झुंझायाच्या गोष्टी ऐकताची सुख ।करिता देहदुःख थोर आहे ।।१।।तैसी हरिभक्ती सुळवरील पोळी ।निवडे तो बळी विरळा शूर ।।२।।पिंड पोसिलिया विषयांचा पाईक ।वैकुंठनायक कैचा तेथे ।।३।।तुका म्हणे व्हावे देहासी उदार ।रखुमादेवीवर जोडावया ।।४।।
झुंझायाच्या गोष्टी ऐकताची सुख ।
करिता देहदुःख थोर आहे ।।१।।
तैसी हरिभक्ती सुळवरील पोळी ।
निवडे तो बळी विरळा शूर ।।२।।
पिंड पोसिलिया विषयांचा पाईक ।
वैकुंठनायक कैचा तेथे ।।३।।
तुका म्हणे व्हावे देहासी उदार ।
रखुमादेवीवर जोडावया ।।४।।
अर्थ -
युद्धाच्या गोष्टी ऐकलेल्याच बऱ्या असतात. प्रत्यक्षात युद्ध लढायला गेले तर दुःखच दुःख असते. ।।१।।
त्याप्रमाणे हरीभक्ती ही सुळावरील पोळी आहे. भक्तीच्या गोष्टी तोंडाने बोलणे सोपे असते. प्रत्यक्ष तिचे आचरण महाकठीण असते. जो भक्तीच्या कसोटीवर उतरतो तो आगळावेगळ वीर असतो. ।।२।।
जीभेचे चोचले पुरवून शरीराचे पोषण जेथे केले जाते तेथे वैकुंठनायक भगवान कसा असणार ? ।।३।।
तुकोबा म्हणतात, रखुमाईचा पती जोडायचा असेल तर माणसाने शरीरावर उदार झाले पाहिजे. (अंगामांसाकडे पाहून भक्ती होत नाही.) ।।४।।
।राम कृष्ण हरि।
#तुका_म्हणे
#वारकरी_संप्रदाय पेज वरून
Comments
Post a Comment