आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२० ऑक्टोबर १६७१*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० ऑक्टोबर १६७१*
जंजिरा किल्ल्यावर सिध्दी चिवटपणे सत्ता राबवत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील जंजिऱ्यावर सतत हल्ले चालु ठेवले होते. जंजिराच्या समोरच दंडा राजपुरी होती. ती महाराजकडे होती. महाराज रायगडाहुन निघाल्याचे कळताच सिद्दीने बेसावध क्षणी दंडाराजपुरीवर हल्ला करून हे ठाणे आपल्या ताब्यात घेतले. महाराज येताच दंडाराजपुरीवर आरमारी हल्ला केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० ऑक्टोबर १६७९*
१८ ऑक्टोबरला मराठी आरमाराने इंग्रजांच्या आरामरावर हल्ला करून त्यांचे डोवर हे गुराब ताब्यात घेऊन ते खांदेरी किल्ल्यावर नेले. त्यामुळे इंग्रजांची रिव्हेंज ही फत्तेमारी एकटी पडली. पुन्हा दोन दिवसांनी खांदेरीच्या तोफांच्या टप्प्याच्या बाहेर नांगरलेल्या रिव्हेंजवर आणि गस्ती पथकाच्या मचवे आणि शिबाडावर हल्ला करण्यासाठी रात्री भरतीच्या वेळी मराठ्यांचे आरमार पुढे सरकू लागले. मराठ्यांच्या आरमारासमोर आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून इंग्रजानी आपले मचवे आणि शिबाडे रिव्हेंज जवळ आणली आणि तिला ओढत खांदेरी पासून २-३ किलोमीटर अंतरावर नेले. खांदेरी वरूनही इंग्रजांच्या पथकावर तोफा डागण्यास सुरुवात झाली. या गोंधळाचा फायदा घेत मराठ्यांचे आरमार खांदेरीवर पोहोचले. अश्या प्रकारे इंग्रजांना मात देऊन मराठ्यांनी खांदेरीवर पुन्हा रसद पुरवठा सुरू केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० ऑक्टोबर १६८२*
छत्रपती संभाजी महाराज आणि मुघल शहजादा अकबर यांची प्रथम भेट नोव्हेंबर इ.स.१६८१ मध्ये झाली. या भेटीनंतर काही दिवसानी अकबर शंभुराजेंच्या बरोबर जंजिऱ्याच्या वेढ्यात सामील झाला. जंजिरा हाती येण्याच्या शक्यता निर्माण झाल्या असतानाच मुघलांच्या संभाव्य आक्रमणाची चाहूल शंभुराजेंना लागली त्यामुळे राजे माघारी रायगडाकडे वळले. मुघल एकाचवेळी जमिनीवरून व समुद्रमार्गे स्वराज्यावर हल्ला करणार होते. मुघल स्वराज्यावर चालून आले आरमार सुरतेत अडकून पडावे म्हणून संभाजीराजे व अकबर यांचे ३० हजाराचे संयुक्त सैन्य मुघल पातशहावर चालून गेले. शहजादा अकबराचा सल्लागार आणि सहकारी दुर्गादास राठोड यांच्या बरोबर १२ हजार स्वार व २० हजार पायदळ होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० ऑक्टोबर १६९३*
सिद्धगड मुघलांच्या ताब्यात
१६९३ च्या ऑक्टोबर महिन्यात मातबरखानाने आपले लक्ष माहुली गडापासून बारा कोसांवरील सिद्धगड जिंकून केंद्रित केले. मराठे सैनिकांनी सिद्धगडावर आपले बस्तान बसविले होते आणि त्याच्या आश्रयाने माहुलीवर हल्ला करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यामुळे सुमारे सहा महिन्यांपासून मोगल सैनिक सिद्धगड हस्तगत करण्याच्या प्रयत्नात होते. २० ऑक्टोबर १६९३ रोजी मोगल लष्करातील लोमाणजी मावळा याने आणि इतर सैनिकांनी संधी साधली. रात्रीच्या सरत्या प्रहारात त्यांनी सिद्धगडाच्या तटाच्या भिंतीवर दोर फेकले आणि ते किल्ल्याच्या भिंती चढून गेले. तेव्हा गडावर तुंबळ युद्ध झाले. त्या चकमकीत सिद्धगडाचा किल्लेदार जखमी झाले आणि मोगलांच्या हाती लागले. सिद्धगड जिंकून घेण्यास मोगल सैनिक यशस्वी झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० ऑक्टोबर १७५५*
सावनूरवर स्वारी
मुजफरजंगाची चिथावणी सावनुरकर नवाबास मिळाल्यावर त्याने मुरारराव घोरपडे यास आपल्या पक्षात ओढले. कर्नाटकातून पेशव्यांची सत्ता उखडून टाकणे हा यांचा डाव पेशव्यास कळताच स्वतः नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊसह २० ऑक्टोबर १७५५ सावनूरवर जाण्यास निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० ऑक्टोबर १८००*
निझामाने इंग्रजांबरोबर मैत्रीचा करार करून इंग्रजांची तैनाती फौज स्वीकारली. आपले राज्य नेहमीसाठी संरक्षित केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
Comments
Post a Comment