आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳📜 ११ मे इ.स.१६६१
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 ११ मे इ.स.१६६१
इंग्लंडचा
राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालचा राजा चौथा जॉन ह्याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रीगान्झा ह्यांचे लग्न झाले. ह्या समारंभात पोर्तुगालच्या राजाने त्याच्या जावयाला - दुसऱ्या चार्ल्सला 'मुंबई' आंदण म्हणून दिली. पोर्तुगीझांनी त्यावेळी साल्सेट, माझगाव, परळ, वरळी, सायन, धारावी, आणि वडाळा स्वतःकडे ठेवून उरलीसुरली मुंबई इंग्रजांना देऊन टाकली होती.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१६६६
(वैशाख वद्य तृतीया, शके १५८८, पराभव संवत्सर, वार शुक्रवार)
महाराज शंभुराजेंसह आग्रा येथील सीमेवर!
५ मार्च इ.स.१६६६ महाराज अन् युवराज शंभुराजे यांनी (श्रीनृप शालिवाहन शके १५८७, फाल्गुन शुद्ध ९, नवमी, वार सोमवार) स्वराज्य माँसाहेब जिजाऊसाहेब यांच्या स्वाधीन करून, माँ साहेब जिजाऊंचे शुभाशिर्वाद घेऊन किल्ले राजगड सोडला आणि आग्र्याकडे कूच केले. महाराजांचे वय त्यावेळी ३६, छत्तीस वर्षाचे होते तर युवराज शंभुराजे यांचे ९, नऊ वर्षे. शेरास सव्वाशेर म्हणजे काय हे पुढे औरंगजेब बादशहास नक्की समजले. मात्र पिता-पुत्र आयुष्यात प्रथमच नर्मदापार करून शाही राजधानीचे वैभव प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणार होते. युवराज शंभुराजे यांच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे उभ्या आयुष्यात त्यांना महनीय पित्याच्या सलग व प्रदीर्घ सहवास घडला तो फक्त याच प्रवासात महाराजांच्या महनीय व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे, कठिण परिस्थितीतून मार्ग कसा काढावा इथपासून ते कुठल्याही परिस्थितीत मनाचे संतुलन ढळू न देता राजकारणाचे डावपेच याच काळात शिकता आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदवी स्वराज्याचा सेनापती जिवावरच्या संकटांनी घेतला असतानाही मृत्यूला वाकवून कसा ताठ मानेने जगतो हे प्रत्यक्ष डोळ्यांनी युवराज शंभुराजे यांना पहाता आले. महाराज युवराज शंभुराजे आग्र्याच्या सीमेवर पोहोचले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१६७८
महाराज किल्ले रायगडी परतले.
महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानीच्या दर्शनार्थ आले. श्रीभवानीची पुजा बांधून महाराज किल्ले रायगडी परतले. सुमारे १६ ते १७ महिने किल्ले रायगडापासून तसेच स्वराज्यापासून ते दूर होते..
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१६८१
(ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, शके १६०३, दुर्मती संवत्सर, वार बुधवार)
शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
औरंगजेब बादशहाच्या कपट कारस्थानामुळे शहजादा अकबराचा पुरता बिमोड झाला होता. त्याच्या बरोबर आता फक्त ३०० ते ४०० स्वार आणि चाणाक्ष दुर्गादास राठोड होता. औरंगजेब बादशहाने त्याच्या सर्व वाटा बंद केल्याने दुर्गादास राठोडच्या सल्ल्याने शहजादा अकबराने शेवटी दक्षिणेची वाट धरली. ९ मे इ.स.१६८१ त्याने अकबरपुर येथे नर्मदा नदी ओलांडली अन् शहजादा अकबराने छत्रपती संभाजी महाराजांना पत्र पाठविले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१७०१
गदगचा फौजदार शेरखान हा रसद आणित होता , राणोजी घोरपडे हे मोठे सैन्य घेऊन शेरखान वर चालून गेला . ही बातमी ऐकताच शहजादा बेदरबख्त हा त्वरीत निघाला . त्याने २५ कोसाची दौड केली , त्या मुळे एक हत्ती व काही घोडी वाटेत मागे राहिले . विजापूर प्रांतात लक्ष्मेश्वर जवळ युद्ध झाले . या युद्धात संताजी घोरपडे यांचा पुतण्या व बहिर्जीचा मुलगा भुजंगराव घोरपडे मारले गेले. मोगलांच्या कडील बरीच माणसे ठार झाली .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ११ मे इ.स.१७३९
मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩
Comments
Post a Comment