शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष**२५ जून इ.स.१६७०*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*२५ जून इ.स.१६७०*
एका पाठोपाठ किल्ले घेण्याचा तडाखा मराठ्यांनी चालूच ठेवला.
शिवछत्रपतींच्या आदेशानुसार किल्ले कर्नाळा आणि रोहिडा स्वराज्यात सामील केल्यानंतर तत्कालिन कोकण प्रांतातील आणि सध्याच्या "पालघर" जिल्ह्यातील "किल्ले कोहोज" मराठ्यांनी स्वराज्यात दाखल करून घेतला.

*२५ जुन इ.स.१६७७*
महाराज तिरुवाडीजवळ येऊन पोहोचले. 
           जुन महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात वेल्लोरहून महाराज जिंजीला आले व ६ हजार घोडदळ घेऊन शेरखानाच्या पाठलागावर निघाले. शेरखान लोदीचा मुक्काम यावेळी तिरुवाडीच्या किल्ल्यात होता. हा किल्ला त्याच्या सासऱ्याच्या ताब्यात होता. शेरखानाजवळ ३ हजार घोडदळ व ३ ते ४ हजार पायदळ होते. परंतु महाराजांचे नुसते नाव ऐकताच या सैन्याचा थरकाप उडे. शेरखान कुशल प्रशासक असला तरी युद्ध शास्त्रात तो अतिशय कच्चा होता. मुत्सद्यांच्या सल्ल्यावरही तो नेहमी विसंबून राही. या मुत्सद्यांना आपल्या सैन्य शक्तीचा अतिरेकी विश्वास होता. बहलोलखान विजापुराहून तातडीने मदत रवाना करील अशीही शेरखानाला आशा होती. परंतु तसे काही घडण्यापुर्वीच ६ हजार घोडदळासह महाराज तिरुवाडीजवळ येऊन पोहोचले.

*२५ जून इ.स.१६९३*
➡️"किल्ले सिंहगड मोहीम"⬅️
स्वराज्यनिष्ठ "नावजी बलकवडे" व "विठोजी कारके" यांनी निवडक मावळे सोबत घेतले आणि ते लोणावळा जवळच्या "किल्ले राजमाची" वरून निघाले.
पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रानतुडवत "किल्ले सिंहगड" च्या जंगलात येऊन पोचले व गडावरच्या गनिमावर हल्ला करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत ५ दिवस दबा धरून बसले.

*२५ जून इ.स.१७४०*
*(बुधवार, आषाढ शु. द्वादशी शके १६६२, रौद्र संवत्सरी)*
नानासाहेब वयाच्या सुमारे चौदा-पंधरा वर्षांपासूनच आप्पांबरोबर सातारा दरबारात येऊ लागले होते. त्यांचा मुक्काम बऱ्याच वेळेला साताऱ्यातच असे. त्यामुळे त्यांना राजकारणाचे उत्तम ज्ञान होते. शिवाय श्रीमंत बाजीरावांचे चिरंजीव म्हणजे त्यांच्याकडून बरंच काही शिकले
असणार, असा विचार करून शाहूमहाराजांनी दि. २५ जून १७४०, बुधवार, आषाढ शु. द्वादशी शके १६६२, रौद्र संवत्सरी सकाळी अदालत राजवाड्यात नानासाहेबांना पेशवे पदाची वस्त्रे बहाल केली. यात एकूण, १ मंदिल (पगडी), १ जामा (अंगरखा), १ चादर (शाल), १ पटका, १ इजार (सुरवार), १ तलवार, १ कट्यार, शिक्का, १ मोत्याचा तुरा आणि अंबारीसह १ हत्ती असे जिन्नस होते. दरबारात नानासाहेबांबरोबर आप्पांचाही मोठा सत्कार झाला. त्यावेळी 'चिमणाजी बल्लाळ पंडित' यांना १ मंदिल, १ जामा, १ शाल, १ पटका, १ सुरवार आणि १ मोत्यांचा तुरा देण्यात आला. मध्यंतरी बाजीरावांच्या काळात अंबाजीपंत पुरंदरे हे दौलतीचे निष्ठावंत सेवक वार्धक्याने मृत्यू पावले होते. त्यांचे पुत्र महादजीपंत पुरंदरे यांनाही मानाची वस्त्रे बहाल करण्यात आली. शाहूमहाराजांनी नानासाहेबांना ३० गाव मोकांसा म्हणून दिले. शिवाय विरूबाई राणीसाहेबांनी नानासाहेबांना ११० रु. किमतीची वस्त्रे दिली. पेशवाईचा समारंभ झाल्यानंतर चिमाजीआप्पा, नानासाहेब आणि महादजीपंत पुण्यात आले. पावसाळ्याच्या अखेरीस लगेचच नानांनी मोहिमेची आखणी केली होती. कारण बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सर्वबाजूंनी शजूंनी उचल खाल्ली होती.

जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...