नागपूरकर भोसल्यांनी खंबा गाढून सुरू केलेली जगन्नाथाची रथयात्रा-हे भोसले मूळचे सातारा जिल्ह्यातील देऊर गावाचे इनामदार

नागपूरकर भोसल्यांनी खंबा गाढून सुरू केलेली जगन्नाथाची रथयात्रा 
             मध्ययुगीन कालखंडात बंगाल,बिहार आणि ओरिसा हे प्रशासनाच्यादृष्टीने एकत्र होते. ओरिसातील जगन्नाथ पुरीचे मंदिर म्हणजे भाविकासाठी प्रती काशी. चार धामापैकी एक. प्राचीन काळापासून जगन्नाथाची रथ यात्रा म्हणजे जगातील आगळावेगळा उत्सव. परंतु  खिलजी आणि त्यानंतर मोगलांच्या आक्रमणामुळे यात मोठी बाधा आली होती. त्यातल्यात्यात मोगलांचा सुभेदार अलिवर्दीखान हा मोठा जाचक असून त्याच्या कालखंडात यात्रेवर मोठा परिणाम झाला. शिवाय मंदिरातील मूर्तिही अन्यत्र हलवाव्या लागल्या. 
    


           अशावेळी मराठ्यांचे सेनापती श्रीमंत रघुजी भोसले नागपूरकर यांनी बंगाल प्रांतावर आक्रमण करून मराठ्यांची सत्ता स्थापन केली. 1751  ते 1803 या दरम्यान नागपूरकर भोसल्यांचे या भागावर वर्चस्व होते. मिर हबिब हा मराठ्यांचा पहिला सुभेदार नेमला गेला. त्यानंतर राजाराम पंडित, सदाशिवराव यांच्या काळात तेथे विशेष लक्ष दिले गेले. 
                 मरगळ आलेली जगन्नाथाची पुजा अर्चा मराठ्यांनी तेवढ्याच तोलामोलाने सुरू केली. येवढेच नाहीतर याकरिता कोणार्क याठिकाणाहून 34 फुट उंचीचा एक खांब (" अरुण स्तंभ") आणून तो मंदिराच्या समोर रोवला.  जणू तो शाश्वतेचे प्रतीक ठरला. भोसले येवढ्यावर थांबले नाहीत. तर मंदिराच्या पूजेकरिता त्यांनी वार्षिक 20,000 हजाराची तरतूद केली होती. महाराष्ट्रातून मराठी पुजारी नेऊन तेथील पूजेची व्यवस्था केली. अन्नछत्र सुरू केली, पुरीला जोडणारे रास्ते व पूल  बांधले, धर्मशाळा बांधल्या. 
              येवढेच नाहीतर मराठ्यांच्या 2000 सैनिकांचा तळ कटक येथे ठेवला. आजही हे स्थळ " मराठा बराक्स '' म्हणून ओळखले जात असून ओडिशा पोलीसासाठी वापरात आहे. याची जाणीव म्हणून आजही रथ यात्रेसाठी विशेष अतिथि म्हणून नागपुरकर भोसल्यांचे वंशज महाराज श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांना विशेष आमंत्रण असते. 
              कोरोंनासारखी महामारी सुरू असतानाही सर्वोच्च न्यायालयाने पुरीच्या रथ यात्रेला विशेष परवानगी दिलेली आहे. लाकडाच्या विविध 832 भागापासून बनविलेल्या आणि 45 फुट उंच, 34 x 34 फुट लांब व रुंद आणि 7 फुट उंचीच्या 16 चाकाचा रथ ओढण्यासाठी जवळपास 1500 भक्त लागतात. यावेळी भगवान जगन्नाथाचा नंदिघोष,बाळभद्रांचा तालध्वज आणि देवी सुभाद्राचा दर्पदलन रथ लाखोंच्या महासागरात मिरवत असतात. परंतु यामागे मराठ्यांचे फार मोठे योगदान आहे. हे मंदिरापुढे गाढलेला स्तंभ पाहिल्यानंतर ध्यानात येते.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...