शिंदे छत्री जवळ माऊलींची पालखी का थांबते ?
शिंदे छत्री जवळ माऊलींची पालखी का थांबते ?
मराठ्यांच्या राज्याचे अखिल भारतीय साम्राज्य उभे करण्यात महादजी शिंदे यांचे मोठे योगदान आहे. महादजी यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती. ते वारकरी होते. नाकापासुन वारकरी गंध लावायचे. रणागंणावर तलवार गाजवणारे, दि ग्रेट मराठा म्हणुन नावलौकीक मिळवणारे महादजी उत्तम अभंगाची रचना करायचे. त्यांनी गितेवर भाष्य करणारा माधवदासी हा ग्रंथही लिहला होता. रोज भजन करण्याचा त्यांचा रिवाज होता.
श्री माऊली ज्ञानोबारायांवरील आंत्यतिक श्रद्धेपोटी त्यांनी आळंदीच्या समाधी मंदीराचे महाद्वार, विणामंडप व ओवरी चिरेबंदी दगडात बांधुन दिली. आळंदी व नान्नज ही गांवे माउलींच्या दिवाबत्तीसाठी इनाम म्हणुन दिले. पालखी सोहळ्याचे जनक वै. हैबतबाबा व वारीला राजाश्रय देणारे शितोळे सरकार हे ही शिंदे सरकारांशी संबधीत होते.
या विषयीची कृतज्ञता म्हणुन संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा पुण्यातील महादजी शिंदे यांच्या समाधीस्थळ (शिंदे छत्री) च्या जवळ थांबतो व आरती करून वंदन करतात.
Comments
Post a Comment