आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२ फेब्रुवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ फेब्रुवारी १६५२*
स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांचे २ फेब्रुवारी सन १६५२ रोजीचे एक दुर्मिळ पत्र.
संभाजी राजे हे शहाजीराजे सोबतच असे. पत्रातून व्यक्तिचा स्वभाव, धोरणं समजण्यास बहुमोल मदत होते. न्यायी स्वभाव हा भोसले घराण्याच्या अनुवंशिकतेनेच येतो असे पत्र वाचल्यावर समजते. न्यायनिवाडा कसा करावा हे या पत्रातून शिकता येते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ फेब्रुवारी १६६१*
छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडित कारतलब खानाचा 
पराभव केला.
छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह छत्रपती शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला 'सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -' असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला. मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे 'तुंगारण्य'. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्‍या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती - २ फेब्रुवारी १६६१.
प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ फेब्रुवारी १६८२*
छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ फेब्रुवारी १७०३*
मोगल छावणीतील बातमी पत्र
मराठयांच्या ह्या त्रासाने बादशाह ही गर्भगळीत झाला होता म्हणून की काय त्याने च्या जन्मजात संशयी स्वभावाला अनुसरून त्याच्या शयनगृहा भोवती असलेल्या बंधुकंधारी तुकडीतून २० हिंदू बरकनदाजांऐवजी मुसलमान बरकनदाज नेमले.
शेवटी ह्या सगळ्या त्रासास कंटाळून त्याने व्हराड खानदेशात मराठ्यांच्या मागावर असलेल्या झुल्फिकार खानास परत बोलावून सिंहगड वेढ्याच्या बंदोबस्तास बोलवावे लागले. परंतु तिकडे मराठ्यांनी नर्मदा ओलांडल्याने बादशहाने पुन्हा झुल्फिकार खानाची नियुक्ती  मराठ्यांच्या मागावर  परत केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२ फेब्रुवारी १९१३*
रामजी मालोजी सकपाळ यांचा मृत्यू 
(जन्म १४ नोव्हेंबर १८३८)
रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी हालबाहेरअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन  काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...