समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी आणि ३९२ वर्षे पुरातन राममंदिर आहे. या राममंदिर ट्रस्टची अंदाजित अठराशे एकर जमीन आहे.

कसबे तडवळे तालुका उस्मानाबाद इथले ऐतिहासिक राम मंदिर. तडवळे हे गाव पूर्वी सोलापूर जिल्ह्यात होते. पंचक्रोशीत आठवडा बाजारासाठी प्रसिद्ध आहे. गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील आहे. येथे समर्थांचे शिष्य कल्याणस्वामी (डोमगाव) यांचे शिष्य जगन्नाथ स्वामी यांची समाधी आणि ३९२ वर्षे पुरातन राममंदिर आहे. या राममंदिर ट्रस्टची अंदाजित अठराशे एकर जमीन आहे. इथे दासबोधाची हस्तलिखित प्रत आहे. मंदिरात संगमवरवरी राम, सीता आणि लक्ष्मणाची मुर्ती आहे. त्याच बरोबर या गावात भैरीसाहेबाची समाधी असून, दर्गाह आहे. मुस्लीम व हिंदूबांधव याला जागृतदेवस्थान मानतात. येथील मानकरी असलेल्या पाच पाटलांना या दर्ग्यात उत्सवाच्या वेळी विशेष मान असतो.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसबे तडवळे येथील गावातल्या शाळेत दोन दिवस वास्तव्य केले होते. या गावात २२ व २३ फेब्रुवारी १९४१ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन दिवस वास्तव्य होते. त्यामुळे दलित समाजबांधवाच्या दृष्टीने या कसबे तडवळे गावाच्या भूमीला विशेष महत्त्व आहे. हे गाव बार्शी लातूर राज्य रस्त्यावर आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४