आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*९ फेब्रुवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ फेब्रुवारी १६५८*
छत्रपती शिवरायांनी तुंग, तिकोना किल्ले जिंकुन स्वराज्यात आणले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ फेब्रुवारी १६६५*
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरकरांचे 'बसनुर' छापा घालुन लुटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बसनुरची स्वारी ही जलमार्गे केली, राजांनी नौकाप्रवास करुन सागर ऊल्लंघु नये ही अंधश्रध्दा उधळुन लावली.
शिवराय हिंदु धर्मातील परंपरांचा सन्मानपुर्वक गौरव गाणारे होते पण धर्मातील खुळचट रुढींना आपल्या चरीत्रात त्यांनी मुळीच थारा दिला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ फेब्रुवारी १६७०*
महाराजांचे वाढत्या आरमाराची धास्ती...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमाराने आरमारी प्रभावाने त्रस्त होऊन नाइलाजाने पोर्तुगिजांनी महाराजांच्या बरोबर तह केला व आपल्या हद्दीतही महाराजांच्या गलबतांना मुक्त संचार करण्यास परवानगी दिली. महाराजांच्या आरमाराला तत्कालीन सत्ताकर्ते किती घाबरत होते हे यावरुन दिसते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ फेब्रुवारी १६८९*
औरंगजेबाचा सरदार मुकरबखान याने छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केल्यानंतर रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकारोहण झाले. हिंदवी स्वराज्याचे ३ रे छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक दिन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ फेब्रुवारी १६८९*
येसाजी आणि सिदोजी फर्जंद यास कडेलोट केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ फेब्रुवारी १७४३*
गोव्याच्या व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद...! 
           "रामचंद्र बाबाजी यांची बडदास्त आम्ही चांगली ठेवली होती. तरिही ते आम्हाला न सांगता न सवरता इकडून गुपचूप निघून गेले". "मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, आमच्या शेजारच्या प्रदेशात जर रामचंद्र बाबाजी यांचे वास्तव्य झाले तर ते आम्हाला बिलकूल आवडणार नाही आणि त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांचा आपण पाठपुरावा केला तर त्यालाही आमची हरकत असेल".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ फेब्रुवारी १७५७*
प्लासीचा तह
प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांच्या राज्याचा पाया हिंदूस्थानात रोवला गेला असे म्हणतात.
सिराजउदौला अनेक गोष्टींमुळे पेचात सापडलेला होता. याचा फायदा घेऊन क्लाईव्हने त्याच्याशी ९ फेब्रुवारी १७५७ रोजी तह करून घेतला.
या तहानुसार सिराजउदौलाने मागील युद्धातले इंग्रजांचे नुकसान भरून दिले. तसेच तहात यानंतर सर्वांनी तटस्थ रहावे असे ठरले. परंतू इंग्रजांनी प्रामाणिकपणा न दाखविता फ्रेंचांविरोधात आघाडी उघडली व सिराजलाच मदत मागितली. क्लाईव्हने चंद्रनगरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४