शिवकालीन जाधव पाटील घराणे

शिवकालीन जाधव पाटील घराणे
तळटीप:-सदर जाधव पाटील घराणे बहामनी कालखंडातील आहे याबद्दल आणखीन संशोधन सुरू आहे :-
सदर माहाजर अल्ली ही +***बशतदृक्ष हाजर विजयापूर जमर उबराव आठरा परगणे, 
तिनशे साठ किल्ले
बत्तीस महाल, सत्तावीस घाट
साहा सुभे दक्षण बारा वजीर,,अष्टप्रधान, बावीस उमराव, सब नाईक लहान थोर***री नांवनिशी बिनतपशीलवार******ता सदर
लोक
१खवासखान सरदेसाई
१भगंवतराव वाकनीस सर***
१रसुलबेगरवळे सर****
१नबीसाहेब बळे***
१घनशाम राव नाडगौड सर***
१ आबुदल नबी कोतवाल सर
१रायणा नाटकेर सर देशमुख
१सयद्दखान कोतवाल सर***
१भानजी आणि जी देशपांडे
१रेणोराव कानगो सर***
१मुसरपा नाइकवाडी सर***
चांदभाई मुलाणा सरदे **
हा मधुकर सुरूसन ९५०रविवार इणमगांव नक्षत्र ते दिवशी सब नाइक बहुर गांव परगणे याचे विधमाने लेहून दिल्हा ऐसाजे सदर** साने मौजे बडले नजीक **घुमर किनार ताडल आमोल परगणे मालसरा***कचेरी करड तख्त मजकूर येथील फफनाल पर धा गोसाजी वला**जी जाधव पाटील मोकदम मौजे मजकुरची पाटीलकी करीत हो**तो गाव नातावाणिकीस आला. दुष्काळ पडला बाकी धावयास काही अवकाश नाही. करार व्हाण १२५ सवाशे राहिले सरकारांत हुजूर विदित जाहले म्हणोन व ***आलपना यांणी हारकरदार वजा केले. मग बेशमी गोसाजी जाधव पाटील यास ***  करूज तख्त मजकूरास आणून तळवे मार देऊ लागले व राखेचे तो बरे. बाकी करिता वो (ओ) लीस ठेविला. राजश्री देशमुख व देशपांडे यांणी बादशाहपाशी अर्जो केली. मग  गोसाजी जाधव कबूल जाहला. की आपली बाकी कारिता म्हणोव राजी जाहला.  मग त्यांना***बादशाह हकरा पाहून कसर म्हाण  सवांशे वारलेस म्हणोन बादशाह आलपन्हा यांणी *** व माहाजर करून दिलासे, मौजे मजकुरची पाटीलकी तुझी तुला माफ असे. मोकदमीच्या मान पावाची नावनिशी बिनतपशीलवार_तपाशील.. 
होळीस पोळी
करे मुडी
दसऱ्याचे बकरे
सरकारची पट्टीपासोडी 
१कुंभारास खण
१घेण
१इनाम जमीन बिघे३०
१जिराइत जमीन चाहूर 2
१पुजारी चाऊरी-/-
१शेतास पाळगारा १
१हुरडा कबड१
१मोकदमीचा गर इरहास
कलमी सुभा असे
१चांभारासा जोडा. 
खंडाळ खांब जमीन पाड **७७व
१सवासीन गवर
१शेव भाजी
१तेलधार
१वडवल
१फसकी विडयाची पाने
१पोळयाचा बैलाचा मानी, 
जुलाई मांगास घडी, 
१पाय तांदूळ
१पांच तांदूळ
१राबता माहार
१मांगास
१हक्काके घेणे
येणेप्रमाणे आपली मोकदमी खाऊन सुखरूप राहाणे. 
राजश्री देशमुख व देशपांडे यांचे आज्ञेप्रमाणे चालणे. कोणी तक्रीशात कुफरान करून आपली मोकदमी म्हणेल तो दिवाणाचा गुन्हेगार असे. 
वंशपरंपरा आपली मोकदमी खाऊन पांढरीची नंतर
राहणे. हा माहाजर कोणी बतील करील तो बापाचा पूत्र नव्हे. आपला कुळक्षय करील. मुसलमान होऊन मोडतील त्यास सोराची सोंगद असे. 
हिंदू होऊन मोडील त्यास गोहत्या घडेल काशीत मात्रा गमन घडेल त्यास मांगामाहराचे वस्त्राचे शपथ असे. देशमुख व देशपांडे व पाटील कुलकर्णी यांसी सदर ताकीद असे. हा सदर माहाजर लेहून दिल्हा असे. तारीख छ १२माहेसकर ओळीसुमार २६ पत्राप्रमाणे साक्ष असे. 
१नरसिंगराव माने देशमुख परगणे मौजे वावीगांव
१धनाजी ताटे देशमुख परगणे काशीराव
१बजाजी निंबाळकर
१बाजी देशमुख परगणे कर्हाड
१संताजी नागटाल देशमुख पाटील
१रावजी बाजी देशमुख परगणे
आधळी स्वेक्करड देशमुख कसबे नाझर
देशमुख परगणे आटपाडी
१गंगाजी नाईक परगणे चीकुरडी
१बसापा देशमुख परगणे हुकेरी
१सिरजेराव घाटगे देशमुख कसबे कागल
१रंगराव देशमुख परगणे रासन
१संताजी देशमुख लोणी काळभोर कर
१ विठोजी काटे देशमुख बारामती
१माणकोजी देशमुख तपावगी
१बसापा देशमुख कसबे बेन्नूर
१मुरारराव देशमुख कसबे मुलाला
१नरसिंगराव देशमुख कसबे अक्कलकोट
साक्ष सरकार लोक
१कुशाबा शहरात किल्ला परांडा निसबत पेशकवज
१रमदुल्लाखान किल्ला रहिमतपूर निसबत पेशकवज
१हरोनी नयमेरा किल्ला नगर निसबत पेशकवज
१नफर(जफर असावे आमच्या अभ्यास नुसार) दिवाणसाहेब निसबत पेशकवज
१ निंबी स्नुल (रनुल) साहेब निसबत पेशकवज
१रमदुल सायब किल्ला धरून निसबत पेशकवज
१सदय महमूद साहेब बागलकोट निसबत पेशकवज
१हुसेन बेग साहेब निसबत पेशकवज
१दगुरराव दिवाणसाहेब निसबत पेशकवज
१मनुरखान साहेब निसबत पेशकवज 

शिक्का फारसी 
(गोलकार) 

साक्ष मौजे मजकुर
१**लयाळा यास देशमुख मजकूर
१कान्होजी पाटील व गथाड निसबत
१धुलगौडा पाटील मौजे परिसरात
१दरगौडा पाटील मौजे खुटवावी निसबत
१शेकाजी  गणू पाटील मौजे खडूस निसबत
१सुभानजी जगताप चौगुले
१ शकोजी माने पाटील मौजे गिरनत्री निसबत
१माणकोजी खरात पाटील मौजे निसबत
१शेटयाजी पाटील मौजे मालबरी निसबत
१शेटी, न्हावी, निसबत
जामनाक महार निसबत
______________________
वंशवळीतील अस्सल नोंद सापडला आहे त्यातील नाव-
रावजी आप्पाजी पाटील , 
पंढरीनाथ रावजी पाटील 
 आत्माराम रावजी पाटील 
मौजे बाडेल, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर
____________________






मा श्री रणजित दादा जगताप
(अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) 
सदर माहाजर संकलन:-
मा श्री संतोष झिपरे
(अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष) 
९०४९७६०८८८

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४