पुणे जिल्ह्यातील किल्ले किल्ला ब्लॉग नं 1किल्ले संग्राम दुर्ग चाकण
https://youtu.be/-gjrEY_NlmU विजापूर बादशहाकडे हा किल्ला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तो जिकूंन घेतला. सोबत फिरगोजी नरसाळा यांना किल्ले दारीं वर कायम केलं.
(१७१३-१८१८) साली मराठा साम्राज्य कडून कडून हा किल्ला इंग्रजांनी अठराशे अठरा साली घेतला.
युनायटेड किंगडम
ईस्ट इंडिया कंपनी (१८१८-१८५७)भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला भारत सरकारच्या अधीन आला.
भारत (१८५७-१९४७)
भारत (१९४७पासून भारत सरकार च्या अधिपत्याखालीआहे)
👉परिस्थिती कशी आहे फोटोत पाहू?
https://youtu.be/-gjrEY_NlmU
👉संरक्षित भित व बुरुज अवशेष आहेत.
👉23 जून 1660 रोजी मुघल सेनापती शाइस्ताखान याने 20,000 तोफखान्यासह किल्ल्यावर हल्ला केला.
👉 त्यावेळी किल्लेदार (किल्लेदार) फिरंगोजी नरसाळा (वय 70 वर्षे) यांनी 320 मावळ्यांच्या फौजेसह किल्ल्याचे रक्षण केले)
👉संग्राम दुर्गा हा चाकण, पुणे जवळ वसलेला एक किल्ला आहे.
👉किल्ल्याचे मूळ क्षेत्र 65 एकर होते, सध्या फक्त 5.5 एकर आहे.
👉23 जून 1660 रोजी मुघल सेनापती शाइस्ता खान याने 20,000 सैनिकांच्या फौजेसह किल्ल्यावर हल्ला केला. अवघ्या 320शूर मराठ्यांनी हा किल्ला तब्बल दोन महिने लढवला.
20000 शत्रूसैन्याला झुंज दिली तोच हा संग्रामदुर्ग किल्ला.
👉 किल्ल्यामध्ये पुरातन विष्णू मंदिर आहे.. चाकण चौक पुरातन नाव विष्णूपुरम किंवा विष्णुपुरा होतं असं एक संदर्भातून.व दंतकथा तिथून सांगितलं जातं.
चाकणचे युद्ध..
चाकणला वेढा पडताच युद्धाला तोंड फुटले. मुघलांच्या आक्रमणाला किल्ल्यातून चोख प्रत्युतर मिळत होते. मुघलांचे सैन्य काही मीटर पुढे सरकले की किल्ल्यातून एक तोफेचा गोळा त्यांच्या दिशेने सुटायचा व घाईगडबडीने सगळे लोक मागे फिरायचे.
फिरंगोजी नरसाळा किल्ल्याचे रक्षण करत होता. त्याच्याकडे केवळ साडेतीनशे लोक होते. मुघलांना लक्षात आले की अशा उघड हल्ल्याने काही किल्ला बधणार नाही. मग त्यांनी सुरक्षा फळ्या तयार करुन आगेकूच करायचा प्रयत्न केला पण ते सगळे व्यर्थ जात होते. ह्यापुढे जाऊन मुघलांवर किल्ल्यातूनच रात्री बेरात्री हल्ले होत होते. रात्री किल्ल्यातून छोटी टोळी बाहेर पडायची व वेढ्याच्या एका भागावर हल्ला करायची. कधी दबक्या पावलाने जात त्यांच्या तोफांच्या बत्तीमधे पाचर ठोकून त्या निकामी केल्या जायच्या ह्यामुळे मुघलांचा संताप होत होता.
एक महिना गेला पण मुघलांना काहीच हाती लागत नव्हते. पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी त्यांचे मोर्चे होते त्याच ठिकाणी ते एका महिन्यानंतरही उभे होते. जुलैच्या मध्यापर्यंत शिवाजी महाराजांच्या सुटकेची बातमी इथे येऊन थडकली. त्यामुळे लवकर गडावर ताबा मिळवला नाही तर गडबड होईल असे वाटून मुघलांनी निकराचा प्रयत्न करायचे ठरवले. त्यांच्या छावणीपासून ते किल्ल्याच्या बुरुजापर्यंत भुयार खणायचे ठरले. किल्ल्यातल्या सैन्याला त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती.
मुघल सैन्याच्या अथक परिश्रमानंतर १४ ऑगस्ट १६६० ला किल्ल्याचा एक बुरुज त्याच्या खाली झालेल्या प्रचंड स्फोटाने हवेत उडाला. बुरुजावरील बरेच मावले त्याच्याबरोबर हवेत फेकले गेले. एकच गदारोळ माजला व मुघलांनी पटकन बुरुजावर मोठा हल्ला केला. भिंत पडूनही मराठ्यांनी मुघलांना आत शिरू दिले नाही. दिवस मावळला तरी मावळे भिंत लढवत उभे होते. रात्रभर लढाई चालू होती. दुसऱ्या दिवशी मुघलांना थोडे यश मिळाले व मराठ्यांना बालेकिल्ल्यात माघार घ्यावी लागली.
शाहिस्तेखानने राजा भावसिंहला मराठ्यांशी बोलून अभयदानाच्या बदल्यात किल्ला सोडायला सांगितले. मराठ्यांसाठी माणसे लाख मोलाची होती. फिरंगोजीने उरलेल्या मावळ्यांसोबत गड सोडला. शेवटच्या दोन दिवसात मराठ्यांचे बरेच लोक मारले गेले पण त्यांनी सहजासहजी गड सोडला नाही.
ह्या छोट्या किल्ल्याने ५६ दिवस वीस हजारांच्या मुघल सैन्याला दमवले. ते सुद्धा शिवाजी महाराज पन्हाळगडावर वेढ्यात सापडले आहेत हे माहित असताना - म्हणजे बाहेरुन काही मदत मिळण्याची अपेक्षाच करता येत नव्हती. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी फिरंगोजी राजगडावर गेला. मुघलांना इतके दिवस झुंजवून ठेवण्याच्या त्याच्या कमालीच्या पराक्रमाबद्दल त्याचा आदर सत्कार करण्यात आला..
👉आज 6/2/2022रोजी संग्राम दुर्ग चाकणचा भुईकोट किल्ला अभ्यास दौऱ्यासाठी कामानिमित्त जाण्याचा योग आला. अवघ्या 320 मराठ्यांनी औरंगजेबच्या मामाला शाहिस्तेखानाला वीस हजार फौजेला तब्बल 56 दिवस सळो की पळो करून सोडले होते. तोहा एतिहासिक संग्राम दुर्ग. किल्ल्याचे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. त्यांच्या नेतृत्वामध्ये हा किल्ला तब्बल छप्पन दिवस अजिंक्य ठेवला. विशेष म्हणजे या संग्राम दुर्ग मध्ये विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. चाकण नावाच्या च्या पूर्वी चाकण हे विष्णूपुरम किंवा विष्णुपुरा असे ऐतिहासिक संदर्भ समकालीन साधनात भेटतात. याला दुजोरा काही दंतकथा मधुन मिळतो.
https://youtu.be/-gjrEY_NlmU
लेखक माहिती संकलन :-नितीन घाडगे
Comments
Post a Comment