आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२८ जून १६५३
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ जून १६५३* शहजादा मोहंमद आझम याचा जन्म आझम हा मुघल बादशहा औरंगजेबाचा मुलगा. अर्थात याच्या जन्माच्या समयी औरंगजेब अजून बादशहा झाला नव्हता. सध्याच्या मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे आझमचा जन्म औरंगजेबाची पहिली बेगम दिलरास बानू हिच्या पोटी झाला. बुर्हाणपूर येथे पुर्वी शहाजहानची बेगम मुमताज महल हिचा चौदाव्या अपत्याला जन्म देताना म्रुत्यु झाला होता. आझमव्यतिरिक्त दिलरास बानूला औरंगजेबापासुन तीन मुली व अकबर हा मुलगाही होता. इस १६५७ मधे औरंगाबाद येथे अकबराला जन्म दिल्यावर दिलरास बानू लवकरच निधन पावली. म्रुत्युनंतर तिला 'रबिया-उद-दुरानी' असे नावही मिळाले. इस १६६०-६१ मधे आझमने आईच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे एक भव्य मकबरा बांधला. पुर्वी शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता त्याच्याशी हा औरंगाबादचा मकबरा खुप साधर्म्य साधत होता. मात्र आझमने आईच्या स्मरणार्थ जरी हा मकबरा बांधला असला तरी तो 'बीवी का मकबरा' या नावाने ओळखला जातो. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ जून १६७७* दक्षिण हिंदुस्तानातील "देवेनापट्टण"