सातारा येथील छ.शिवाजी महाराज संग्रहालयात हे तख्त जतन करून ठेवलेले आहे. साताऱ्याला गेलात तर या प्रेरणादायी पवित्र तख्ताचे अवश्य दर्शन घ्या
सातारा येथील छ. शिवरायांचे तख्त (गादी ). ह्याच पवित्र तख्तावर बसून छ. शिवरायांनी अनेक वर्षे स्वराज्याचा कारभार चालवला होता. शिवाजी महाराज ५६ दिवस अजिंक्यतारा किल्ल्यावर हवा बदलासाठी मुक्कामाला होते, त्यावेळी त्यांनी ही गादी वापरली होती, असे इतिहासकार मानतात. छत्रपती शिवरायांच्या वापरातील हे तख्त ३४८ वर्ष जुने असून सोन्याच्या तारा व वैशिष्ट्यपूर्ण जरीकामाने नटलेले आहे. हे तख्त १९६९ मध्ये मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाकडून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला प्राप्त झालं.
सातारा येथील छ.शिवाजी महाराज संग्रहालयात हे तख्त जतन करून ठेवलेले आहे. साताऱ्याला गेलात तर या प्रेरणादायी पवित्र तख्ताचे अवश्य दर्शन घ्या.
Comments
Post a Comment