शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*२ मे इ.स.१६५६*
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायरी उर्फ रायगड ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला.
शिवाजी राजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
*२ मे इ.स.१६६५*
*(वैशाख वद्य त्रयोदशी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, मंगळवार)*
दाऊद खान किल्ले कोंढाण्याच्या दिशेने :-
राजगडावरून प्रचंड मार खाऊन निघालेला दाऊद खान मराठ्यांच्या रेट्यासमोर टिकेनासा झाला. राजगड परिसरातून २ कोस मागे हटल्यानंतर त्याने आपला तळ गुंजन घेऱ्याजवळ दिला व तिथून एक दिवस विश्रांती घेऊन खेड शिवापुरच्या दिशेने स्वराज्याची नासधूस करत कोंढण्याच्या दिशेने सरकला.
*२ मे इ.स.१६८३*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राज्यव्यवहार कोष तयार करणारे मुत्सद्दी कारभारी "रघुनाथ नारायण हणमंते" यांचे निधन. शिवरायांच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला आणि आपल्या सर्वाना शब्दाचा रास उघड झाला. आजही मराठीतील प्रचिलित असलेले शब्द शिवराज्यकोशात असल्याचे पाहून आनंद होतो.
सचिव, मंत्री, सभासद, न्यायधीश,
दुर्ग, कोशागार, शस्त्रागार, चषक,
सभा, लेखा, आय-व्यय (जमाखर्च), वेतन, ऋण, पतिभु (जामिन), कारागृह, आयपत्र, सहकारी, अनुक्रमणिका, सवांद, गणना. असे अनेक असंख्य शब्द आजही आपल्या वापरात आहे.
राज्यव्यवहारकोश विविध आठ
नावांनी ओळखला जातो .
१) राज्यव्यवहारकोश
२) राजकोश
३) शिवचरित्रप्रतीप
४) राजकोश नीघुन्तु
५) व्यवहारकोश
६) शिवराजकोश
७) श्री छत्रपती राजकोश
८) श्री छत्रपती राज्यव्यवहारकोश
*२ मे इ.स.१७३९*
गोव्याचे पोर्तुगीज आणि व्यंकटराव घोरपडे यांच्यात तह!
या तहात खोर्जुवे बेट आणि पनाळे बेट ही पोर्तुगिजांनी घेतलेली सावंतांची दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु मी दोन्ही बेटे त्यांनी सावंतांना परत करावी, असे कलम होते. परंतु ती दोन्ही बेटे पोर्तुगिजांनी सावंतांना परत केली नाहीत. तत्पूर्वी पोर्तुगिजांच्या संगनमताने सावंतांनी बार्देश व्यापिले होते. कारण मराठे बार्देश घेतील अशी भीती पोर्तुगिजांना वाटल्याने त्यांनीच सावंतांना बार्देश घेण्यास सांगितले होते.
*२ मे इ.स.१७३९*
छत्रपती शाहू महाराजांचे सरदार व्यंकटराव घोरपडे व दादाजी भावे नरगुंदकर या दोघांनी गोव्याच्या पोर्तुगिजांच्या तहाच्या करारावर सह्या केल्याची नोंद!
दादाजी भावे यांस पोर्तुगिजांकडून भरपूर लाच मिळाल्याने त्याने रायतूरच्या किल्ल्यावर हल्ला करण्यास चालढकल केली. नंतर मराठा सरदारांच्या डोळ्यास पाणी लावण्यासाठी लुटूपुटूचा हल्ला केला. पण त्यात दम नव्हता. दादाजी भावे व्यंकटराव घोरपडे आणि पोर्तुगीज आधिकारी यांच्यामधील तहाच्या वाटाघाटीचे एरंडाचे गुऱ्हाळ पुष्कळ दिवस चालले. व्यंकटराव यांचा दिवाण गोविंदपंत ठाकूर याने एक अट घातली की, पोर्तुगिजांनी त्यांच्या अमलाखालच्या हिंदुंकडून शेंडी कर वसूल करू नये व त्यांना त्यांनी संपूर्ण धर्मस्वातंत्र्य द्यावे. भावे यांचा दिवाण महादजी शेणवी याने "इंक्विझिशनच्या अधिकाऱ्यांनी हिंदूंच्या वाटेस जाऊ नये". अशी शर्त घातली. परंतू त्या दोन्हीही अटी पोर्तुगिजांनी मान्य केल्या नाहीत. त्यांनी सबब सांगितली की हा प्रश्न धार्मिक असल्याने त्यात ढवळाढवळ करण्याचा आपणास आधिकार नाही. व्यंकटराव घोरपडे आणि दादाजी भावे या दोघांनी पोर्तुगिजांकडून लाच घेतल्याने "ते त्यांचे मिंघे बनले होते. त्या दोघांनी तहाच्या करारावर दि. २ मे इ.स.१७३९ या दिवशी मुकाट्याने सह्या केल्या. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की ह्या लांछणास्पद करारावर छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्कामोर्तब केले नाही. पोर्तुगिजांनी युद्ध नुकसानी म्हणून मराठ्यांना ७ लक्ष रुपये द्यावे अशी अट तहाच्या कलमात होती. ह्या रकमेपैकी एक लक्ष रुपये आपणा स्वतःला मिळण्याची व्यवस्था दादाजीने अगोदरच करून ठेवली होती.
*२ मे इ.स.१८१८*
त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईज मनी अॅक्शन नुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नास्सक हिराही इंग्लंडला गेला.
*२ मे इ.स.१८४८*
क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी.
या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या १७३ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
*२ मे इ.स.१९२१*
स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानच्या अंधार कोठडीतून
दि.२ मे १९२१ रोजी सुटका झाली.
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
Comments
Post a Comment