प्राचीन ग्रामसंस्थेतील गावाचा मुख्य वतनदार अधिकारी.
पाटील: प्राचीन ग्रामसंस्थेतील गावाचा मुख्य वतनदार अधिकारी. भिरासदारांपैकी पाटलाचे घराणे प्रमुख व ते गावात मानाने सर्वांत वडील असावयाचे. ‘पट्टकील’ या संस्कृत शव्दांवरून ‘पाटील’ हा शब्द बनला आहे. कापसाचे विणलेले पट्ट गावकीच्या नोंदी विहिण्यासाठी पूर्वी वापरीत आणि ते वेळूच्या नळीत जतन करीत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. या शब्दावरून पुढे पट्टकील, पाटैलू, पाटेल, पाटील, या क्रमाने तो शब्द प्रचारात आला. वि. का. राजवाड्यांच्या मते चालुक्यादी घराण्यांच्या वेळी गणसंघातील काही गण गावगन्नाचे पाटैलू बनले आणि काही गण कुणबी झाले. तज्ञांच्या मते पाटीलकी हे वतन जमिनीच्या नांगरपटीबरोबरच उदयास आले असावे. पाटलाला ग्रामसंस्थेत प्रदेशपरत्वे कमी-अधिक मानमराबत असत. पाटलाला गावपाटील किंवा पाटील-मोकदम असेही म्हणतात. पाटील घराण्यात सर्वच पाटील आडनाव लावीत असले, तरी पाटीलकी उपभोगणाराच खरा पाटील असतो. पाटीलकी हे वतन महार, मुसलमान, ब्राम्हण, कुणबी इ. जातींत असल्याचे उल्लेख आढळतात. देशमुखीखालोखाल पाटीलकीला महत्त्व होते आणि त्याचे वतनही वंशपरंपरागत चाले. जुन्या काळी पाटील हा जणू गावचा राजाच असे. महाराष्ट्रात प्रदेशपरत्वे त्यास भिन्न नावे आढळतात. पूर्वीच्या कोल्हापूर−सांगली संस्थानांत त्याला ‘चौधरी कामगावुंड’ असेही म्हणत; तर कोकणात ‘चौगुला’ आणि इतरत्र पाटील म्हणतात. जातपाटील, सरपाटील, जडेपाटील असेही भेद आहेत. यांशिवाय पोलीस पाटील व मुलकी पाटील, अशी एखाद्या गावात कामविभागणी असे. पाटील हा गावचा मुख्य मिरासदार असून त्याच्याकडे मुलकी, दिवाणी व फौजदारी अधिकार असत. गावचा सारा वसूल करणे, ही पाटलाची जबाबदारी असे. एखाद्या वर्षी रक्कम जमली नाही, तर ती त्यास भरावी लागत असे. पाटलाचे काम गावीची सुव्यवस्था ठेवून शांतता राखणे हे असे. गावाच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी त्याच्या वर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपणे त्याचावर असे. म्हणूनच पाटीलगढी सर्वसाधारणपमे गावकुसाजवळ बहुधा शत्रूच्या माऱ्याच्या ठिकाणी बांधलेली सर्वत्र आढळते. एका ऐतिहासिक कैफियतीत पाटील म्हणतो, ‘‘गावाची चाकरी, लावणी, उगवती वगैरे जे सरकारचे काम पडते, ते करीत असतो’’. यावरून त्याचा कर्तव्यांची कल्पना येते. त्यामुळे पीकपाणी, बलुतेदारांच्या तक्रारी, वतनदार, सामाजिक संस्थांची वतने, भांडण-तंटे इत्यादींची देखरेख व निवारण ही त्याची प्रमुख कामे होत. यांशिवाय सरकारी हुकुमांची अंमलबजावणी, गावात येणाऱ्या-जाणाऱ्यांची रबर मिळविणे इ. कामे असत. महार, कुलकर्णी आणि पोतदार यांच्यामार्फत पाटील कामे उरकीत असे. या कामासाठी पाटलाला वार्षिक मुशाहिरा मिळत असे. त्यांना वतन इनामी जमिनीही दिलेल्या आढळतात. विविध समारंभाच्या प्रसंगी−शिमगा, दसरा, पोळा−पाटलाचा मान पहिला असे. भोसले, दाभाडे, पवार, गायकवाड, शिंदे, होळकर या सरदारांनी संस्थाने निर्मिली, तरी ते पाटीलकीला कवटाळून राहिले व त्यांनी नवीन पाटील वतने संपादक केली. अव्वल इंग्रजी राजवटीत पाटीलकीचे महत्त्व असाधारण होते.
Comments
Post a Comment