आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ फेब्रुवारी
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ फेब्रुवारी १५०२*
एका व्यापारी जहाजातून पोर्तुगीज सरदार वास्को-द-गामा २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन दाखल झाला. गोव्याला भेट देऊन तो २९ ऑगस्टला परत गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी १५०२ ला तो मोठं आरमार घेऊन परत आला. रेशीम व सोने यांची लुटालूट करून परत गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ फेब्रुवारी १६८५*
सावंताने छत्रपती संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान छत्रपती संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ फेब्रुवारी १६८९*
रायगडचे किल्लेदार "चांगोजी काटकर" आणि "येसाजी कंक" यांनी छत्रपती राजाराम महाराजांस मंचकावर बसवले.
कारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांची निवड केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ फेब्रुवारी १७३२*
कुलाब्यास सेखोजी आंग्रे-बाजीराव भेट होऊन जंजिरा मोहीमेला सुरुवात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ फेब्रुवारी १७४२*
नाना फडणीसांचा जन्म सातारा येथे झाला. (मृत्यू: १३ मार्च १८००) बहुदा फुटक्या तळ्याजवळील नातू वाड्यात त्यांचा जन्म झाला असावा. तसे पाहीलेतर नारायणराव याचे खून झाल्या पासून २५ वर्ष अनभिषिक्त सत्तास्थानी ते होते .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ फेब्रुवारी १७९४*
'' द ग्रेट मराठा' - महादजी शिंदे'' स्मृतीदिन.......
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना ''द् ग्रेट मराठा'' असे म्हटले होत.पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
१२ फेब्रुवारी महादजी शिंदे यांचा स्मृतीदिन....महादजी शिंदे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment