राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास हे जमीन खोदून जमिनी खाली दगडात शिवालय स्वरूपात खोदून घडवले आहे.राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकीर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात.

#पाताळेश्वर, पुणे#

👉पाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय अर्थात शिव मंदिर आहे.

👉हे नेमक मंदिर कुठे आहे?
याच्या जवळून जंगली महाराज रस्ता आहे.हे पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे.

👉हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे.


👉 राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकीर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात.

👉पुण्यातील पाताळेश्वर मंदिर जमीन खाली खोदून तयार केले आहे
पाताळेश्वर हे मंदिर जमिनीच्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे.

 पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत.

👉 पाताळश्वर लेण्याला मोठे प रांगण आहे.?

प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे.
 या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे.
👉लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत.

वर्णन :-
मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्‌वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ राष्ट्रकूट कालीन स्थापत्य शैलीचा नमुना असणारी  नक्षी कोरली आहे.

👉 येथे प्रदक्षिणा मार्ग आहे.

गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेल आहे..

 एका भागातील काम अर्धवट आहे.तेव्हा लेणी खशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते.
गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे.
👉एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे.
 त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे.

👉मराठा काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दषिणा दिल्याचे उल्लेख आहेत.

👉भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित केले आहे.


👉 बाराच्या वर्षापूर्वीच्या मंदिरात कोण कोणत्या देवता आहेत?

ह्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या दैवतांच्याही मूर्ती आहेत. त्या अर्थातच नंतर कुणीतरी ठेवल्या आहेत.किवा त्या पूर्वी पासून असतील.
या मंदिर परिसरात पाण्याच्या सोयीसाठी विहारी आहेत.
 राष्ट्रकूट शैलीचा उत्कृष्ट नमुना आणि जमिनीखाली असणारे दगडामध्ये कोरलेले पाताळेश्वर मंदिर सद्गुरु जंगली महाराज यांच्या मंदिराशेजारीच आहे.
 लेखन माहिती संकलन
नितीन घाडगे 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४