आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ फेब्रुवारी १६५८
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ फेब्रुवारी १६५८*
औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र
'शिवाजीचे मान्यतेसाठीचे विनंती पत्र आपल्या शाहजाद्याला आले, त्यामुळे त्याच्यापासुन आपल्याला संकट नाही', असा विचार करुन असावधानतेने जुन्नरमध्ये बादशाही सैनिक गाढ झोपलेले होते. राजांनी डाव साधला. २३ एप्रिल १६५७ रोजी वरील पत्राचे प्रकरण झाले आणि अवघ्या सात दिवसात ३० एप्रिल १६५७ रोजी राजांनी अचानक जुन्नर वर हल्ला केला. वैशाख कृ. द्वितीयेची ती रात्र मावळ्यांनी जुन्नरच्या परकोटाला दोराच्या शिड्या लावल्या, मावळे आत शिरले. पहारेकऱ्यांना मारुन त्यांनी लुटिस सुरवात केली आणि राजांनी जुन्नर लुटली. ३० एप्रिल १६५७ रोजी जुन्नर लुटून २०० घोडे, ३ लाख होन नगद, कापड, जडजवाहीर घेऊन महाराज स्वराज्यात म्हणजे चाकणला परतले.
याच वेळी औरंगजेब बीदर जिंकून कल्याणीस वेढा टाकण्यास निघाला होता. वाटेतच त्याला 'ही' बातमी समजली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने कार्तलबखनास जुन्नरच्या बंदोबस्तसाठी व होशेदारखान, रायकरणसिंह, रायसिंह, शाएस्ताखान, अब्दुल मुनीम वगैरे सरदारांना सरहद्दीवर रवाना केले. व त्यांना कडक हुकुम दिले, 'शिवजीच्या मुलुखांतील गावे जमीनदोस्त करा. लोकांच्या कत्तली उडवा! दयामाया दाखवु नका! त्यांचे सर्वस्व लुटून आणा! पुणे व चाकण ही शिवाजीची ठाणी धुळीस मिळवा! आपल्या मुलुखांतील जे कोणी शिवाजीला सामील असतील त्याची सरसहा मुंडकी उडवा!' पण कार्तलबखन जुन्नरकडे पोहचेल तोपर्यंत महाराज लूटिसह निघुन गेले होते. नंतर त्यांनी ४ जुन १६५७ रोजी मुघलांच्या ताब्यातील अहमदनगरवरही हल्ला चढवुन लुटालूट केली व तिथे युद्धही खेळले.
हे असे होणार हे महाराजांना माहित होतेच. त्यांनी आपला धूर्त व बिलंदर वकील रघुनाथपंत कोरडे याला औरंगजेबाकडे रवाना केले. कश्यासाठी? तर, जुन्नर व अहमदनगर येथील लूटीबाबत पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी! माफी मागण्यासाठी!
पंत औरंगजेबाकडे गेले. अत्यंत पश्चात्तापी मुद्रेने त्यांनी माफी मागितली. पण चुकुनही, 'आम्ही आपली लूट परत करतो' असे शब्द उच्चारले नाहीत! औरंगजेबाने राजांना माफ केले. त्याला कारणही तसेच होते. त्यावेळी मुघल बादशहा शहाजहान हा आजारी होता. आणि मुघलीया सल्तनतीच्या शाही रीवाजाप्रमाणे बाप आजारी पडला, म्हणजे त्याचे मूलं फार काळजी करत. कश्याची ? तर, आपला बाप मरण्याच्या आतच आपल्याला गादी कशी मिळेल याची! त्यामुळे औरंगजेबाला दख्खनमधून आग्र्यात जायचे वेध लागले होते. म्हणून ही माफी! त्याने राजांना पत्रही लिहीले,
'तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांज बरोबर जी पाविलीत ती आम्हास पावली. मजकूर ध्यानांत आला. तुम्हीं केलेलीं कृत्यें विसरण्याजोगीं नाहीत. तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चात्ताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणारा नाहीं हे तुम्ही जाणलेत. आता मनात तुमची सर्व नजर निभ्रांतपणे आमचेच ठायी आहे, हे आम्ही जाणून तुमच्या कृत्यांबद्दल कांहीही मनात किल्मिष ठेवीत नाही. तरी तुम्ही याबद्दल संतोष मानुन असावें. आमचे लोभाची पूर्तता समजावी.'
या पत्रावर तारीख होती जखर १ हिजरी १०६८ म्हणजेच दि १४ फेब्रुवारी १६५८.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ फेब्रुवारी १६६५*
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सिंधू सागराहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील बसरुरवरील सागरी आरमार मोहीमे अंतर्गत १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान महाराज बसरुरला पोहोचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ फेब्रुवारी १६६६*
औरंगजेब आग्रा येथे पोहोचला. शहाजहानच्या मृत्यूमुळे जनता मात्र शोकाकूल झाली. शोक-संतप्त प्रजा बंडाळी माजविते की काय अशी धास्ती औरंगजेबाला पडली होती. पण त्याच्या सुदैवाने तसे काही घडले नाही. २० साबानला औरंगजेब बादशहा आग्रा येथे पोहोचला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ फेब्रुवारी सन १६७९-८०*
इंग्रजांनी चोपड्याहून सुरतेस लिहिलेल्या पत्रातील माहिती अशी " छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने हा प्रदेश लुटून व जाळून फस्त केला आहे ज्या शहराचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात त्या लोकास छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही प्रकारचा उपसर्ग देत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ फेब्रुवारी १७५५*
रघूजी भोसले यांचा मृत्यू (जन्म १६९८)
नागपूरकर भोसले घराण्यातील एक शूर व मुत्सद्दी व्यक्ती. इतिहासात हा पहिला रघूजी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचे घराणे मूळचे पुणे प्रांतातील हिंगणीचे. त्याचा जन्म पांडववाडी (वाई-सातारा जिल्हा) येथे झाला असावा. त्याचे वडील बिंबाजी त्याच्या लहानपणीच वारले. त्याचे संगोपन आई काशीबाई व आजी बयाबायी यांनी केले असे दिसते. वयाच्या बाराव्या वर्षी कान्होजी भोसले (चुलता) याने त्यास सांभाळण्यासाठी वऱ्हाडात नेले. तेथून तो शाहू छत्रपतींच्या चाकरीत साताऱ्यास आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१४ फेब्रुवारी १७५७*
इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पत्र पाठवले
मराठी सैन्य जयनगरात काही काळ अडकून बसले. याला आणखी एक कारण आहे. यावेळी दादासाहेबांच्या सैन्यात फौज कमी होती व पैसा काहीच नव्हता. पेशव्यांचे आदेश मिळाले परंतु मोहिमेचा खर्च मात्र त्यांनी खंडणीमधून वसूल करावयास लावला होता. १४ फेब्रुवारी ५७ चे इंदूरहून राघोबांनी पेशव्यांना पाठविलेले हे पत्र पहा -
“आज इंदूरस पोचलो. होळकरांचे सैन्य मिळाले. दिल्लीच्या रोखे निघतो परंतु अब्दाली येवोन गेल्याने पैसा मिळणे सोय नाही. त्याचे पारपत्य करावे तर फौज नाही. तूर्त १५००० फौज आहे अधिक जमल्याविना जाणे अयोग्य. वार्ता मिळते की जाट झुंझू लागला आहे. शिपाई कजाख आहे. ईश्वरी दया व स्वामींचा प्रताप“
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment