कोल्हापूर जिल्हा किल्ले ब्लॉक नंबर 4गगनगड

प्राचीन काळापासून वाहतूक व दळणवळणासाठी घाटांना अतिशय महत्त्व आहे. इतिहासकाळीच या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी व गरजेच्या वेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी जागोजागी किल्ले बांधले गेले. कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेच्या टोकावर गगनगडाची निर्मिती याच कारणातून करण्यात आली. सह्य़ाद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर हा गगनगड वसला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची आहे ६९१ मीटर. गगनबावडा हे गगनगिरी गडाच्या पायथ्याशी असलेले गाव. कोल्हापूरपासून हे अंतर आहे ५५ किलोमीटर आहे. हे गाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे येथील सर्व परिसर सदासर्वकाळ हिरवागार असतो,निसर्गरम्य वातावरण असून या गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे. बसस्थानकावरून गावात प्रवेश करताच सुरुवातीला दोन बाजूस दोन रस्ते फुटतात. त्यातील एक रस्ता करुळ घाटाकडे, तर एक रस्ता भुईबावडा घाटाकडे जातो. या दोन घाटांमधील मध्यबिंदू म्हणजे गगनगड होय. या दोन्ही घाटांवर लक्ष ठेवण्यासाठीच त्याची निर्मिती झालेली. गावातूनच गगनगडाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. अर्ध्या तासात आपण गडपायथ्याच्या वाहनतळावर पोहोचतो. गडावरील परम पूज्य चैतन्य गगनगिरी महाराजांच्या मठामुळे नेहमी भक्तांची वर्दळ असते. पायऱ्याच्या वाटेने गडचढाईस सुरुवात करायची. वळणावळणाच्या वाटेने वर गेल्यावर गडाचा अलीकडे नव्याने केलेला दरवाजा लागतो. हा दरवाजा रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत बंद असतो. त्यामुळे साहजिकच रात्रीच्या वेळेत गडावर जाता येत नाही. या प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस लेणी आहेत. ही लेणी म्हणजे गडाच्या प्राचीनतेचे प्रतीकच आहे, पण सध्या या लेण्याचे मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना बऱ्याचदा गगनगिरी महाराजांच्या नावावरून या गडास ‘गगनगड’ हे नाव पडले असे वाटते, पण गडाचे हे नाव प्राचीन आहे. या गडाची निर्मिती भोजराजाच्या काळात झाली आहे. गडाच्या मधल्या टप्प्यावर गगनगिरी महाराजांचे मंदिर आणि अन्य इमारती आहेत. या ओलांडत थोडेसे पुढे गेलो की, इतिहासकाळातील गगनगड सुरू होतो. गडाच्या मधल्या टप्प्यावर आलो की, एक मोठे पठार लागते. या पठारावर आलो की, भन्नाट वारा आपले स्वागत करतो. यापुढे गडाच्या बालेकिल्ल्याची चढण सुरू होते. बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगास एक छोटी टेकडी असून त्यावर छोटेखानी महादेव मंदिर आहे. या महादेवाचे दर्शन घेत बालेकिल्ल्याच्या चढाईस भिडायचे. जुन्या पायऱ्यांच्या वाटेने वर येतानाच दरवाजाचे अवशेष दिसतात. वर गहिनीनाथांचे मंदिर आहे. स्थानिक लोक या गैबीला गहिनीनाथ म्हणून ओळखतात. यावरून हे मंदिर गहिनीनाथाचे असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर फिरताना राजवाडा-शिबंदीच्या घरांचे अवशेष, ढालकाठीच्या निशाणाची जागा, छोटा तलाव आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. या अवशेषांना पाहतानाच गडाच्या इतिहासात शिरायला होते. शिलाहार राजवंशातील कीर्तिसंपन्न राजा महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) याने दक्षिण महाराष्ट्रात जे पंधरा किल्ले निर्माण केले. त्यातील एक किल्ला म्हणजे हा गगनगड होय. पुढे सिंधणदेव यादवाने भोज राजाचा १२०९ मध्ये पराभव केला. पुढे बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यावर याचा ताबा आदिलशहाकडे गेला. इ. स. १६६० मध्ये शिवरायांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. पुढे हुकूमतपन्हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावडय़ाची जहागिरी त्यांना बहाल केली. पुढे १८४४ च्या गडक ऱ्यांच्या बंडानंतर इंग्रजांनी तोफांचा मारा करून गगनगडाची बरीच पाडापाडी केली. त्यानंतर गडावरची सर्व वस्ती खाली गगनबावडा गावात राहू लागली. गगनगडाचा या इतिहासावरचे लक्ष भवतालचा निसर्ग हटवतो. बालेकिल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. तळकोकणातील सुंदर दृश्य दिसतात. हे सारे पाहात बसावसे वाटते. पावसाळय़ात तर याला उधाण येते. हिरवाईच्या विविध छटा या डोंगरावरून वाहात असतात. गगनबावडय़ाचे हे रूप पाहण्यासाठी दरवेळी या दिवसात एक चक्कर माराविशी वाटते.

हे गाव कोल्हापूर पासून ५५ किमी अंतरावर राज्य महामार्ग ११५ वर आहे. येथून गगनगड जवळ आहे. गगनबावडा या परिसरात पळसंबे गावानजीक डॉ. डी.वाय.पाटील साखर कारखाना आहे. गगनबावड्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गावांतून दोन घाट आहेत एक भुईबावडा व दुसरा करूळ घाट.. तालुक्याचे ठिकाण असून सर्व प्रशासकीय इमारती येथे आहेत.कोल्हापूरचे थंड हवेचे ठिकाण असलेले गगनबावडा कोल्हापूरपासून ५५ कि.मी.वर आहे. इथून कोकणात उतरायला दोन घाटरस्ते आहेत. एक करूळ इथे जाणारा गगनबावडा घाट, तर दुसरा खारेपाटणला जाणारा भुईबावडा घाट. गगनबावडा ऐन घाटाच्या तोंडावर वसले आहे. हिरवेकंच डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. घाटाच्या तोंडाशी आहे गगनगड किल्ला आणि त्यावर असलेला गगनगिरी महाराजांचा मठ. तिथपर्यंत उत्तम गाडीरस्ता आहे. गगनबावडा एस.टी 



महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. तपस्येच्या काळात संसारीक अडचणी नकोत व साधनेत कुणाचा व्यत्यय नको यासाठी बर्‍याच संतानी गिरीशिखरांचा किंवा कुहरांचा आश्रय घेतलेला दिसतो. योगी चांगदेवानी हरिश्चंद्रगडावर तप केले, एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावर किल्लेदार होते, गोरखनाथांनी गोरखगडावर तप केले असे मानले जाते, तुकारामांनी भंडारा डोंगरावर तप केले, तर रामदासांच्या निरनिराळ्या घळी प्रसिध्द आहेतच, पण त्यांनी समाधीही सज्जनगडावर घेतली. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मणदुरे गावचे श्रीपाद पाटणकर म्हणजेच गगनगिरी महाराज, जेव्हा दॄष्टांत झाला, तेव्हा तप करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले, त्यांना अपेक्षित एकांत एतिहासिक गगनगडावर भेटला. पुढे दाजीपुर जंगलात काही काळ तप केले, जे शिवगडाच्या भेटीत आपण पाहिले, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील, राजापुर तालुक्यातील आंबोळगडा जवळ एका कोरीव गुंफेतही त्यांनी तप केले. आज त्याठिकाणीहि आश्रम आहे. अर्थात यामूळे काहीश्या दुर्लक्षित अशा गगनगडावर अनेक बांधकामे उभारली गेली, भक्तगणांची गर्दी वाढू लागली, यात गडाचे गडपण मात्र गेले. तरिही थोडेफार अवशेष आजही अस्तित्व दाखवित उभे आहेत, चला तर आज जाउया गगनगडावर.
गगनगिरी महाराजांमुळेच गडाला गगनगड नाव पडले असा गैरसमज आहे, परंतु आहे उलटे. करवीर प्रांतातून दळण वळणाच्या सोयीसाठी कोकणात जे घाट उतरतात, त्यात करूळ घाट आणि भुईबावडा घाट हे महत्वाचे घाटमार्ग. पैकी करूळ घाट तुलेनेने सोपा आहे. या घाटावर देखरेख करण्यासाठी गगनगडाची उभारणी विक्रमादित्य भोज शिलाहारानी (दुसरा ) सन ११७८ ते १२०९ दरम्यान बांधला. कोल्हापुर परिसरात त्याने जे पंधरा किल्ले उभारले त्यापैकी हा एक. पुढे सिंदण यादवाने भोज राजाचा १२०९ मधे पराभव करुन हा भाग यादवांच्या अमंलाखाली आणला. नंतर बहामनी साम्राज्याचा हिरवा ईथे फडकला. मात्र बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यानंतर इथे आदिलशाही राजवट सुरु झाली.
पुढे शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला कधी आला याची नोंद नाही. पण कोल्हापुरपासूनचे जवळ अंतर व सोप्या घाटवाटा यावरून १६५९ ते १६६६ दरम्यान महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेउन त्याची दुरुस्ती केली. यानंतर हुकुमतपन्हा रामचंद्रपंत आमात्य यांच्या स्वामी निष्ठेवर प्रसन्न होउन छ्त्रपती राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावड्याची जहागिरी त्यांना बहाल केली. स.न. १८१८ ला मराठ्यांचा प्रतिकार खर्‍या अर्थाने संपून महाराष्ट्रावर ईंग्रजाचा अंमल सुरु झाला. मात्र अचानक १८४४ ला गगनगड, सामानगड यांच्या गडकर्‍यानी बंड केले, त्याचा प्रतिकार करताना ईंग्रजानी तटबंदीची बरीच पाडापाड केली. त्यानंतर गडाची बरीच वस्ती गगनबावडा गावात येउन राहू लागली.
सध्या कोल्हापुरातून कोकणात उतरायचे म्हणजे अत्यंत सोपा व कमी वेळेचा मार्ग म्हणजे करुळ घाट. त्यामुळे यामार्गे बर्‍याच एस. टी. बस जातात सगळ्या बस चहा पाण्यासाठी इथे थांबतात. खवय्यांसाठी महत्वाचे म्हणजे इथल्या स्टँडच्या कँटिनचा "कट वडा" आख्या होल ईंडियात फेमस आहे, त्याचा जरुर आस्वाद घ्या. गगनबावड्याला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात. तब्बल ६५० इंच पाउस ईथे पडतो. ढग संपुर्ण गडावर उतरलेले असतात. घाटातल्या प्रत्येक वळणावर फेसाळणारे धबधबे पडत असतात. अर्थात यावेळी गडदर्शन मात्र मनासारखे होत नाही. म्हणून एका निवांत दिवशी मी गगनगडाचा बेत आखला. काळ, प्रत्येक विवाहीत पुरुषाला थोडीफार मानसिक शांतता लाभते तो, म्हणजे अर्थातच मे महिना होता. सौ माहेरी गेल्यामुळे घरात शांतपणे बसणे शक्यच नव्हते. मस्तपैकी बाईक काढली आणि तांदुळवाडी जवळचा बहादुरवाडीचा भुईकोट पाहून कोल्हापुरामधे न जाता, थेट रंकाळामार्गे गगनबावडा रस्त्याने निघालो. पहिले लक्ष्य होते, "पळसंब्याची मंदिरे". विचारत विचारत फाट्यावर पोहचलो, तो एक महाविध्यालयीन तरूण चालत गावाकडे चालला होता, त्याला पळसंब्यात सोडले आणि मंदिराकडे जाणारा रस्ता विचारून घेतला.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...