पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर व वारीचा इतिहास

 विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. श्री विठ्ठला विषयी अनेक कथा सांगितल्या जातात.

द्वापार युगामध्ये सत्यधर्माचा छळ करण्याचा सर्वश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देवगणा भुलविणे, सर्वसामान्यांना त्रास देणे ब्राह्मणांची हत्या करणे इत्यादी. वाढल्यामुळे 



 त्यावेळी श्रीविष्णूने बौध्य नावाचा अवतार घेतला आणि गयासुराला अग्निकुंडात भस्म करून त्याला नष्ट केले.

आणि नंतर त्याचा परमभक्त पुंडलिक ह्याची भेट घेऊन त्याला दर्शन दिले होते आणि मातापित्यांची अखंड व मनोभावे सेवा केल्याचे फळ म्हणून त्याला मोक्ष दिला.

 अशी थोडक्यात कथा सांगितली जाते.

त्याच पुंडलिकाची वाट बघत गेली अठ्ठावीस युगे विठोबा कटीवर हात ठेवून पंढरपुरास उभा आहे आणि भक्तांना दर्शन देतो आहे अशी भक्तांची धारणा आहे.

 या मंदिराचे सगळ्यात जुने सापडलेले संदर्भ विचारात घेतले असता इसवी सन 596 चे काही ताम्रपट सापडले त्यामध्ये पंढरपूर आणि आसपासच्या गावाचा उल्लेख सापडत आहे असं संशोधनाअंती संशोधकांना उल्लेख मिळाले. नंतर काही शिलालेखात सुद्धा पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराचा उल्लेख अभ्यासकांनी वाचला आहे.




ह्या पुरातन देवळाचा सोळाव्या किंवा सतराव्या शतकात जीर्णोद्धार करण्यात आला. परंतु बाराव्या शतकातील मूळ मंदिराचे अवशेष आजही ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात.

ज्ञानोबा माऊली व तुकोबांच्या पालखीची सुरुवात
सातारा जिल्ह्यातील आरफळ गावाच्या हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी व सोहळाकरून थाटामाटात ती पालखी पंढरपूरला नेण्याची सुरुवात केली आणि आज संगणकयुगात सुद्धा ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे.

तसेच तुकोबारायांचे पूर्वज विश्वम्भर बाबा हे ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज ह्यांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यातच पंढरीची वारी करण्याची परंपरा होती.

संत तुकाराम महाराज स्वतः नेहमी चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीला पंढरपूरला जात असत. तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज ह्यांनी ह्या वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.

तसेच तुकोबारायांचे पूर्वज विश्वम्भर बाबा हे ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज ह्यांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यातच पंढरीची वारी करण्याची परंपरा होती.

संत तुकाराम महाराज स्वतः नेहमी चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीला पंढरपूरला जात असत. तुकोबारायांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज ह्यांनी ह्या वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.

एकोणिसाव्या शतकापासून संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताई, संत एकनाथ महाराज, संत जनार्दन स्वामी, संत सावतामाळी आणि रामदास स्वामी ह्यांच्याही पालख्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात.

ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल-

ज्ञानदेवपूर्व काळ-भक्त पुंडलिकाचा काळ
ज्ञानदेव-नामदेव काळ
भानुदास-एकनाथांचा काळ
तुकोबा-निळोबा यांचा काळ
तुकारामोत्तर तीनशे वर्षांचा काळ
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.[३][५] वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.[६][७] ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.[८] संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[९] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.


महाराष्ट्रातील विविध गावांतून पालख्या पंढरपूरला येतात आणि पंढरपुरात वारीच्या वेळेला भक्तांचा महापूर लोटतो.
हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते. यामध्ये एक कमिटी देखील काम करते कि जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते. या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते कि जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात. तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते. एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे.

रिंगण-
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे.मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.

धावा-
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.

वारीचे दोन प्रकार आहेत.

आषाढी वारी - सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपुरात येतात.
कार्तिकी वारी - संतांच्या पालख्या यावेळी पंढरपुरातून आपापल्या गावाला जातात.
या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.

वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
 वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते.


वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत. वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात.मात्र ‘ परतवारी ‘च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वारीला ग्लॅमर आहे, तर ' परतवारी'ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण. अशी परतवारी नित्यनेमाने करणारे सुधीर महाबळ यांनी या विषयावर 'परतवारी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.


आषाढी एकादशीच्या पहाटे विठोबा रखुमाईची शासकीय महापूजा होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक ही पूजा करतात ह्याशिवाय दर वर्षी वारकरी संप्रदायातील एका दाम्पत्याला विठोबाच्या पूजेचे भाग्य लाभते.

यावर्षी आळंदीतून माऊलींची 21 तर देहूतून तुकोबारायांची पालखी 20 जूनला पंढरीकडे करणार प्रस्थान होणार आहे.
संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून 21 जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवेल. त्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. 22) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील.



वारी या विषयावर २०१८ साली आंतरराष्ट्रीय परिषदेत अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला गेला आहे.
वारी याविषयी अनेक पुस्तकं आहेत ती खलील प्रमाणे 
पालखीसोहळा उगम आणी विकास ( डॉ सदानंद मोरे )
तुकाराम दर्शन ( डॉ सदानंद मोरे )
आषाढी (डॉ. रामचंद्र देखणे)
एकदा तरी पायी अनुभवावी पंढरीची वारी (डॉ. सुरेश जोशी)
पंढरीची वारी (डॉ. वसुधा भिडे)
श्री पांडुरंग व पंढरी माहात्म्य (ज्ञानेश्वर म. इंगळे)
||पंढरी माहात्म्य|| (विठ्ठल दाजी धारूरकर)
वारकरी पंथाचा इतिहास (शं. वा. दांडेकर)
वारी एक आनंदयात्रा (संदेश भंडारे)
वारी एक आनंद सोहळा (दीपक नीलकंठ बिचे)
वारी : स्वरूप आणि परंपरा (डॉ. रामचंद्र देखणे)
विठाई (सकाळ प्रकाशन)
वारीच्या वाटेवर (महाकादंबरी दशरथ यादव)

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४