आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ आॅक्टोबर १६४३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ आॅक्टोबर १६४३*
बहादुरशाह (पहिला) मोगल सम्राटचा जन्म.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑक्टोबर १६८२*
सन १६८२ मध्ये मुघलांनी रामसेज किल्ल्याला वेढा दिला होता. हा वेढा सुरू असतानाच मुघल त्रिंबकगड घेण्याचाही प्रयत्न करत होते. रामसेजला वेढा असताना मराठी सरदार केशव त्रिमल याच किल्ल्यावरून रामसेजला युद्धसाहित्य व दारुगोळा पुरवत असत. मराठ्यांना रोखण्यासाठी मुघल सरदार खानजहान बहादूरने त्रिंबकगडाच्या तीन वाड्या जाळल्या होत्या. पण चिवट मराठ्यांनी या तीन वाड्या पुन्हा वसवल्या. मराठ्यांच्या हा हालचालीचे निरीक्षण नाशिकच्या ठाण्यावरुन मुघल करत असत. पुन्हा नोव्हेंबर महिन्यात आकरमतखान आणि मरहमतखान सैन्यासह त्रिंबकगडाजवळ गेले आणि त्यांनी त्या वाड्या जाळून तिथले लोक आणि जनावरे पकडली. रामसेज आणि त्रिंबकगडाचा वेढा सुरू असतानाच १६८२ च्या ऑक्टोबर महिन्यापूर्वी मुघलांनी नाशिकला ठाणे घातले होते. त्यानंतर मराठ्यांच्याही एका सैन्य तुकडीने नाशिकला जाऊन मुघलांच्या ठाण्याजवळाची काही गावे लुटली आणि त्या गावांना आगी लावल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑक्टोबर १६९६*
छत्रपती शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतर विस्कळीत झालेल्या मराठी सैन्याला एकत्र करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लाखो सैन्याचा पहारा असतानाही खुद्द बादशहा औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणारे मराठ्यांचे पराक्रमी सेनापती म्हणजे संताजी घोरपडे. मुघलांच्या जवळपास सर्वच मुख्य सरदारांना त्यांनी आपल्या पराक्रमाने पराभवाची धूळ चारली होती. मुघलांचा मराठयाच्या विरोधातील सर्वात यशस्वी सेनानी जुल्फिकारखान याचा सप्टेंबर‌ १६९६ मध्ये पराभव करून त्याला आपल्या सुटकेसाठी दयेची याचना करायला लावणाऱ्या संताजींना मात्र अखेरच्या काळात मोगलांच्या बरोबरच स्वकीयांशीही लढा द्यावा लागला. खुद्द छत्रपतींशी मतभेद होऊनही संताजीने अखेरपर्यंत स्वराज्याशी आपले ईमान राखत मोगलांशी झुंज दिली. २० हजाराहून अधिक सैन्याची खडी फौज बाळगून असणाऱ्या संताजीकडे अखेरीस ५ हजाराहून कमी सैन्य उरल्यामुळे ऑक्टोबर १६९६ मध्ये खानाच्या विरोधात लढताना त्यांना माघार घ्यावी लागली. खान त्यांचा पाठलाग करीत मद्रासच्या उत्तरेकडील पुलिकत पर्यंत येऊन पोहोचला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑक्टोबर १७४०*
सन १७३९ मध्ये पेशव्यांचा पोर्तुगीजांच्या वसईवर हल्ला झाला त्यावेळी मानाजी आंग्रेनी समुद्रातून त्याची नाकेबंदी केली परिणामी पोर्तुगीजांना बाहेरून मदत मिळेनाशी झाली.  १७४० मध्ये आग्र्यांनी पोर्तुगीजांच्या आरमाराचा नाश केला. परंतु पुढे तारीख १४ ऑक्टोबर १७४० मध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉय व पेशवे यांच्यात तह होऊन पोर्तुगीजांनी चौल प्रथम इंग्रजांच्या हवाली केले. या तहात इंग्रज मध्यस्ती करीत होते. पुढे नोव्हेंबर मध्ये तहाच्या कलमा पैकी पेशव्यांनी वागण्याचा भाग पुरा झाल्यावर इंग्रजांनी चौल  पेशव्यांच्या स्वाधीन केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ ऑक्टोबर १८०४*
दिल्लीवर यशवंतरावानी बरेच लहान मोठे हल्ले करून पाहिले. दिनांक १४ ऑक्टोबरला सर्व फौजेनिशी मोठा हल्ला चढविला. हे सारे हल्ले वाया गेले आणि नवे हल्ले करावे तर इंग्रज सेनापती लांब लांब मजला मारून दिल्लीनजीक आल्याची खबर यशवंतरावांच्या कानी आली. तेव्हा त्यांनी दिल्लीचा नाद सोडला. ते यमुना ओलांडून दुआबांत घुसले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ आॅक्टोबर १८४७*
महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होते. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ आॅक्टोबर १९५६*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४