आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳📜 १३ जून इ.स.१६६५
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष⛳
📜 १३ जून इ.स.१६६५
पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता.
त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले..
दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार :
१. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. .
२. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी..
३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल.
त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.)
प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल..
४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी..
५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा.
हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तह...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जुन इ.स.१६७४
इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला. १२ जुन इ.स.१६७४ इंग्रजांचा प्रतिनिधी (वकील) मुत्सद्दी हेन्री आक्झेंडनच्या करारावर प्रधानांच्या सह्या होऊन शिक्कामोर्तब झाले. झालेल्या तहावर महाराजांनी ताबडतोब सही करावी असे टुमणे आक्झेडनने राज्याभिषेकाच्या आधीपासूनच निराजीमार्फत लावले होते. पण महाराजांनी त्याची मुळीच दखल घेतली नाही. राज्याभिषेकानंतरही ४ दिवस पर्यंत महाराजांनी आक्झेडनला ताटकळत ठेवले. अखेर दि. ११ जुन इ.स.१६७४ करारावर महाराजांची सही झाली. व दि. १२ जुन इ.स.१६७४ प्रधानांच्या सह्या होऊन करारावर शिक्कामोर्तब झाले. व दुसऱ्या दिवशी हेन्री आक्झेंडन किल्ले रायगड सोडून निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जुन इ.स.१७४१
पोर्तुगीज सैन्याने सावंतांच्या ताब्यातील बार्देश प्रांत जिंकून घेतला. बार्देश प्रांतावर सावंतांचा उणा पुरा ३, तीन महिने अंमल होता. त्यादरम्यान पोर्तुगीज सेनाधिकारी तो प्रांत घेण्याची तयारी करीत होते. त्यांनी बार्देश मध्ये सैन्य घुसवून सावंतांच्या सैन्याला पिटाळून लावले. पोर्तुगिजांना सावंतांवर सुलभपणे विजय मिळविणे शक्य झाले कारण म्हणजे गोव्याच्या नविन व्हिसेरेईने पोर्तुगालहून येताना बरोबर आणलेल्या नविन पद्धतीच्या प्रभावी तोफा त्या दर मिनिटास ३२०, गोळे टाकीत असत. त्या तोफांच्या माऱ्यासमोर सावंतांच्या जुन्या पुराण्या तोफा टिकाव धरू शकल्या नाहीत यात नवल नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जून इ.स.१७५७
राज्यपदाच्या लोभापुढे कुराणाची शपथ लटपटली. इंग्रज आपली फौज घेऊन मुर्शिदाबादेवर चाल करून गेले. सिराजउदौला आपली फौज घेऊन प्लासी येथे गेला. (१३ जून १७५७)
इंग्रजांची फौज त्यावेळी १००० युरोपियन २१०० हिंदी सैनिक आणी ९ मोठ्या तोफा इतकी होती.
याउलट सुभेदार सिराजउदौला जवळ ५०००० पायदळ १०००० घोडेस्वार आणी ५० मोठया तोफा शिवाय फ्रेंचांचा तोफखाना सोबत होता. ठरल्याप्रमाणे लढाई सुरू झाली आणी मिरजाफर बहुतेक सर्व फौज घेऊन इंग्रजांस जाऊन मिळाला. या आकस्मित आपत्तीने सुभेदार घाबरून थोड्या इमानी लोकांसोबत राजवाड्यात पळून गेला. इंग्रजांच्या पाठलागामुळे सुभेदार फकिराच्या दिन वेशात एका खिडकीतून रात्रीत पळून एका बगिच्यात लपून बसला. हि बातमी मिरजाफरला समजली. शेवटी सुभेदाराला पकडण्यात आले.जाफरचा मुलगा सीरन याने सिराजउदौलास ठार केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜 १३ जून इ.स.१८१७
पुणे करार
पण ८ मे १८१७ रोजी एलपीस्टन ने पुणे शहरास वेढा दिला आणि नाकेबंदी केली. मग मात्र पेशव्याने त्रिंबकजीस पकडन्यासाठी जाहीरनामे काढले आणि सिंहगड, पुरंदर, वसई हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. मग एलपीस्टनने वेढा उठवला. यावेळी इंग्रजांनी रावबाजी बरोबर एक करार केला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराद्वारे इंग्रजांनी पेशव्याच्या उरल्या सुरल्या मुसक्याही आवळल्या.
कराराची कलमे खालील प्रमाणे .
पुणे तह - १३ जून १८१७
१. वसईचा तह कायम राहील शिवाय ,
२. पेशव्याने त्रिंबकजीस गंगाधर शास्त्र्याचा खुनी म्हणून मान्य केले आणि त्यास इंग्रजांचे स्वाधीन करण्यास कबुली दिली .
३. त्रिंबकजिस अटक होईपर्यंत त्याचे कुटुंब इंग्रजांच्या ताब्यात राहील .
४.सरदार , दौलतदार यांच्या कडील अकाबारनीस कारकून , वकील यांस पेशव्याने दरबारी ठेऊ नये . काही सवाल जबाब करावयाचे असले तर ते इंग्रजां मार्फत करावे .
५.इंग्रजांशी स्नेह असलेल्या करवीर , सावंतवाडीकर पेशव्याचा काही हक्क सांगू नये .
६. रावबाजीने इंग्रजांचे ५००० स्वर , ३००० पायदळ , तोफखाना यांचा खर्च चालवून ते स्वतः पाशी ठेवावे . त्यासाठी तोडून दिलेल्या ३४ लक्ष मुलुखावर आणि किल्यावर हक्क चालवू नये .
७. अहमद नगर च्या किल्ल्या भोवतालची ४००० हात चौफेर जमीन पेशव्याने इंग्रजांस द्यावी . इंग्रजी छावणीच्या बाजूची कुरणे कही करी द्यावी .
८. इंग्रज तैनाती फौजेपेक्षा कितीही फौज पेशव्याच्या मुलुखात ठेवतील त्यास पेशव्याने हरकत घेऊ नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
१३ जून इ.स.१८१७
बाजीरावांनी अखेर त्रिंबकजी डेंगळे ना पकडण्यासाठी 'दोन लक्ष रु. रोख आणि एक हजार रु. उत्पन्नाचा गाव इनाम' देण्याचे बक्षीस जाहीर केले. परंतु तरीही याचा काहीही उपयोग झाला नाही. इंग्रजांना त्रिंबकजींचे नखही दिसत नव्हते. एलफिन्स्टन मात्र दिवसेंदिवस वैतागत होता. त्रिंबकजी बाहेर राहणे हे इंग्रजी सत्तेकरता अत्यंत धोक्याचे होते. अखेरीस दि. ८ मे १८१७ या दिवशी इंग्रज पलटणींनी पुणे शहराला वेढा घातला आणि पेशव्यांना एक खलिता पाठवून दिला. त्यात एलफिन्स्टनने 'एकतर त्रिंबकजीला एकत्र नाहीतर रायगड, पुरंदर, सिंहगड आणि त्रिंबकगड हे चार किल्ले जामीन म्हणून इंग्रजांच्या हवाली करा' असा निर्वाणीचा इशारा दिला होता. यावर बाजीरावांनी
एलफिन्स्टनला पत्र पाठवले परंतु बाजीरावांच्या या पत्राचा एलफिन्स्टनवर काहीही परिणाम झाला नाही. त्याने त्रिंबकजीला पकडण्याची मागणी सुरूच ठेवली. इंग्रजांच्या ताब्यातून एकदा सुखरूप सुटलेल्या त्रिंबकजींना पुन्हा त्यांच्या हवाली करणे हे मूर्खपणाचे होते. या वेळेस एलफिन्स्टनने त्यांना जिवंतच ठेवले नसते. अखेरीस इंग्रजी पलटणी मागे घेण्याच्या बदल्यात पेशव्यांनी रायगड, सिंहगड, पुरंदर, त्रिंबकगड हे किल्ले अन् त्याशिवाय अहमदनगर, माळवा आणि बुंदेलखंडाचा काही भाग इंग्रजांना देण्याचे मान्य केले. दि. १३ जून १८१७ या दिवशु शनिवारवाड्यात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हाच तो अत्यंत नामुष्कीचा असा प्रसिद्ध 'पुण्याचा तह' पुण्याच्या तहनाम्यावर स्वाक्षऱ्या करून बाजीराव आषाढीच्या वारीनिमित्त पंढरपूरला निघून गेले. 'वारी' हे एक निमित्त होते. सर्वच 'वार'कऱ्यांना एकत्र बोलवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
📜१३ जून इ.स.१८१८
मालेगावचा भुईकोट ब्रिटिशांच्या ताब्यात
१३०० सैनिक व २५० बंदूकधारी घेऊन ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट मॅकडॉवल निकराने लढत होता. पण मालेगावचा भुईकोट किल्ला काही हाती येईना. त्यावेळी किल्ल्यात अरब सैनिक होते. गुप्तहेरांकरवी ब्रिटिशांनी दारूगोळा ठेवलेल्या जागेची माहिती मिळविली व तोफांनी तेथील तटबंदी उडवली. दारूगोळा जळून खाक झाला. १३ जून १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🏻
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩
Comments
Post a Comment