आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*७ मे १६६०*
पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*७ मे १६७४*
छत्रपती शिवराय रायगडावर मुक्कामी.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
     
*७ मे १६८०*
राज्यभिषेकापुर्वी म्हणजेच इ.स. १६८० 'वैशाख वद्य ४ शके १६०२' च्या  मुरगुडच्या 'रुद्राप्पा देसाईला' पाठवलेल्या अभयपत्रावर ही "शोडशावली" राजमुद्रा प्रथम अाढळली.
'भोसले' घराण्यातील हि "शंभुराजांची राजमुद्रा" छत्रपती "शिवरायांच्या" मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी असुन उभी 'पिंपळपानी' ७ ओळींची हि "राजमुद्रा" स्वतःची 'अस्मिता' व 'रुबाब' व्यक्त करते.
राजमुद्रे प्रमाणे त्यांची 'मर्यादा' सुध्दा "शिवाजीराजेंच्या" मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे.
बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात ठरल्याप्रमाणे खंडणी वसुल केली जाईल असा आदेश देणारे असे हे पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पाठवले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४