*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*६ फेब्रुवारी
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १६७१*
शिवकालीन पत्रसार संग्रह, मुंबई ते सुरत
"दाऊदखान सालिहेरला होता. तो आपल्या मुलाच्या मदतीस बुर्हाणपूरला निघाला. तेवढ्यांत शिवाजीराजांनी साल्हेर घेतला."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १६७४*
महाराणी काशीबाई पुण्यतिथी
छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी महाराणी काशीबाई यांचे पाचाड येथे निधन...
महाराणी काशीबाई सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या.. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते.. छत्रपती शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला... त्या निपुत्रीक होत्या. त्यांचा मृत्यु ६ फेब्रुवारी १६७४ मध्ये झाला...
रायगडावर कुशावर्त तलावाजवळ उत्तरेस दोन समाध्या दिसतात या समाध्यांपैकी एक महाराणी काशीबाई आणि दुसरी मोरोपंत पिंगळे यांची आहे असे बोलले जाते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १६७५*
विजापूरच्या कारवार येथील सुभेदाराने बंड पुकारल्याने विजापूरमधे जो गोंधळ माजला त्याचा फायदा छत्रपती शिवाजीराजांनी घेऊन १६७३ सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी फोंड्यास वेढा घातला परंतु विजापूरचे सैन्य पन्हाळ गडावर चाल करून आल्याने राजांना फोंड्याचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच करावे लागले. १६७४ सालच्या सप्टेंबर महिन्यात महाराजांच्या एका सरदाराने पुन्हा वेढा घातला पण तिथल्या शिबंदीचा किल्लेदार महमदखान ह्याने किल्ला बरेच दिवस लढवल्याने महाराजांच्या सरदाराला वेढा उठवावा लागला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख वेंगुर्ला येथील इंग्रजी वखारातील एक अधिकारी अब्राहम ला. फेबर ह्याने Dutch Governor डच गव्हर्नर जनरल John Mastsuiker ह्याला लिहीलेल्या एका पत्रात केले आहे. त्याआधी इ.स १६७२ साली विजापूरचा सुलतान अली आदिलशहा मरण पावला त्याच्या पश्चयात विजापूर राज्यामधे जी दुही माजली त्याची संधी साधून छत्रपती शिवाजीराजांनी १६७५ सालच्या एप्रिल महिन्यात परत फोंड्यास वेढा घातला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात आढळतो. पहिला उल्लेख राजापूरच्या इंग्रजांनी दिनांक ६ फेब्रुवारी रोजी मुंबईला पाठवलेल्या पत्रातील असून दुसरा कारवार येथील इंग्रजांच्या दिनांक १४ एप्रिल १६७५ मधल्या पत्रातील आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १६८१*
शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी स्वतःस राज्याभिषेक करून स्वतःकडे सर्व धुरा घेतल्या. अशातच खानजहान बहादूरने औरंगजेबाकडे दारुगोळा व सैन्याची मागणी केली ती किल्ले रामशेज घेण्यासाठी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १७३८*
मोगलांचा कोय परगणा बाजीराव पेशव्यांनी लुटला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १७३८*
'बाजीराव म्हटल की फक्त मस्तानीच काहीजणांना आठवते.' बाजीरावांची परकीय शत्रूंना किती दहशत होती ते पहा..
"जर बाजीराव विजयी झाला तर मग त्याच्याशी लढणे कुणालाच शक्य होणार नाही आणि जर तो पराभूत झाला तर त्याचे माघार घेणारे सैन्य इकडे साष्टी बेटात येऊन तळ ठोकून राहण्याचा संभव आहे. ह्या दोन्ही प्रसंगी आम्हाला साष्टी बेट घेणे अशक्य होईल"
पोर्तुगीजांचा गोव्याचा व्हाॅइसराॅय कौंट द सांदोमिल याचे उत्तरेकडील सेनापती आंतोनियु कार्दिम फाॅइश याला पत्र..
दिनांक - ६ फेब्रुवारी १७३८
स्थळ - गोवा
पोर्तुगीज दप्तर खंड तिसरा पत्र क्रमांक - ८१
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १९३२*
पहिली क्रांतिकारी महिला बिना दास यांनी बंगालचे गर्वनर स्टॅन्ले जॅक्सन यांचे हत्येचा ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रयत्न केला.
कोलकाता विद्यापीठाचे दीक्षांत समारंभात त्यांनी स्टॅन्ले जॅक्सन यांचेवर पिस्तुलातून ५ गोळ्या झाडल्या. त्यांना ९ वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. पदवीदान समारंभातच त्यांना अटक झाली व त्यांना त्यावेळी पदवी दिली नाही.
पतीच्या निधनानंतर त्या ऋषिकेश येथे अज्ञातवासात गेल्या. तेथेच २६ डिसेम्बर १९८६ रोजी निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ फेब्रुवारी १९३९*
महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) स्मृतिदिन
(जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३)
हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment