आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष

👉#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष

👉#३_जून_१६५९
शिवरायांची सरसेनापती नेतोजी पालकर आणि काही मुत्सद्दी मावळ्यांसोबत किल्ले राजगडवर महत्वपूर्ण बैठक.
स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानास रोखण्यासाठी महत्वपूर्ण नियोजन या बैठकीत झाले. अफजलखानास रोखण्यासाठी कोणत्या योजना आखता येतील आणि त्या कितपत योग्य ठरून फळास जातील यासंदर्भात गुप्त चर्चा राजगडावर झाली.

👉#३_जून_१६७३
शिवाजीराजे व थॉमस निकल्स यांची
किल्ले रायगडावर भेट.

👉दि.३ जून १६७३ रोजी थॉमस निकल्स याने रायगडला भेट दिली तेव्हा संभाजीराजांनी त्याच्याशी दुभाषी मध्यस्थिशिवाय समोरासमोर इंग्रजी व फ्रेंच भाषेतुन चर्चा केल्याचे त्यांनी नमूद करून ठेवले आहे.
संभाजीराजे यांचे उमदे व्यक्तिमत्व, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, व्यवहारातील पारदर्शकता आणि अस्सल व फर्डया इंग्रजी-फ्रेंच भाषेतील संभाषण ऐकून ते प्रभावित झाले असे ते म्हणतात.
डच वकील अब्राहम लेफेबर, फ्रेंच ऍबेकॅरे, इंग्रज सॅम्युएल ऑस्टिन यांनी संभाजीराजे यांच्या मुत्सद्दीपणाचे कौतुक केले आहे.

👉#३_जून_१६७४
शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निरगती
याग, पूजा, गोदान केले.
यावेळी अवघा रायगड पाहुण्यारावळ्यानी भरून गेला.
रायगडाला जणू जत्रेचे स्वरूप आले होते आणि
२ दिवसातच राजे छत्रपती होणार होते.
रायगडाला लागले शिवराज्याभिषेकाचे वेध.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४