आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*८ फेब्रुवारी १६६५*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ फेब्रुवारी १६६५*
एक हिंदू राजा सिंधुबंदी व धार्मिक चालीरीती झुगारून देऊन स्वतः सैन्याचे नेतृत्व करून दोन बलाढ्य देशांच्या पलीकडील राज्यावर आरमारी मोहीम काढतो हि तत्कालीन भारताच्या समुद्री इतिहासातील विलक्षण घटना आहे.
भारताच्या हजारो वर्षांच्या आरमारी परंपरेस खंड पडलेला असताना, अनेक धार्मिक चालीरितींचा ऊत आलेला असताना आणि लढाऊ आरमार बाळगण्याची पोर्तुगीज-इंग्रज-फ्रेंच-डच-सिद्दी यांच्याशिवाय अन्य कोणासही परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दि. ८ फेब्रुवारी १६६५ रोजी मालोंड बंदर येथून बसनूर मोहिमेची सुरुवात केली.
स्वतःचे आरमार उभारल्यानंतर छत्रपती शिवरायांनी पहिली आरमारस्वारी कर्नाटकमधील 'बसनूर'वर काढली. मोहिमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वतः ह्या सागरी स्वारीचे नेतृत्व केले. सिंधू सागराहून निघालेली पहिलीच सागरी मोहीम होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ फेब्रुवारी १६८३*
१६८३ च्या अखबरातून ह्या गोष्टीस दुजोरा मिळतो . बहादूरखान कळवितो, "फिरंग्यांचे २ किल्ले छत्रपती महाराजांनी संभाजीने घेतले. त्याचा विचार आहे की तोफखाना तयार ठेवून सुरतेहून माझ्याकडे [ कल्याण ] येणाऱ्या जहाजास आडवावे. म्हणोन मी सिद्दी याकूतखानास जमेतीसह तिकडे पाठविले आहे, नंतर खानाने एक किल्ला पाडून अनेक लोकांस मारले. किल्ला हाती आला नाही म्हणोन मी मोहरमच्या २७ तारखेस लढाई केली; अनेकांना मारले, किल्ला पाडून टाकला, नंतर कल्याण-भिवंडीला आलो, माझ्याकडे येणाऱ्या जहाजांची ये - जा चालू आहे (वास्तविक, हे सरदार मंडळी बादशहाला, खोटा पराक्रम, विजय सांगत असत, बादशहा सुद्धा हे सर्व पुरता ओळखून होता, त्यात बहादूरखान ह्या सर्वच बाबतीत अग्रेसर होता.)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ फेब्रुवारी १६८९*
छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी कृष्णभट्ट उर्फ  आप्पाशास्त्री दीक्षित ह्यांचे बलिदान

महाशिवरात्री अवघ्या चार - पाच दिवसांवर आली होती. गावो गावच्या शिवालयात त्याची तयारी ही सुरू होती. परंतू बत्तीस शिराळा त्यास अपवाद होते. कारण गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गावात एखादा माजलेला वळू शिरावा तशी एक मोगली तुकडी बत्तीस शिराळ्यात घुसली होती. कोणास ही मागमूस लागू न देता मोगलांनी शिराळ्याच्या कोटा जवळ पूर्ण छावणी न करताच मुक्काम टाकला होता.  
दस्तुरखुद्द छत्रपती शंभाजी महाराजांना कैद करून मुकररबखान पुढे कऱ्हाड ला गपचूप निघाला होता. 
परतूं शिराळ्यात ही बातमी शेवटी फुटलीच.
खबर एकूण आप्पाशास्त्री व इतरांचा धीर सुटला होता.
आता असेच तडक जावे अन मुकररबखानास मातीत मीळऊन स्वराज्याच्या धन्यास  सुखरूप परत आणावे अशा विचाराने त्या रांगड्या गड्यांचे बाहू स्फुरण चढू लागले होते. कारण विचार करावयास जास्त वेळ न्हवता. 
कारण इतरांच्या मदतीस थांबलो व जर  मुकररब इथून पुढे कऱ्हाड ला ओलांडून पूर्वेकडील मोघली प्रदेशात पुढे गेला तर उघड्या मैदानावर त्याला अंगावर घेणे जड जाईल. म्हणून जास्त विचार न करता आप्पाशास्त्री ठाणेदारला हाताशी धरत त्याचे पथक दिमतीला घेत गावातील काही लढाऊ लोक व स्वतः आप्पा शास्त्रीनीं स्थापन केलेल्या तालमीतले तगडे मल्ल घेऊन मुकररबखनाच्या गोटावर चालून गेले. 
मुकररब खान पूर्ण सावध होता. त्याने घेतलेली झेप त्यास एक आकस्मित यश देऊन गेली होती. व हे यश अलगद बादशहाच्या झोळीत टाकण्यास तो कितीही आतुर असला तरीही बेफिकिरी मुळे क्षण भरात होत्याचे नव्हते होऊ शकते हे तो जाणून होता. तसा हल्ला एक रात्र आधीच ज्योत्यजी त्यामुळे रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा देण्याचे आदेश त्याने मोघली हशमांस दिला होता.  
सुरवातीस अचानक झालेल्या हल्ल्याने मोघल थोडे फार बिथरले.पण ह्या आशा प्रकारास आपल्याला कधीही कुठेही सामोरे जावे लागू शकते. ह्याची मानसिक तयारी मुकररबखानाची असल्याने त्याने त्याची संपुर्ण छावणी लगेच लढाईस तयार केली.
संख्येने जास्त असलेल्या मोगलांनी ह्या मोजक्या शिबंदीस जुमानले नाही. मराठ्यांचे प्रयत्न तोकडे पडले. 
अनेक वीर गतप्राण होऊन शिराळ्याच्या त्या मातीत कायमचे  मिळाले.उरलेले बरेच मराठे व स्वतः आपशास्त्री दीक्षित कैद झाले. 
त्याने बत्तीस शिराळ्याच्या त्या माळवरच रात्रीच्या अंधारात आप्पा शास्त्री दीक्षित सह इतर सर्व कैद मराठा तुकडीचा शिरच्छेद करण्याचा निर्णय घेतला. 
बत्तीस शिराळ्यातील मल्लशाळा, भवानी मंदिर, मारुती मंदिर व स्वामीकार्यास कामी आल्याने अप्पशास्त्रीच्या वंशजांना मौजे कणदूर येथील इनाम रुपी मिळालेली जमीन ह्याची साक्ष देते.
खरे जंत्री वरून १६८९ च्या महाशिवरात्रीची तारीख ८ फेब्रुवारी १६८९ येते. व वरील माहितीतील हल्ला महाशिवरात्रीच्या ४-५ दिवस आधी झाल्याने म्हणजेच ३ -४ फेब्रुवारी १६८९  ही तारीख शंभाजी महाराजांच्या अटकेच्या आसपास असल्याने त्यास जुळून येते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ फेब्रुवारी १७१४*
'सरखेल कान्होजी आंग्रे' आणि 'छत्रपती शाहू महाराज' यांच्यात वळवंड, लोणावळा येथे तह.
१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट (कोल्हापुर आणि सातारा गादी) पडल्यावर कान्होजी आंग्रे कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला होता. पुढे त्यांचे बालमित्र असलेले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर तह करवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ फेब्रुवारी १७६०*
पानिपतच्या संग्रामातील वाघ घराण्यातील असेच एक वीर योद्धा संताजी वाघ ह्यांच्या संदर्भातील एक पत्र
लढाईत आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर सरकार आमच्या घराण्यास संभाळून घेईल असा भाव पत्रात विदित होतो.
स्वराज्याप्रती निष्ठा किती आणि कशी असावी ह्याचे हे पत्र उत्तम उदाहरण आहे. 
कृपया पत्र थोडं मोठ्या आवाजात वाचावे म्हणजे पत्राचा भाव जास्त चांगला लक्षात येईल.  
पत्राची तारीख आहे ८ फेब्रुवारी १७६०  
पत्र सुरु.
II  श्री II 
श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांच्या सेवेसी,
श्री सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य
आज्ञाधारक संताजी वाघ दंडवत.
येथील कुशल तागाईत माघ वाद्य सप्तमी पावेतो साहेबाचे कृपेंकरुन सेवकाचे वर्तमान यथास्थित असे.
विशेष.
आपण आजच हिंदुस्थानचे स्वारीस ( पानिपतच्या स्वारीस ) सुमुहूर्ते निघून डेरियास आलो.
याउपरी मजलदरमजल तीर्थरूप राजश्री मामाजवळ फौजसुद्धा जाऊन दाखल होतो.
आम्हास सर्वस्वे आश्रा स्वामींचे पायाचा आहे. 
पूर्वीपासून एकनिष्ठ सेवकव्रत मात्र जाणत आहो.
सर्व निर्वाह करणार धनी समर्थ आहेत.
वरकड वर्तमान राजश्री हरी वल्लभ यांनी विज्ञापनपत्र लिहिले आहे त्या वरून विदित होईल.
कृपाळू होऊन पत्राचे उत्तर आज्ञापत्र पाठवावे.
बहुत काय लिहिणे
कृपा कीजे

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ फेब्रुवारी १८९९*
रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४