आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ६ मे इ.स.१४५२
सेंट झेविअर गोव्यात आला!
व त्याने इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. येशू ख्रिस्ताच्या निर्वाणानंतर त्यांच्या काही शिष्यांनी युरोपात स्थलांतर केले व युरोप मध्ये आपला धर्म वाढविण्याचा प्रयत्न चालू केला. 'ज्यू लोकांना बाटविण्यासाठी त्यांचा छळ करणे इ. गोष्टी इटली, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांमध्ये सुरू झाल्या. पुढे या गोष्टी पोर्तुगालमधून हिंदुस्थान व गोव्यात आल्या. हे करताना ज्यू लोक जे नवख्रिश्चन झाले ते त्या धर्माचे आचरण व्यवस्थित करतात की नाही. याचा शोध घेण्यासाठी ते न करणारांस शिक्षा देण्यासाठी ख्रिस्ती धर्मगुरू ९ वा ग्रेगरी पोप याने इ.स.१२३९ मध्ये इक्विझिशन (पवित्र न्यायसभा) स्थापन केले आणि त्यांच्या द्वारे लोकांचा अनन्वित छळ सुरू झाला. त्यातील काही नवख्रिश्चन ज्यू गोव्यात आले. गोव्यातही बाटवाबाटवीने नवख्रिश्चन झाले होते. त्या नवख्रिश्चनांना शिकविण्यासाठी सेंट झेविअर गोव्यात आला, ती तारीख होती, ६ मे इ.स.१४५२. आणि त्याने गोव्यात इक्विझिशन सुरू करण्याची मागणी केली. "पेतरोज" हा इतिहासकार म्हणतो. ६ मे इ.स.१४५२ हा दिवस गोव्याच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस. या दिवशी सेंट झेविअरचे पाय गोव्यास लागले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६३२
शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजी राजांना पराभूत करण्याबद्दल तह झाला शहाजहान व अदिलशहा यांच्यामध्ये १ महत्त्वाचा तह झाला, हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते. एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला. दुसर्या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६३६
आदिलशहा व मोगल बादशहा यांच्यामध्ये तह ठरला. त्यानुसार विजापुरकरांनी दिल्लीपतीचे प्रभुत्व मान्य करावे, निजामशाहीचा मुलुख दोघांनी वाटून घ्यावा, आदिलशहाने मोगल बादशहाची सरहद्द ओलांडू नये, या तहानुसार प्राप्त झालेल्या मुलूखाचा ताबा मोगलांना बिनतक्रार घेऊ द्यावा. निजामशाहीतील पश्चिमेकडील भीमा व सीना या दोन नद्यांमधील सोलापूर परिंडा किल्ल्यासह सोलापूर व वांगणी महाल, निजामशाही कोकण, पुणे व चाकण परतणे ईशान्येकडील भालकी व चिडगुपा हे परगणे हा सर्व मुलूख मिळून (दरसाल २०, वीस लक्ष होण वसुलीचा) "विजापुरकरांकडे तर उर्वरित मोगलांकडे जोडला जावा असे ठरले. + याशिवाय राजे शहाजीराजे यांच्या निजामशाहीस मान्यता न देता त्यांनी बळकावलेले जुन्नर, त्रिंबक, भीमगड इत्यादी किल्ले ते मोगलांना जोपर्यंत परत करीत नाहीत तोपर्यंत आदिलशहाने त्यांना थारा देऊ नये. अथवा आपल्या नोकरीत ठेऊ नये. आल्यास कैद करावे असेही एक कलम तहात होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१६५५
( वैशाख अमावस्या, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार )
मराठी फौज आणि रयतेचा चिवट प्रतिकार :-
आजच्या दिवशी दाऊद खानाने पुढे कूच करून टेहाळणी पथक लोहगड परिसरात पाठवले आणि आकस्मात मराठे मोगलांवर तुटून पडले. मोगलांची ताकद कमी पडते आहे असे समजताच दाऊद खानाने मिरझा जयसिंग, अचल सिंग, कुतुबुद्दीन खानला पाठवले. मात्र चिवट मराठे आणि रयत शर्थीने प्रतिकार करत होते. हाच प्रतिकार आणि गरीब रयतेची चिवट झुंज पाहून दाऊद खान मेटाकुटीला आला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मे इ.स.१६५६
रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. छत्रपती शिवरायांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस वेढा घातला व मे महिन्यात रायरी शिवरायांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मे इ.स.१६६७
औरंगजेब बादशहाने महाराजांच्या वकिलास बोलावून सांगितले की, "तुमचे मालकास कळविने की, तुमचे अपराध आम्ही माफ केले आहेत आणि तुमच्या मुलाला म्हणजेच युवराज शंभुराजे यांना चाकरीस ठेवून घेतले आहे. जो विजापुरी मुलूख तुम्ही जिंकाल तो तुम्हालाच देऊ आणि तुम्ही स्वतःचेच ठिकाणी कायम राहा. तुमच्याकडील प्रत्येक महाल तुम्ही शहजादा मोहम्मद मोअज्जमकडे रुजू करा". जुम्दतुलमकास हुकुमकेला. महाराजांच्या वकिलास कैदेतून सोडावे. महाराजांस सुद्धा लिहावे, विश्वासू जामीन दिल्यास आणि स्वतःच्या मुलास हजर ठेवले तर तुमचे अपराध माफ होतील. औरंगजेब बादशहाने महाराजांशी त्यांच्या म्हणण्यानुसार तह केला. महाराजांचा वकिल दिल्ली दरबारात राहीला. औरंगजेब बादशहाने विजापुरवरील स्वारीची लुट आणि ऐवज स्वतःकडे ठेवण्यास परवानगी दिली आणि युवराज शंभुराजे यांना पुन्हा "मनसबदारी" मिळाली. महाराज दक्षिणेत राहीले. महाराजांकडील सर्व महाल शहजादा मुअज्जमकडे देण्यात आले. महाराजांच्या मुळ जहागिरी व सरदेशमुखी या महाराजांकडे राहील्या.,
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ६ मे इ.स.१६८८
(वैशाख वद्य प्रतिपदा, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)
शहजादा अकबरासंदर्भात इंग्रजांचे पत्र !
शहजादा अकबराने इराणला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जहाजांची वगैरे सर्व तयारी होऊन, राजापुराहून ती येईपर्यंत व इराणच्या शहाचे फर्मान मिळेपर्यंत तो भडोचला सुरक्षित राहीला. पुढे राजापुरच्या फ्रेंच व व वेंगुर्ल्याच्या डच व्यापाऱ्यांकडून जहाजाची योजना करून दिल्यानंतर शहजादा अकबर इराणला गेला. शहजादा अकबराचा उद्देश सफल झाल्यासारखा होता कारण इराणच्या शहाने त्याला मदत केली. त्या संदर्भात एक पत्र उपलब्ध असून त्या पत्रानुसार जर सुलतान अकबराला ६० हजार स्वारांची केलेली मदत पुरली नाही, तर इराणच्या शहा त्याच्या पाठोपाठ मोठे सैन्य घेऊन निघणार आहे. इराणच्या शहाने शहजादा अकबराला दिल्ली तख्तावर स्थापन करण्याचे दाढीची शपथ घेऊन वचन दिले आहे. या आशयाचे हे पत्र आहे. अशा पत्रातून शहजादा अकबराच्या इ.स.१६८८ रोजी नंतरच्या हालचालींवर प्रकाश पडतो.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ६ मे इ.स.१९२२
राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले. महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली. इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩
Comments
Post a Comment