शिंदे कुळातील मराठा योद्धे हे जगविख्यात महाबलाढ्य विजयनगरच्या संस्थापनेतही दिसतात अगदी संगम घराण्याच्या सत्ताकाळात दख्खन स्वशौर्याने गाजविणारे हे नागवंशज मराठे,आपल्या समर्थ बाहुंवर यांनी चाळुक्य,काकडे/काकतीय,शिलाहार/शेलार या राजवटी तोलून धरल्या
अगदी सातवाहनोत्तर काळापासून विजयनगर कालखंडापर्यंत दखनेत सोलापूर,नगर,सातारा,धाराशिव व पश्चिम महाराष्ट्र आदी तथा कर्नाटक,वारंगळ,मैसूर,सिकंदराबाद आदी टापूत सेंद्रक-सिंद-शिंदे यांच्या इतिहासाची छाप कायम आहे,
त्यांचे अनेक ताम्रपट व शिलालेख येथे उपलब्ध आहेत,खूप तर वाचलेतही पूर्वी अनेकदा!
१४व्या शतकात काकतीयांसह मिळून खिलजीविरूद्ध लढणारे महादंडनायक सिंद नाग हे मराठे बऱ्याच अभ्यासकांना अद्याप ज्ञात नाहीत.
मराठा सम्राट
प्रतापरूद्र काकडे/काकतीय यासह इ.स.१३२७च्या लढाईत शिंदे अग्रणी राहून आक्रमकांविरुद्ध लढले,हे आक्रमण म्हणजे दख्खन वर झालेलं दुसर तीव्र आक्रमण,पहिलं आक्रमण देवगिरी-यादवांवरचं तर हे दुसरं काकडे/काकतीय यांवरचं,या संक्रमणावस्थेच्या काळात शिंदेंची भूमिका "दख्खनचे संरक्षक" म्हणून दिसते!
शिवाय हरिहर व बुक्क यांसह असणाऱ्या सेनानींमध्ये होयसळांसह शिंदे कुळातील मराठा योद्धे हे जगविख्यात महाबलाढ्य विजयनगरच्या संस्थापनेतही दिसतात अगदी संगम घराण्याच्या सत्ताकाळात दख्खन स्वशौर्याने गाजविणारे हे नागवंशज मराठे,आपल्या समर्थ बाहुंवर यांनी चाळुक्य,काकडे/काकतीय,शिलाहार/शेलार या राजवटी तोलून धरल्या.
एरंबर्गेमधून शिंदे स्त्रिया ही स्वतंत्र कारभार सांभाळताना ११व्या शतकात दिसतात,तर आमचेकडील परांडा-सोलापूर वगैरे भागावर अर्ध दशक अंमल होता शिंदेंचा तोही ११व्या शतकाच्या आरंभी!
Comments
Post a Comment