शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष**२३ जून १५६४

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*२३ जून १५६४*
गोंडवानाची महाराणी, राणी दुर्गावती
२३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या (मूळ नाव सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां) नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली (या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते) जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले. राणीचेही मोठे नुकसान झाले.

*२३ जून इ.स.१६६१*
हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल
इंग्रज आणि डच पोर्तुगीजांना जड जाऊ लागले. इंग्रजानी तर पोर्तुगीांचा सर्वत्र पिच्छा पुरविला होता. त्यांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजाना कठीण गेल्याने त्याना समेट करावा लागला. इ. स. १६६१ साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरिना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याला देण्याचे ठरविले. दि.२३ जून १६६१ या दिवशी विवाहाचा करार पार पडला. पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले. शिवाय वीस लक्ष पोर्तुगीज 'कुझादश्' आणि आफ्रिकेतील 'टंजियर' शहरही दिले.

*२३ जुन इ.स.१६६९*
अटक व बनारस येथे भुकंपाचे उत्पात घडून आले. सुर्यग्रहणाच्या मुहुर्तावरच काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याचा हुकुम औरंगजेब बादशहाने सोडला. या पाशवी हुकुमाने निसर्गही थराला. अटक व बनारस येथे भुकंपाचे उत्पात घडून आले. या भुकंपामुळे ५० गज लांब जमीन फाटली.

*२३ जुन इ.स.१६८५*
छत्रपती संभाजी महाराजांनी कृष्णाजी कंक यांना बक्षिसाची मोईन करून दिली. 
           फोंड्याच्या लढाईत येसाजी कंक हे मराठा पायदळाचे सेनापती होते. येसाजी कंक हे स्वराज्य-निर्मितीचे कामातील महाराजांचे सहकारी. आग्रा भेटीच्या वेळी महाराजांबरोबर होते. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी येसाजी कंक महाराजांबरोबर कर्नाटक मोहिमेतही होते. महाराजांच्या पायदळाचे पहिले सेनापती नूरबेग होते. त्यानंतर शेवटपर्यंत पदाती नायक (पायदळाचे सेनापती) येसाजी कंक होते. 'त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक हे हजारांचे मनसबदार होते. ते फोंड्याच्या लढाईत धारातीर्थी पडले व येसाजी कंक हे जखमी झाले. "शके १६०५ रुधिरोद्रारी संवत्सर कार्तिक वद्य ७ सप्तमी, छत्रपती संभाजी महाराज इंडियास (बांद्यास) गेले. गावीकर फिरंगी यांनी कोटास वेढा घातला होता. त्यांसी लढाई करून वेढा उठविला. तेथे येसाजी कंक व त्यांचा लेक कृष्णाजी कंक याने युद्धाची शर्त केली.

*२३ जून इ.स.१७५७*
प्लासीची लढाई
जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली.

ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले. मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला.
या लढाईने ब्रिटीशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला. बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली. तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला.

*२३ जून इ.स.१७६१*
ज्येष्ठ वद्य षष्ठी शके १६८३,
मंगळवार म्हणजे दिनांक २३ जून १७६१ रोजी पर्वतीच्या वाड्यात श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांनी देह ठेवला..
मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाचं सुवर्णपान गळून पडलं.
जेव्हा कधी आयुष्यात शेवटचा श्वास घेईन त्या आधी शत्रूला “आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य” असं ठणकवणाऱ्या नानासाहेबांस विनम्र अभिवादन

*२३ जून इ.स.१८१७*
बेलापूर किल्ला
२३ जून १८१७ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता होती व त्या नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला , इंग्रजांच्या काळात हा किल्ला Bombay Presedinsy अंतर्गत येत होता १८१७ नंतर या किल्ल्याला उतरती कळा लागली आणि आज तो कसा बसा काही बांधकामाच्या अवशेषांच्या स्वरूपात मोडकळीस आलेल्या बुरुजाच्या स्वरूपात सिमेंटच्या जंगलात कसा शेवटच्या स्वरूपात आपल्याला पहायला मिळतो.

जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४