स्तोत्र’ म्हणजे काय?
‘स्तोत्र’ म्हणजे काय? स्तोत्र
स्तोत्रपठणा बद्दल तुमच्या मुलांस ठाऊक आहे काय? ह्या नादशास्त्राचा आपल्या मुलाच्या भावनांशी कसा संबंध येतो? स्तोत्र का म्हटले जातात ते त्याच्यासाठी कसे उपयोगी आहेत याबाबत आपण कधी आपल्या पाल्या सोबत भाष्य केलंय चला तर जाणून घेऊया आपल्या वडिलधाऱ्यानी आपल्याला शिकवलेली "स्तोत्
‘स्तोत्र’ म्हणजे?
‘स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने मुलाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे सकारात्मक शक्तीं निर्माण होते. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते. याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे.
परंपरागत स्तोत्र
परंपरागत चालत आलेल्या प्रथेनुसार , सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी
कराग्रे वसते लक्ष्मी।
करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविंदम्।
प्रभाते कर दर्शनम्।
हा स्तोत्र म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं.यामुळे दिवसाची शुभ सुरवात होते अशी मान्यता आहे.
सरस्वती स्तोत्र
शारदा म्हणजे ज्ञानाला आधार देणारी. ... नमस्ते शारदे देवी वीणापुस्तकधारिणी ।
हे शुद्धता, सत्य, ज्ञान आणि सर्जनशीलतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्येची देवीचे आवाहन करते. असे म्हटले जाते की सरस्वती मंत्राचा जप केल्याने, तुमची वाढ आणि विकासात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही भाषण समस्यांपासून मुक्ती मिळवता येते. हे तुमचा आत्मविश्वास देखील वाढवते आणि मजबूत संभाषण कौशल्ये विकसित करण्यात मदत करते.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रान्विता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै: सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा ।।1।।
आशासु राशीभवदंगवल्लीभासैव दासीकृतदुग्धसिन्धुम ।
मन्दस्मितैर्निन्दितशारदेन्दुं वन्देsरविन्दासनसुन्दरि त्वाम ।।2।।
शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे ।
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात ।।3।।
सरस्वतीं च तां नौमि वागधिष्ठातृदेवताम ।
देवत्वं प्रतिपद्यन्ते यदनुग्रहतो जना: ।।4।।
पातु नो निकषग्रावा मतिहेम्न: सरस्वती ।
प्राज्ञेतरपरिच्छेदं वचसैव करोति या ।।5।।
शुक्लां ब्रह्मविचारसारपरमामाद्यां जगद्व्यापिनीं
वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम ।
हस्ते स्फाटिकमालिकां च दधतीं पद्मासने संस्थितां
वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम ।।6।।
वीणाधरे विपुलमंगलदानशीले, भक्तार्तिनाशिनि विरिंचिहरीशवन्द्ये ।
कीर्तिप्रदेsखिलमनोरथदे महार्हे, विद्याप्रदायिनि सरस्वति नौमि नित्यम ।।7।।
श्वेताब्जपूर्णविमलासनसंस्थिते हे, श्वेताम्बरावृतमनोहरमंजुगात्रे ।
उद्यन्मनोज्ञसितपंकजमंजुलास्ये, विद्याप्रदायिनि सरस्वति नौमि नित्यम ।।8।।
मातस्त्वदीयपदपंकजभक्तियुक्ता, ये त्वां भजन्ति निखिलानपरान्विहाय ।
ते निर्जरत्वमिह यान्ति कलेवरेण, भूवह्निवायुगगनाम्बुविनिर्मितेन ।।9।।
मोहान्धकारभरिते ह्रदये मदीये, मात: सदैव कुरु वासमुदारभावे ।
स्वीयाखिलावयवनिर्मलसुप्रभाभि:, शीघ्रं विनाशय मनोगतमन्धकारम ।।10।।
ब्रह्मा जगत सृजति पालयतीन्दिरेश:, शम्भुर्विनाशयति देवि तव प्रभावै: ।
न स्यात्कृपा यदि तव प्रकटप्रभावे, न स्यु: कथंचिदपि ते निजकार्यदक्षा: ।।11।।
लक्ष्मीर्मेधा धरा पुष्टिर्गौरी तुष्टि: प्रभा धृति: ।
एताभि: पाहि तनुभिरष्टाभिर्मां सरस्वति ।।12।।
सरस्वत्यै नमो नित्यं भद्रकाल्यै नमो नम: ।
वेदवेदान्तवेदांगविद्यास्थानेभ्य: एव च ।।13।।
सरस्वति महाभागे विद्ये कमललोचने ।
विद्यारुपे विशालाक्षि विद्यां देहि नमोsस्तु ते ।।14।।
यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत ।
तत्सर्वं क्षम्यतां देवि प्रसीद परमेश्वरि ।।15 ।।
राम रक्षा स्तोत्र
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धराः।। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने।।
- असे मानले जाते की दररोज श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात
- आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो.
गायत्री मंत्र
ओम भुभुव: स्व: त्सवितुर्वरेण्यम् भार्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात्।
- हा गायत्री मंत्राचा एक प्रकार आहे, जो हिंदू धर्मातील सर्वात शक्तिशाली मंत्र आहे.
- शिव गायत्री मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे, तो तुम्हाला मनःशांती देतो.गायत्री मंत्राचा जप दिवसातन तीन वेळा केला पाहिजे.
- गायत्री मंत्र सकाळी, दुपारी व संध्याकाळी सूर्यास्तःच्या पाहिले वाचणे उचित समझले जाते.
परमात्म्याचे स्मरण
जेवणा आधी प्रथम परमात्म्याचे स्मरण करावे किंवा त्यांना आभिवादन करून अन्न खायायला सुरवात करावी हे या श्लोका मागील उद्दिष्ट असावे.
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।”
- हा श्लोक म्हटल्याने तुमचे मुलाचे आरोग्य उत्तम राहायला मदत होते.
शुभम करोति कल्याणम
शुभं करोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार | .
दिव्यला देखून नमस्कार || १ || .
तिळाचे तेल कापसाची वात | .
दिवा जळो मध्यान्हरात | .
दिवा लावला देवांपाशी | .
उजेड पडला तुळशीपाशीं | .
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ || .
ऐक लक्ष्मि बैस बाजे | .
माझे घर तुला साजे | .
घरातली पीडा बाहेर जावो | .
बाहेरची लक्ष्मि घरांत येवो | .
घरच्या घरधण्याला उदंड आयुष्य लाभो || ३ || .
दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन | .
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते || ४ ||
- घरातल्या लहान बालकांने किव्हा मोठ्या थोराने दररोज सायंकाळी देवा जवळ तुपाचा दिवा लावावा व नंतर हात जोडून शुद्ध अंतकरणाने शुभं करोति म्हणावे.
- असे केल्यास घरात सुख शांती येते व ऐश्वर्य नांदते.
स्तोत्रपठण फ़ायदे
- आपल्या वास्तूमध्ये नेहमी चांगले संभाषण व्हायला हवे यात स्तोत्र चांगली भूमिका निभावतात
- उल्हासित वातावरण निर्मिती होते
- स्तोत्रपठण, मंत्रोच्चार होत असतील तिथे वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटायला लागते.
- मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.
- मंत्र, श्लोक, स्तोत्र हे लहान मुलाच्या मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती त्याच्या मनाला तणावमुक्त व उदार बनवते.
- मनाला शांती लाभते.
आपल्या पाल्याच्या चांगल्या आरोग्यासाठी स्तोत्राचे नियमित पठण करणेच योग्य आहे
Comments
Post a Comment