आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२८ जून १६५३

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ जून १६५३*
शहजादा मोहंमद आझम याचा जन्म
आझम हा मुघल बादशहा औरंगजेबाचा मुलगा. अर्थात याच्या जन्माच्या समयी औरंगजेब अजून बादशहा झाला नव्हता. सध्याच्या मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे आझमचा जन्म औरंगजेबाची पहिली बेगम दिलरास बानू हिच्या पोटी झाला. बुर्हाणपूर येथे पुर्वी शहाजहानची बेगम मुमताज महल हिचा चौदाव्या अपत्याला जन्म देताना म्रुत्यु झाला होता.
आझमव्यतिरिक्त दिलरास बानूला औरंगजेबापासुन तीन मुली व अकबर हा मुलगाही होता. इस १६५७ मधे औरंगाबाद येथे अकबराला जन्म दिल्यावर दिलरास बानू लवकरच निधन पावली. म्रुत्युनंतर तिला 'रबिया-उद-दुरानी' असे नावही मिळाले. 
इस १६६०-६१ मधे आझमने आईच्या स्मरणार्थ औरंगाबाद येथे एक भव्य मकबरा बांधला. पुर्वी शहाजहानने मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता त्याच्याशी हा औरंगाबादचा मकबरा खुप साधर्म्य साधत होता. मात्र आझमने आईच्या स्मरणार्थ जरी हा मकबरा बांधला असला तरी तो 'बीवी का मकबरा' या नावाने ओळखला जातो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ जून १६७७*
दक्षिण हिंदुस्तानातील "देवेनापट्टण" जिंकण्यासाठी "छत्रपती शिवराय" देवेनापट्टणच्या दक्षिणेला एक कोसावर येऊन पोहोचले……
दक्षिणेतील किल्ले भुवनगिरी वर छत्रपती शिवरायांनी चढाई केली. याच वेळी मराठा फौजा दक्षिणेतील बेलादपुर, देवेनापट्टणच्या भागात घुसल्या. 
(राज्याभिषेकानंतर महाराजांची हि शेवटची एकमेव मोहीम होती.)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ जुन १६८३*
जनार्दनपंत नारायण हणमंते यांना देवाज्ञा
स्वराज्यनिष्ठ जनार्दनपंत नारायण हणमंते कैलासवासी झाले. त्यांना देवरुख येथे देवाज्ञा झाली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*२८ जून १६८५*
मोहंमद मुअज्जम गोवळकोंड्यात दाखल.
इस १६८२ ते १७०७ अशी तब्बल २५ वर्षे मुघल बादशहा औरंगजेब दख्खनमधे लाखोंचे सैन्यासह झटत होता. यादरम्यान त्याने मराठ्यांविरूद्धच्या लढाईला काहीसी विश्रांती देत त्याची नजर आदिलशाही व कुतुबशाहीकडे वळवली व १६८६ व १६८७ मधे अनुक्रमे आदिलशाही व कुतुबशाही युद्ध करून जिंकून घेतली. 
त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मोहंमद मुअज्जमला औरंगजेबाने १६८५ मधे कुतुबशाहीवर पाठवले व त्याने गोवळकोंड्याच्या (भागानगर/हैदराबाद) किल्ल्याला वेढाही घातला. मात्र हा वेढा रेंगाळत चालला.  पुढे दोन वर्षे मुघलांना काही यश आले नाही. याचे कारण म्हणजे मुअज्जम आतुन कुतुबशहाला सामील होता. औरंगजेबाला ही बातमी मिळाल्यावर तो स्वतः तिथे आला व कपटनितीने व फितुरीने गोवळकोंडा जिंकला व शहा आलम म्हणजेच शहजादा मुअज्जमला शिक्षा म्हणून पुढे ७ वर्षे कैदेत टाकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२८ जून १७३७*
गुणजीराव शिंदे हे वसईच्या मोहिमेतील एक नामांकित सरदार होते. २८ जून १७३७ रोजी ते ४००० फौजे सकट व इतर सरदारांच्या साथीने बहादूरपुऱ्याहून वसईच्या कोटावर चालून गेले. परंतु अपयशी होऊन धारातीर्थी पडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४