शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष**२६ जुन इ.स.१६६४*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*२६ जुन इ.स.१६६४*
सुरतकर इंग्रजांचे कारवारच्या इंग्रजांना पत्र !
           पत्राद्वारे त्यांनी छत्रपती शिवरायांपासून सावध राहण्याचा इशारा दिला.
पत्रातील मजकूर हा मराठ्यांचा राजा शिवाजी याविषयी होता. राजांचे फारच कल्पनातीत असे वर्णन त्यात केले होते व त्या आधीच्या पाच वर्षातल्या प्रमुख घटना पाहिल्या तर ते सत्य वाटण्याइतपत स्वाभाविक होते. खरेच, इसवी सन १६५९ ते इसवी सन १६६४ या कालावधीत शिवाजी राजांनी बलाढ्य अफझलखानास मारले होते, सिद्दी जौहर च्या वेढ्यातून राजे निसटले होते, कारतलबखनास उंबरखिंडीत पराभूत केले होते, तळकोकण जिंकले होते आणि इंग्रजांवर वचक बसवला होता, शाहिस्तेखानाची महालात घुसून बोटे तोडली होती, कुडाळ मोहीम करून डच व पोर्तुगीजांवर वचक बसवला होता आणि मोगलांची सुरत 'बदसूरत' करून टाकली होती. याचाच परिपाक म्हणून सुरतकर कारवारकराना लिहीत होते ते असे "त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रगट होतो. त्याला हर्क्युलीसचे सामर्थ्य आहे." इत्यादी...

*२६ जुन‌ इ.स.१६७७*
दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी बळकट ठाणे असलेला जिंजीचा किल्ला जिंकून घेतला आणि त्यांनी वेल्लोर किल्ल्याला वेढा दिला. भक्कम भुईकोट असणाऱ्या वेल्लोर किल्ला जिंकण्यासाठी वेळ लागू शकतो हे लक्षात येताच राजांनी वेल्लोरचा वेढा आपल्या सैन्यावर सोपवून स्वतः शिवाजी महाराज ६ हजारांचे घोडदळ घेऊन त्या भागातील आदिलशाहीचा सुभेदार शेरखान लोदीचा मुलुख ताब्यात घेण्यासाठी निघाले. महाराजांच्या हालचालीवर नजर ठेवून असलेला शेरखान २० जूनला आपल्या तिरुवाडी या ठाण्यावर पोहोचला. त्याच्या पाठलागावर असलेले महाराजही सैन्यासह २५ जूनला तिरुवाडीजवळ आले. यावेळी शेरखानाजवळ ८ ते ९ हजार सैन्यबळ होते.सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेणाऱ्या खानाच्या सैन्याची शिवाजी महाराजांच्या येण्याने घाबरगुंडी उडाली. शेरखानाच्या सैन्याने मराठ्यांचे सैन्य पाहताच पळून जाण्यास सुरुवात केली. सैन्य पळून गेल्याने शेरखानही उरलेल्या ५०० पठाणासह भुवणगिरीपट्टण कडे निसटून जाऊ लागला. 

*२६ जून इ.स.१६८०*
राजापूरचे सुरतेला पत्र...
बक्षिसाच्या मागणीबद्दल संभाजी राजास आम्ही पुन्हा एकदा लिहित आहोत कारण आता तो रायरीला गेल्याचे कळले आहे. आता त्याला आमच्या विनंतीकडे लक्ष देण्यासाठी थोडी उसंत मिळेल असे वाटते कारण बहुतांश राज्यावर आता त्याने अधिकार बसवला आहे. त्यामुळे तो कंपनीचे बक्षिस चालू ठेवण्याचा आदेश देईल किंवा आम्हाला काहीतरी उत्तर मिळेल असे वाटते.

*२६ जून इ.स.१६८०*
*(आषाढ शु.१० श. १६०२)*

२६ जून १६८० रोजी संभाजीराजांनी येसाजी कंक आणि रायगडाचे किल्लेदार चांगोजी काटकर यांच्या मदतीने रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि कारभार सुरू केला
वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी आपल्या पुत्राला क्षमाच केली होती तरीही बहुतेकांच्या मनात अजूनही संदेह होताच. रायगडावर कारभार सुरू झाल्यानंतर श्री समर्थ रामदासस्वामी यांनी शंभूराजांना त्यांच्या थोर पित्याची आठवण करून देत राज्यकारभार नेमका कसा करावा याकरिता एक विस्तृत पत्रच पाठवले. २६ जूनच्या राजापूरहून सुरतेस गेलेल्या इंग्रजी पत्रांतही छत्रपती संभाजी महाराज रायगडावर गेल्याचा निर्देश आहे [पसासं २२६५]. ऑमर्स म्हणतो की रायगडावर येत असता छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळ फक्त पाच हजार घोडेस्वार होते. त्यांची व राजाराम महाराजांची गडावर भेट झाली; त्या भेटीत द्वेष नसून प्रेम होतें.

*२६ जून इ.स.१८१८*
२६ जून १८१८ रोजी एल्फिन्स्टनने कलकत्त्याला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलला एक खास पत्र पाठवून कोरेगावच्या युद्धात कामी आलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोरेगावातच स्मारक बांधायची परवानगी मागितली होती. १९ सप्टेंबर १८१८ रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून त्याला परवानगीचे पत्र पाठवण्यात आले. एल्फिन्स्टनला ह्या स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी सांगण्यात आले. त्याला अशीही सूचना आली की ह्या स्मारकावर कोरेगावच्या लढाईत कामी आलेल्या सगळ्या सैनिकांची नावे इंग्रजीत, फारसीत, आणि मराठीत लिहिलेली असावीत. 

*२६ जून इ.स.१८७४*
"लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांचा कागल(कोल्हापूर) येथे जन्म."
मुळ नाव - "यशवंतराव जयसिंगराव घाटगे". १७ मार्च १८८४ रोजी त्यांना कोल्हापूर संस्थानात दत्तक घेतले आणि पुढे ते करवीर संस्थानाचे अधिपती झाले. करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता... ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते... म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते.... असे महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाले... अशा थोर लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंती निमित्त अभिवादन.... मानाचा मुजरा......

जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४