Posts

Showing posts from May, 2022

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १६६६* छत्रपती शिवराय जेव्हा आग्रा शहरात आले होते तेव्हा त्यांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडेतत्वावर घेतले होते. हि गोष्ट औरंगजेबला समजताच त्याने महंमद अमीन खानास इनामवर्दीखानाची चौकशी करून अटक करण्याचे आदेश दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १६७४* एंद्रीशांतीचा मुहूर्त... या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १७०७* आग्र्याजवळ जाजाऊ येथे ३१ मे रोजी शहजादा आझम व शहजादा मुअज्जम यात युद्ध झाले व आझम त्यात मारला गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १७२५* सुभेदार मल्हारराव होळकर राजे यांची सून, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी महाराष्ट्रातील चौंडी, जामखेड, अहमदनगर गावी झाला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,* *सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.* *"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय म

सरसेनापती हबीरराव**ब्लॉकबस्टर* ⭐⭐⭐⭐⭐पहिल्या ३ दिवसात विक्रमी ८.७१ कोटी कलेक्शन... 🙏🏼

Image
*सरसेनापती हबीरराव* *ब्लॉकबस्टर* ⭐⭐⭐⭐⭐ पहिल्या ३ दिवसात विक्रमी ८.७१ कोटी कलेक्शन... 🙏🏼 फक्तं तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास ..  फक्तं आणि फक्तं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ..🙏🏼  कोणा एकेकाळी आमच्या मोहिते परिवारातील संदीपदादा मोहिते पाटील यांनी महाराजांना शब्द दिला होता की तुमच्या आणि हंबीरराव मोहितेंच्या पराक्रमाची कथा चंदेरी पडद्यावर अनीन आणि आज आमचे ते स्वप्न तो शब्द खरा झाला.  *महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" प्रदर्शित झाला.* 🙏🏼 *आम्हा मोहित्यांचे ईमान हे तो राजीयांच्या पायाशी* 🙏🏼 आपण सर्व प्रेक्षकांनी आम्हाला जो उदंड प्रतिसाद दिला प्रेम दिले आशीर्वाद दिले त्या बदल आम्ही आभारी आहोत मना पासून धन्यवाद 🙏🏼 असाच लोभ असुद्या सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा...🚩 *संदीप मोहिते पाटील* *प्रवीण विठ्ठल तरडे* *प्रसाद नारायण मोहिते* 🚩जय भावानी जय शिवाजी🚩

सातारा जिल्हा किल्ले ब्लॉग नंबर 24 किल्ले सुभानमंगळ

आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी फ़तेहखानाला पाठवल. त्यावेळी स्वराज्याचा आकार लहान होता. स्वराज्यात शिरुन त्याची नासधुस करु नये म्हणुन शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्द क्षेत्र ठरवण्यात आल. महाराज पुरंदरवर असल्याने फ़तेहखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले. महाराजांचे सैन्य कमी होते. त्यांना सैन्याची हानीही करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फ़तेखानाच्या स्वाधिन केला. सुभान मंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफ़िकीर राहीला. दुसर्‍या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला. पहाण्याची ठिकाणे नीरा नदीक

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष*

⛳ *⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १४९८* पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६६५* किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६७३* छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६७७* जिंजी स्वराज्यात दाखल २० मे १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६८२* छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १७६६* मल्हारराव होळकर यांचे निधन ( जन्म - १६ मार्च १६९३ )  पानिपतनंतर मराठेशाहीची

सोलापूर जिल्ह्यातील किल्ले ब्लॉक नंबर एक सोलापूरचा किल्ला

मध्यकालीन इतिहासात सोलापूरच्या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान होते. १४ व्या शतकात बहामनी राज्याच्या काळा मध्ये हा किल्ला बांधला गेला. मते, औरंगजेबने या किल्ल्यावर बराच काळ घालवला. पेशव्यांच्या स्वाधीन झाल्यावर दुसरा बाजीराव इथे राहिला होता. बहामनी सुलतानने किल्ल्यात एक मंदिर बांधले होते. हे मंदिरही प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. मुंबई-हैद्राबाद हा महामार्ग सोलापूर शहरातून जातो. सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला भुईकोट किल्ला म्हणून म्हणून ओळखला जातो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९३० रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून  घोषित केलेले आहे. मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले. बाराव्या शतकात बांधलेले हा भुईकोट किल्ला सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी व होसी पर्यटकांनी आवर्ज

रांगणा कोल्हापूर जिल्हा ब्लॉग क्रमांक 6किल्ले रांगणा

रांगणा  हा  भारताच्या   महाराष्ट्र  राज्याच्या  कोल्हापूर जिल्हयातील  एक किल्ला आहे.किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्धगड  सहयाद्रीच्या  धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश,  कोकण  व  गोवा  यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय  शिलाहार  राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’. बहामनी  साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार  सावंतवाडीचे  सावंतांकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोक

किल्ले सामानगड कोल्हापूर जिल्हा किल्ला ब्लॉग नंबर 5

इतिहास==: कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.. या भागाची सबनिशी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्

कोल्हापूर जिल्हा किल्ले ब्लॉक नंबर 4गगनगड

प्राचीन काळापासून वाहतूक व दळणवळणासाठी घाटांना अतिशय महत्त्व आहे. इतिहासकाळीच या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी व गरजेच्या वेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी जागोजागी किल्ले बांधले गेले. कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेच्या टोकावर गगनगडाची निर्मिती याच कारणातून करण्यात आली. सह्य़ाद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर हा गगनगड वसला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची आहे ६९१ मीटर. गगनबावडा हे गगनगिरी गडाच्या पायथ्याशी असलेले गाव. कोल्हापूरपासून हे अंतर आहे ५५ किलोमीटर आहे. हे गाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे येथील सर्व परिसर सदासर्वकाळ हिरवागार असतो,निसर्गरम्य वातावरण असून या गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे. बसस्थानकावरून गावात प्रवेश करताच सुरुवातीला दोन बाजूस दोन रस्ते फुटतात. त्यातील एक रस्ता करुळ घाटाकडे, तर एक रस्ता भुईबावडा घाटाकडे जातो. या दोन घाटांमधील मध्यबिंदू म्हणजे गगनगड होय. या दोन्ही घाटांवर लक्ष ठेवण्यासाठीच त्याची निर्मिती झालेली. गावातूनच गगनगडाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. अर्ध्या तासात आपण गडपायथ्याच्या वाहनतळावर पोहोचतो. गडाव

कोल्हापूर जिल्हा किल्ला ब्लॉक नंबर 3 भुदरगड

साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. भुदरगड तालुक्यातील गारगोटी जवळील हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते. हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला.  इ.स. १६६७  मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलशाही|मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात  परशुरामभाऊ पटवर्धनांनी  किल्ल्यातील शिबंदी वश करू

कोल्हापूर जिल्हा किल्ले ब्लॉक नंबर 2 किल्ले विशाळगड

विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरीत्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचिन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणार्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. मलिक रेहानच्या दर्ग्याला येणार्या हिंदू मुस्लिम भक्तांनी या परिसराचा उकीरडा केलेला आहे. आपल्या पूर्वजांनी हा गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले, प्रसंगी बलिदानही केले याची जाणीव जेव्हा या भक्तांना होईल तोच सुदिन. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. इतिहास इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी क

कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले ब्लॉग नंबर 1 किल्ले पन्हाळा

सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. याच पन्हाळ गडाला सिद्दी जोहारने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफिने स्वता:ची सुटका करून घेऊन विशालगडाकडे कूच केली.बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशिद यांनी या सुटकेत महाराजांना मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर युुवराज संभाजी महाराज यांनी स्वराज्याची सूत्रे येथूनच हाती घेतली.पन्हाळ्याच्या बाजूने कोकणात कोकणात जायला अनेक मार्ग उपलब्ध आहेत. सध्याच्या स्थितीला हा एकमेव असा किल्ला आहे कि ज्याचे अवशेष अजून सुस्थितीत पाहायला मिळतात.  पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. कोल्हापूरपासून २० कि.मी.अतंरावर आहे. पन्हाळ्याला  पर्णालदुर्ग  देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ  राजधानी  असणारा हा  किल्ला  इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. महाराष्ट्रामधील एकमेव टिकून राहिलेला किल्ला म्हणून याकडे पहिले जाते. आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳📜 ११ मे इ.स.१६६१

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ११ मे इ.स.१६६१ इंग्लंडचा  राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालचा राजा चौथा जॉन ह्याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रीगान्झा ह्यांचे लग्न झाले. ह्या समारंभात पोर्तुगालच्या राजाने त्याच्या जावयाला - दुसऱ्या चार्ल्सला 'मुंबई' आंदण म्हणून दिली. पोर्तुगीझांनी त्यावेळी साल्सेट, माझगाव, परळ, वरळी, सायन, धारावी, आणि वडाळा स्वतःकडे ठेवून उरलीसुरली मुंबई इंग्रजांना देऊन टाकली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 📜 ११ मे इ.स.१६६६ (वैशाख वद्य तृतीया, शके १५८८, पराभव संवत्सर, वार शुक्रवार) महाराज शंभुराजेंसह आग्रा येथील सीमेवर!             ५ मार्च इ.स.१६६६ महाराज अन् युवराज शंभुराजे यांनी (श्रीनृप शालिवाहन शके १५८७, फाल्गुन शुद्ध ९, नवमी, वार सोमवार) स्वराज्य माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्या स्वाधीन करून, माँ साहेब जिजाऊंचे शुभाशिर्वाद घेऊन किल्ले राजगड सोडला आणि आग्र्याकडे कूच केले. महाराजांचे वय त्यावेळी ३६, छत्तीस वर्षाचे होते तर युवराज शंभुराजे यांचे ९, नऊ वर्षे. शेरास सव्वाशेर म्हणजे काय हे पुढे औरंगजेब बादशहास नक्की समजले. मात्र पिता-पुत्र आयुष्यात प्रथमच नर्मदा

जावळी तालुक्यातील कुडाळ परगण्याच्या आमच्या शिंदे देशमुखांचे घराण्याचे शिक्के. शिक्यांवरील मायना खालील प्रमाणे

Image
जावळी तालुक्यातील कुडाळ परगण्याच्या आमच्या शिंदे देशमुखांचे घराण्याचे शिक्के. शिक्यांवरील मायना खालील प्रमाणे १) पहिला शिक्का -मोर्तब सूद ,  २) दुसरा शिक्का- सूर्याजी बिन तुबाजी देशमुख परगणे कुडाळ, यावर नांगर ही निशाणी आहे.  ३) तिसरा  शिक्का -शिंदे देशमुख कुडाळ.  बहामनी काळापासूनची कुडाळ ६० गाव खोऱ्याची देशमुखी कुडळाच्या शिंदे घराण्याकडे आहे.  सदरचे शिक्के हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आमचे पूर्वज श्रीमंत सुर्याजीराव तुबाजीराव शिंदे देशमुख शिक्केकरी यांचे आहेत. हा काळ सर्वसाधरण 1645 चा आहे. हे शिक्के आजही आमच्या घराण्याने जीवापाड जपले आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातही आमच्या घराण्याने स्वराज्य रथ पुढे नेण्याचे कार्य केले. इंग्रज आमदानीतही इंग्रज सरकारातून आम्हास देशमुखीची नक्त नेमणूक मिळत होती आणि स्वातंत्र्यानंतरही १९५० पर्यंत भारत सरकारकडून देशमुखी नक्त नेमणूक वार्षिक ₹ १८१२/- मिळत होती. पुढे BOMBAY PARAGABA AND KULKARNI VATANS (ABOLITION) ACT 1950  नुसार १९५१ पासून नक्त नेमणूक बंद झाली आणि त्याबदल्यात शासनाने ०१ मे १९५१ ते ३० एप्रिल १९७१ अशी वीस वर्षाची नुकस

कर्मवीर धर्मवीर अनंत दिघे

Image
ठाण्यात ज्याचे भरत होते दरबार काळानुरूप ठाणे बदलले आणि नेतेही....आज ही आनंद दिघे हे  आजही त्याच जनमान्यता असलेले नाव महाराष्ट्र आजही विसरला नाही.     ठाण्याच्या टेंभी नाक्यावरील ती गर्दी…बाहेर असणारा चपलांचा ढीग, पहाटे 4 वाजेपर्यंतची लोकांची वर्दळ आणि गोरगरिबांना मिळणारा न्याय..  हे चित्र आता दिसेनासे झाले आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर आता ‘आनंद आश्रमा’त सन्नाटा पसरलेला असतो. आनंद दिघे हयात असताना दररोज पायघड्या घालणारे पदाधिकारी, नगरसेवक आणि नेतेमंडळी त्यांच्या मृत्यूनंतर क्वचितच फिरकताना दिसतात. त्यामुळे ‘आनंद आश्रम’ ओस पडला आहे. दिघेंच्या अपघाती मृत्यूनंतर ठाण्यात आता प्रत्येकाचा स्वत:चा दरबार भरू लागला आहे. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेत आनंद दिघे यांचे वास्तव्य असलेल्या त्यांच्या निवासस्थानी, टेंभीनाक्यावर शिवसैनिकांची गर्दी झाली होती. मात्र या गर्दीत आनंद दिघेंना भेटायला आणि गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे आशीर्वाद घ्यायला येणारा सर्वसामान्य शिवसैनिक दुर्मिळ होता. त्यामुळे आनंद दिघेंचा दरबार बंद झाल्यानंतर आता केवळ गुरुपौर्णिमेची औपचारिकताच उरल्याची खंत ठाण्यातील जुन्या

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 26......परफेक्ट गुरूमंत्र..

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 26......परफेक्ट गुरूमंत्र.. *DEVELOP SELF-CONFIDENCE* (आत्मविश्वास विकास) 1. *Empower smiling*. _चेहऱ्यावर हास्य असू द्या_ 2. *Relax yourself*. आरामशीर / तणावमुक्त रहा 3. *Have a clear understanding*. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 4. *Avoid misconceived thoughts*. गैरसमज / चुकीचे समज टाळा 5 *Prompt decision - making*. तात्काळ निर्णयक्षमता 6. *Avoid inferiority complex*. न्यूनगंड बाळगू नका 7. *Believe yourself*. स्वतःवर विश्वास ठेवा 8. *Be inspirational*. प्रेरणादायी रहा 9. *Develop challenging attitude*. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 10. *Be a positive thinker*. सकारात्मक विचार ठेवा 11. *Have self – encouragement*. स्वयंप्रेरित रहा 12. *Avoid procrastination*. चालढकल (दिरंगाई) टाळा 13. *Learn lessons from others*. इतरांकडून प्रेरणा घ्या 14. *Dont lose your spirit*. हिंमत / धीर सोडू नका 15. *Think about time-use*. वेळेचे काटेकोर नियोजन करा 16. *Be smart at all costs*. नेहमी चाणाक्ष रहा 17. *Be a goal setter*. ध्येय निश्चित करा 18. *Be punctual*. तत्पर रह

असाच वेगळेपणा जपणारी* *आणखीही गांवे असतील,**माहिती मिळवा, आणि**इतरानांही माहित करून द्या*.

*आपल्या भारतातील विलक्षण, अद्वितीय गांवे *1)*आळंदी गाव*(महाराष्ट्र)* आळंदी या गावात आजही ( गाव वेशीत ) मास - मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पुर्ण झालीत. *2)-शनिशिंगणापूर (महाराष्ट्र)*     संपूर्ण गांवात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.     *3)- शेटफळ (महाराष्ट्र*)     प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य      असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती. *4)- हिवरे बाजार (महाराष्ट्र*)     भारतातील सर्वात "श्रीमंत" खेडे.      ६० अब्जाधीश घरे. एकही "गरीब" नाही.     सर्वाधिक GDP असणारं खेडं. *5)- पनसरी (गुजरात)*     भारतातील सर्वात "अत्याधुनिक" खेडेगांव.     गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून,     Wi-Fi सुविधाही आहेत.     गांवातील सर्व 'पथदीप' सौरउर्जेवर चालतात. *6)- जंबुर (गुजरात)*     भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक     "आफ्रिकन" वाटतात.     [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख] *7)- कुलधारा (राजस्थान)*     "अनिवासी" गांव. गांवात कोणीही रहात नाही.      घरे बेवारस सोडलेली आहेत. *8)- कोडिन्ही (केरळ*)      जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *७ मे १६६०* पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *७ मे १६७४* छत्रपती शिवराय रायगडावर मुक्कामी. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻       *७ मे १६८०* राज्यभिषेकापुर्वी म्हणजेच इ.स. १६८० 'वैशाख वद्य ४ शके १६०२' च्या  मुरगुडच्या 'रुद्राप्पा देसाईला' पाठवलेल्या अभयपत्रावर ही "शोडशावली" राजमुद्रा प्रथम अाढळली. 'भोसले' घराण्यातील हि "शंभुराजांची राजमुद्रा" छत्रपती "शिवरायांच्या" मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी असुन उभी 'पिंपळपानी' ७ ओळींची हि "राजमुद्रा" स्वतःची 'अस्मिता' व 'रुबाब' व्यक्त करते. राजमुद्रे प्रमाणे त्यांची 'मर्यादा' सुध्दा "शिवाजीराजेंच्या" मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे. बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठ

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 ६ मे इ.स.१४५२ सेंट झेविअर गोव्यात आला!        व त्याने इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. येशू ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर त्यांच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोप मध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. 'ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. हे करताना ज्यू लोक जे नवख्रिश्चन झाले ते त्या धर्माचे आचरण व्यवस्थित करतात की नाही. याचा शोध घेण्यासाठी ते न करणारांस शिक्षा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू ९ वा ग्रेगरी पोप याने इ.स.१२३९ मध्ये इक्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले आणि त्यांच्या द्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरू झाला. त्यातील काही नवख्रिश्चन ज्यू गोव्यात आले. गोव्यातही बाटवाबाटवीने नवख्रिश्चन झाले होते. त्या नवख्रिश्चनांना शिकविण्यासाठी सेंट झेविअर गोव्यात आला, ती तारीख होती, ६ मे इ.स.१४५२. आणि त्याने गोव्यात इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. "पेतरोज" हा इतिहासकार म्हणतो. ६

राजर्षी शाहू छत्रपती महाराज *युवकांनी आदर्श घ्यावा असा महापुरुष.. लोकराजा_____________________

~~~~~●◆■◆●~~~~~ *राजर्षी शाहू छत्रपती महाराज * युवकांनी आदर्श घ्यावा असा महापुरुष.. लोकराजा _____________________ आपल्या व्यक्तिमत्वाला प्रयत्नांची पराकाष्ठा करत पैलू पाडण्यात महापुरुष यशस्वी होतात म्हणूनच त्यांचं आयुष्य एखाद्या हिऱ्यासारखं अनमोल होतं. राजर्षी शाहू छत्रपती हे सुध्दा असेच आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक सद्गुणांचा संचय केलेले महापुरुष. कोल्हापूर राज्याला आणि बहुजन समाजाला सर्वच क्षेत्रात अग्रभागी आणण्यासाठी झटलेल्या या राजानं एवढं प्रचंड कार्य करुन ठेवलंय की, आजही समाजातील सर्वच घटकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करायला हवी. विशेषतः आजच्या युवापिढीनं शाहू महाराजांच्या काही सद्गुणांचा स्विकार करायलाच हवा. या सद्गुणांपैकीच एक महत्त्वाचा गुण म्हणजे नियमित व्यायामाने घडवलेली  बलदंड आणि सुदृढ शरीरसंपदा. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील युवापिढी सुदृढ व्हावी, त्यांना व्यायामाची आवड लागावी यासाठी आपल्या राज्यात अनेक तालमी स्थापन केल्या. या तालमीत व्यायाम करणाऱ्या मल्लांना राजाश्रय देऊन त्यांच्या खुराकाची, जेवणाची, निवासाची सारी व्यवस्था महाराजांनी केली. या पै

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *२ मे इ.स.१६५६* छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला. *२ मे इ.स.१६६५* *(वैशाख वद्य त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, मंगळवार)* दाऊद खान किल्ले कोंढाण्याच्या दिशेने :-          राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊद खान मराठ्यांच्या रेट्यासमोर टिकेनासा झाला. राजगड परिसरातून २ कोस मागे हटल्यानंतर त्याने आपला तळ गुंजन घेऱ्याजवळ दिला व तिथून एक दिवस विश्रांती घेऊन खेड शिवापुरच्या दिशेने स्वराज्याची नासधूस करत कोंढण्याच्या दिशेने सरकला. *२ मे इ.स.१६८३* छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोष तयार करणारे मुत्सद्दी कारभारी "रघुनाथ नारायण हणमंते" यांचे निधन. शिवरायांच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला आणि आपल्या सर्वाना शब्दाचा रास उघड झाला. आजही मरा

झुंझायाच्या गोष्टी ऐकताची सुख ।करिता देहदुःख थोर आहे ।।१।।तैसी हरिभक्ती सुळवरील पोळी ।निवडे तो बळी विरळा शूर ।।२।।पिंड पोसिलिया विषयांचा पाईक ।वैकुंठनायक कैचा तेथे ।।३।।तुका म्हणे व्हावे देहासी उदार ।रखुमादेवीवर जोडावया ।।४।।

झुंझायाच्या गोष्टी ऐकताची सुख । करिता देहदुःख थोर आहे ।।१।। तैसी हरिभक्ती सुळवरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ।।२।। पिंड पोसिलिया विषयांचा पाईक । वैकुंठनायक कैचा तेथे ।।३।। तुका म्हणे व्हावे देहासी उदार । रखुमादेवीवर जोडावया ।।४।। अर्थ - युद्धाच्या गोष्टी ऐकलेल्याच बऱ्या असतात. प्रत्यक्षात युद्ध लढायला गेले तर दुःखच दुःख असते. ।।१।। त्याप्रमाणे हरीभक्ती ही सुळावरील पोळी आहे. भक्तीच्या गोष्टी तोंडाने बोलणे सोपे असते. प्रत्यक्ष तिचे आचरण महाकठीण असते. जो भक्तीच्या कसोटीवर उतरतो तो आगळावेगळ वीर असतो. ।।२।। जीभेचे चोचले पुरवून शरीराचे पोषण जेथे केले जाते तेथे वैकुंठनायक भगवान कसा असणार ? ।।३।। तुकोबा म्हणतात, रखुमाईचा पती जोडायचा असेल तर माणसाने शरीरावर उदार झाले पाहिजे. (अंगामांसाकडे पाहून भक्ती होत नाही.) ।।४।। ।राम कृष्ण हरि। #तुका_म्हणे #वारकरी_संप्रदाय पेज वरून