गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. प्राचीनदृष्ट्या ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या गावांणमध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे गाव महत्वपूर्ण आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे हे गाव म्हणजे आडवाटेवरच. परंतु या गावामध्ये प्राचीन बांधणीची अनेक मंदिरे आपणास पाहायला मिळतील. सोशल मीडिया टच उपलब्ध असल्यामुळे गुरसाळे गाव ऐतिहासिक दृष्ट्या प्रकाश झोतामध्ये आले आहे.
गुरसाळ्याला कसं जाल?
मुंबई,पुणे वरून सातारा मार्गे वडूज वरून गुरसाळे एसटी बस आहे.
कोल्हापूर मार्गे कराड पुसेसावळी वडूज वरून गुरसाळे छान पक्या बांधणीचा रस्ता तयार केलेला आहे.
सोलापूर मार्गे पंढरपूर मायनी निमसोड येथून गुरसाळे गावी जाण्यासाठी रस्ता आहे.
गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत.
या सर्वांमधील प्राचीन असा एक रामलिंग मंदिर बाराव्या अकराव्या शतकामधील असावा असा अंदाज तज्ञांच्या मते वर्तवण्यात येत आहे. या बांधकाम हेमाडपंथी बांधणीमध्ये आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोरच पुष्करणी अर्थात षटकोनाकृती शिवलिंगाच्या आकाराची पुष्करणी अर्थात बाराव आपणास दृष्टीस पडते.
त्या गावातील काही तज्ञांच्या मते काही दंतकथा सांगितल्या जातात. गुरसाळे नावाच्या पाठीमागचा इतिहास या दंतगते मधून उघडकीस येतो. गुरूंचे स्थान ते गुरसाळे. अशीच शी काही दंतकथा सांगितली जाते.
रामलिंग मंदिर बांधकाम पुर्ण दगडी पाषाण मध्ये आहे. चार दगडी खांबांवरती तोलतेल आहे. भारतामध्ये खजुरा हा लेणीमध्ये जी शिल्प आपणास पाहायला मिळतील तेथील शिल्पाची कामशिल्प या शिल्पाची साम्यता या मंदिरावरती पुढील बाजूस पाहायला मिळेल.आपल्या सातारा भागात अशी शिल्प फक्त सज्जनगड जवळच असणाऱ्या परळी येथील एका शिव मंदिरामध्ये पाहायला मिळतात.पुष्करणी मधून काही पायऱ्या चढत गेल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. या पुष्करणीमध्ये छोटे छोटे मंदिरे असून यामध्ये दगडी प्राचीन मूर्त्या दिसतात. याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे या पुष्करणी बारमध्ये कितीही दुष्काळ पडला तर पाणी आटत नाही.
©®लेखन :-नितीन घाडगे.
Comments
Post a Comment