२७ जून १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"मराठ्यांनी पळवून लावलेल्या मुघल सरदार शेरखानाच्या ठिकाण्यावर छापा घालून मराठ्यांनी जड-जवाहीर, किंमती वस्तू, दागिने आदी मोठा ऐवज स्वराज्यात आणला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ जून १६६२ छत्रपती शिवाजी महाराजांचे बाजी सर्जेराव जेधेंना पत्र शाहिस्तेखान स्वराज्यात येऊन 2 वर्षे झाली होती. स्वराज्यात येताच मुघल सैन्याने लुटालूट आरंभली होती. शाहिस्तेखानाने चाकण, पुणे प्रांत ताब्यात घेऊन लालमहालात तळ ठोकला होता. मोगली सैन्याने शिरवळ भागातही गुरेढोरे व धान्याची पेवे लुटून न्यायला सुरू केले होते. आक्रमक बनलेल्या मोगलांनी भोर, रोहीडा भागातही हालचाली सुरू केल्या होत्या. कान्होजी जेधेंच्या मृत्यूनंतर या भागाची देशमुखी बाजी सर्जेराव जेधे सांभाळत होते. मुघल सैन्याच्या दबावामुळे जेधेंचे सैन्य व नोकर आपला मुलुख सोडून शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीसाठी जाऊ लागले. त्यामुळे बाजी जेधेनी महाराजाना पत्र पाठवून आपले लोक येतील त्यांना नोकरीवर ठेऊन घेऊ नये अशी विनंती केली होती. यावेळी महाराजांनीही बाजी जेधेंच्या पत्राला लागलीच उत्तर पाठवून दिलासा दिला होता. त्यात महाराज म्हणतात, "तुमचे लोक हुजूर येतील त्यास साहेब ठेवणार नाहीत. तुमचे तुम्हापासी फिराउनु पाठवितील." बाजी सर्जेराव जेधेना दिलासा देण्यासाठी पाठवलेल्या या