लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको....

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको....
 
मी तुझा हात हातात घेतला...!
आई-वडिलांच्या उंबेरठ्याची चौकट ओलांडून तू माझ्या जीवनात आलीश आणि वर्तुळ पूर्ण झाले.
तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभले.
नेहमी सकारात्मक... नकारात्मकता च्या निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी....
तुझ्या येण्याने मला लौकीकाचे भान दिले...
यु मला काय दिलेस...! याचा हिशोब करणे सोडून दिले आहे मी...!
तसेही तारे मोजणे मला कधीही जमलेच नाही...!
मान्य आहे मला पूर्णपणे... अगदी तु ही स्वयंभू नाही आहेस ते...
पण तुझ्या असण्याने मला असण्याचा अस्तीत्व दिला आहे

आयुष्यातल्या चढ उतारात, सुख दुःखात माझ्या मागे
खंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी...! माझ्या प्रत्येक क्षणात बरोबरीने  चालणारी, खरंतर बायको ही एक मैत्रीण प्रेयसी असते. ती
संसार रथाचं एक चाक असते. बायको मुळे आयुष्यातील
दुःखे कमी होतात, अन सुखे द्विगुणीत होतात.. 
अशीच माझी बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी, 
मला प्रोत्साहन, पाठिंबा देणारी, घर संसारात रमणारी, जिवापाड प्रेम करणारी,
जिवलग बायको, मैत्रीण, आणि बरंच बरंच काही.... 🙂🙂🤗🤗

आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त खूप-खूप शुभेच्छा...🎂🎂💐💐

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४