Posts

Showing posts from June, 2021

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ जून १६६२* छत्रपती शिवाजी महाराजांचे बाजी सर्जेराव जेधेंना पत्र शाहिस्तेखान स्वराज्यात येऊन 2 वर्षे झाली होती. स्वराज्यात येताच मुघल सैन्याने लुटालूट आरंभली होती. शाहिस्तेखानाने चाकण, पुणे प्रांत ताब्यात घेऊन लालमहालात तळ ठोकला होता. मोगली सैन्याने शिरवळ भागातही गुरेढोरे व धान्याची पेवे लुटून न्यायला सुरू केले होते. आक्रमक बनलेल्या मोगलांनी भोर, रोहीडा भागातही हालचाली सुरू केल्या होत्या. कान्होजी जेधेंच्या मृत्यूनंतर या भागाची देशमुखी बाजी सर्जेराव जेधे सांभाळत होते. मुघल सैन्याच्या दबावामुळे जेधेंचे सैन्य व नोकर आपला मुलुख सोडून शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीसाठी जाऊ लागले. त्यामुळे बाजी जेधेनी महाराजाना पत्र पाठवून आपले लोक येतील त्यांना नोकरीवर ठेऊन घेऊ नये अशी विनंती केली होती. यावेळी महाराजांनीही बाजी जेधेंच्या पत्राला लागलीच उत्तर पाठवून दिलासा दिला होता. त्यात महाराज म्हणतात, "तुमचे लोक हुजूर येतील त्यास साहेब ठेवणार नाहीत. तुमचे तुम्हापासी फिराउनु पाठवितील." बाजी सर्जेराव जेधेना दिलासा देण्यासाठी पाठवलेल्य

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांच्या चरणासी कोटी कोटी प्रणाम..

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजीराव घोरपडे (मृत्यू: १८ जून, इ.स. १६९७)  हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते.  संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली. त्याच काळातले संताजी घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे संताजी घोरपडे यांनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले.  १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता.  शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. पुढे मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.  संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी म्हाळोजीराव घोरपडे यांनी- कुरुंदवाड येथे

छत्रपति शिवाजी महाराज यांच्या विविध देशांतील चित्रसंग्रहालयात विविध कालखन्डात रेखाटले गेलेली असल फोटो ठेवले आहेत.

Image

महाराणी बायजाबाई शिंदे इतिहास

Image
महाराणी बायजाबाई_शिंदे. आज १५८ वा स्मृतिदिन विनम्र अभिवादन  👉आज ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याची राणी असं म्हटलं की डोळ्यासमोर राजमाता विजयाराजे सिंदिया यांचं नाव आणि प्रतिमा समोर  येते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राजकारणात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. 'राजमाता' या त्यांच्या ओळखीमुळे त्यांची ग्वाल्हेरची राणी ही प्रतिमा आपल्या डोळ्यात येते. 👉पण विस्मरणात गेलेल्या ग्वाल्हेरच्या  महाराणी आहेत. त्या राणी म्हणजे बायजाबाई शिंदे.      या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील संस्थानिक सरदार घराण्यातील होत्या . कागलच्या या मुलीने केवळ शिंदे घराण्याची सून म्हणून नाव कमावलं नाही तर अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार पाहिला. 👉 बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केलं आहे. 👉घाटगे घराण्याचा ग्वाल्हेरशी संबंध कसा आला?  कागल येथिल देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याक

शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित समकालीन फोटो संग्रह

Image

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

Image
👉धनाजी जाधव यांची वंशावळ पुढीलप्रमाणे 👉अनिरुद्ध 👉प्रतिबाहु 👉सुबाहुआजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ जून १६५३ 👉दृढप्रहर (द्वारकेहून चंद्रादित्यपूर/चांदोर ला राजधानी आणली)(८६०-८८०) 👉स्युनचंद्र १ (श्रीनगर/सिन्नर नगर वसवून दजैतेथे राज्य स्थापले)(८८०-९००) 👉धडीयप्पा १ 👉भिल्लम १ 👉श्रीराज 👉वद्दीग १ (९५०-९७०) 👉धडीयप्पा २ (९७०-९७५) 👉भिल्लम २ (९७५-१००५) 👉वेसुगी १ 👉अर्जुन 👉भिल्लम ३ (१०२०-१०४५) 👉वद्दीग २ 👉वेसुगी २ 👉भिल्लम ४ 👉स्युनचंद्र २ 👉सिंघण १ 👉मल्लूगी 👉भिल्लम ५ (स्वतंत्र देवगिरी राजधानी वसविले व सार्वभौमत्व घोषित केले)(११८५-११९३) 👉जैत्रपाल १ (काकतीयांशी लढताना युद्धात मारले गेले)(११९३-१२००) 👉सिंघण २ (सम्राट उपाधी घेतली)(१२००-१२४६) 👉जैत्रपाल २ (वडिलांच्या हयातीत मृत्यू) 👉कृष्णदेव (आजोबांचा उत्तराधिकारी झाला)(१२४६-१२६१) 👉रामचंद्रदेव (खिळजीचे मांडलीकत्व पत्करले)(१२७०-१३११) 👉शंकरदेव ( खिळजीकडून पराभव )(१३११-१३१८) 👉गोविंददेव (जाधव आडनाव सुरू केले व बहमणींकडून जहागिरी मिळविली)(१३१८-१३८०) 👉ठाकुरजी (१३८०-१४२९) 👉भूकनदेव/भूतजी (१४२९-१५००) 👉अचलक

राजश्री शाहू महाराज

Image
👉शाहू महाराज याचे वडील कागल येथील संस्थानिक अधिपती होते.  👉शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील #घाटगे घराण्यात झाला. 👉मूळ नाव :- त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईंचे नाव राधाबाई होते.  👉आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व 'शाहू' हे नाव ठेवले. 👉कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व 'शाहू' हे नाव ठेवले. सन.१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला. 👉 शाहू विवाहबद्ध झाले शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई यांचे वय १२ वर्षांहून कमी होते. 👉राज्याभिषेक व २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ