राजश्री शाहू महाराज

👉शाहू महाराज याचे वडील कागल येथील संस्थानिक अधिपती होते. 


👉शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील #घाटगे घराण्यात झाला.

👉मूळ नाव :-
त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईंचे नाव राधाबाई होते. 
👉आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व 'शाहू' हे नाव ठेवले.

👉कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व 'शाहू' हे नाव ठेवले. सन.१८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला.
👉 शाहू विवाहबद्ध झाले
शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले.

या वेळी त्यांचे वय १७ वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई यांचे वय १२ वर्षांहून कमी होते.
👉राज्याभिषेक व २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

२ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स.१९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
 👉बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला.

त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
👉स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.
👉अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.

अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.

👉जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स.१९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली.




१) छत्रपती शाहू महाराजांचा जन्म जयसिंगराव घाटगे आणि राधाबाई यांना झाला. त्याचे वडील गाव प्रमुख होते आणि आई मुधोळच्या राजघराण्यातील होते. तथापि, त्यानंतर कोल्हापूरच्या चतुर्थ राजा शिवाजींच्या विधवा असलेल्या राणी आनंदीबाईंनी त्यांना दत्तक घेतले.

२) छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण आणि शिक्षणाचे महत्व यावर जोर दिला. शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापुरात प्राथमिक शिक्षण अनिवार्य व मोफत केले. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत त्यांच्याकडून दरमहा १ रू. दंड म्हणून घेण्याचा नियम शाहू महाराजांनी बनावला.

३) छत्रपती शाहू महाराजांनी दलितांसाठी काम तर केलेच त्याचबरोबर त्यांनी महिलांची प्रगती व्हावी यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा बांधली. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक राज्यादेश जारी केली आणि १९१७ मध्ये विधवा पुनर्विवाहालासुद्धा कायदेशीर केले.

४) छत्रपती शाहू महाराजांनी उच्च जाती आणि अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा असण्याची पद्धत रद्द केली. त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा सुद्धा तयार केला.

५) महाराजांना कुस्तीची फार आवड होती. कोल्हापुरातही त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले आणि १९१२ मध्ये खासबाग मैदानासारखे विशाल कुस्ती मैदानही स्थापन केले. यामुळे कुस्ती शिकण्यासाठी अनेक लोकांनी कोल्हापुरात जाण्यास सुरवात केली.






मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.



लेखन :नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...