्या कायद्यात केली
किर्लोस्कर औंध संस्थानात कसे आले?
उद्योगात वेगवेगळे प्रयोग करणे, त्यांना आश्रय देणे यावर भवानरावांचा भर होता. आज ज्या किर्लोस्कर उद्योगाची भरभराट झाली आहे त्याचं रोपटं याच संस्थानात रुजलं. लक्ष्मणराव किर्लोस्कर बेळगावात नांगराचं फाळ तयार करण्याचं काम करत. मात्र त्यांच्यावर इंग्रज सरकार तत पाळत असे.
औंधमधले मंदिर. या मंदिराच्या सभागृहाचे काम किर्लोस्करांनी केले आहे.
एकदा बेळगावला गेले लक्ष्मणरावांनी ही काळजी राजांना सांगितली. तेव्हा राजांचे कारभारी जेकब बापूजी यांनी किर्लोस्करांना आपल्या संस्थानात आणण्याची कल्पना सांगितली.
राजांनी तात्काळ काही जागा लक्ष्मणरावांना दिली. आज तिचंच रुपांतर किर्लोस्करवाडी आणि उद्योगात झालं. असाच आश्रय त्यांनी ओगले यांना दिला आणि त्यांनीही मोठा उद्योग स्थापन केला. 1930 साली औंध संस्थानात आशियातला पहिला ग्लायडिंग क्लब काढण्याचेही प्रयत्न झाले होते.
आज खुल्या तुरुंगांबद्दल भारतभर नव्हे जगभरात बोललं जातं. पण याचे खरे आद्य प्रणेते भवानराव पंतप्रतिनिधी आहेत. त्यांनी 1939 साली स्वतंत्रपूर नावाची कैद्यांची खुली वसाहत सुरू केली होती.
गुन्हेगारांना आपली चूक सुधारण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यातूनच स्वतंत्रपूरचा उदय झाला होता. इथं त्यांना कुटुंबासह राहता यायचं. कष्ट करून जे पिकवलं ते विकता यायचं.
चित्रकला, शिल्पकला, काष्ठशिल्प सर्वच कलांना औंधमध्ये आश्रय मिळाला.
यावर ग. दि. माडगुळकरांनी एका सिनेमाची कथा लिहिली आणि व्ही. शांताराम यांनी तो सिनेमा दिग्दर्शित केला होता. त्याचं नाव दो आंखे बारह हात... लता मंगेशकरांच्या आवाजातलं, ए मालिक तेरे बंदे हम... हे या सिनेमातलं गाणं आताशा तुमच्या मनात आलं असेलच...
Comments
Post a Comment