ममलकतमदार सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची आज पुण्यतिथी, निमित्ता कोटी कोटी अभिवादन,, 🙏🚩

सरसेनापती संताजीबाबा घोरपडे...!!
१८ जून १६९७ काळा दिवस

दातृत्व -कर्तुत्व-नेतृत्व ह्यांचा तिहेरी संगम म्हणजे सरसेनापती संताजीबाबा घोरपडे ...!!

आपल्या नियोजनाने दक्षिण भारताच्या अथांग प्रदेशावर लष्कर नाचवायचं .शिस्त पाळायची .शौर्य गाजवायचं ते
संताजीबाबांच्या नेतृत्वाने .

छत्रपती संभाजी महाराजांनंतर औरंगजेबाला ज्यांच्या मृत्यूसाठी कट करावा लागला कपट करावं लागलं ते संताजीबाबा घोरपडे ..!!

शिवछत्रपतींच्या तालमीतला हा शेवटचा पठ्ठ्या मोगलांचा काळ ठरला .
.!

कधी तंबूवरील सोन्याचे कळस कापून आण, 
कधी नुसती पळापळ करून धांदल उडवून द्यावी, 
कधी मोघली सैन्यच काय त्यांच्या घोड्याना ही जेरीस आणावं, 
यांच्याशी लढताना मोघलांना मरण शरण व आडमाप बरबादी ऐवढंच पदरी पडायचं म्हणूनच की काय
औरंग्याच्या जिवाला जीव जाये पर्यंत ह्या घोरपड्यांचा मोठा घोर होता, आशा या रणझुंजार #ममलकतमदार सरसेनापती 
संताजीराव घोरपडे यांची आज पुण्यतिथी, 
निमित्ता कोटी कोटी अभिवादन,, 🙏🚩

पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा,,🙏🚩



#सरसेनापती_संताजी_घोरपडे🚩
(मृत्यू : १८ जून, इ.स. १६९७)
हे मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते ✍️
छत्रपती संभाजी राजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम राजे यांनी मराठ्यांच्या राज्याची धुरा वाहिली.
त्याच काळातले #संताजी_घोरपडे यांचे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते.
या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ
(१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला.
मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती.
मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते.
अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे संताजी घोरपडे यांनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले.
१७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता.
शिवाजीराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले.
पुढे मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला.
शिवाजीराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले; तीच परंपरा पुढे संभाजीराजांच्या काळात हंबीरराव मोहिते यांनी चालू ठेवली. संभाजीराजांना आणि कवी कलशांना संगमेश्वर गावी शेख निजाम याने पकडले आणि त्याच वेळेस म्हाळोजी घोरपडे मारले गेले.
या नंतर मोघलांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि संभाजी राजांच्या तालमीत तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्तावलेल्या मोघल बादशाहला गाडला.
या योद्ध्यांत एक आघाडीचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे".
मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होऊच शकत नाही.
संताजीरावं घोरपडे यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम🙏
.
.
.
@sarsenapati_santaji_ghorpade
#sarsenapatisantajighorpa
@sarsenapati_santaji_ghorpade 

 #sarsenapati #santajighorpade #marathaempire #jayshivray #harharmahadev

रणमर्द रणशूर
रणधीर रणगाजी...!!
दरी डोंगरात 
हूल उठते सुलतानी...

"भागो ,भागो आया संताजी "

विनम्र अभिवादन सरसेनापती.

#ममल्कतमदार

सोअर्स... सचिनराव

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...